Share Market Sensex, Nifty higher at opening bell; Take cues from tech-led global rally Sakal
Share Market

Share Market Opening: शेअर बाजार नव्या विक्रमी उच्चांकावर उघडला, निफ्टीने पार केला 22,290चा टप्पा, चौफेर खरेदीमुळे बाजारात उत्साह

Share Market Opening: शेअर बाजारात आज नवा विक्रम झाला. प्रमुख निर्देशांक नवीन विक्रमी उच्चांकावर उघडले, निफ्टीने प्रथमच 22290 ची पातळी ओलांडली. सेन्सेक्सनेही 73400चा टप्पा पार केला. चौफेर खरेदीमुळे बाजारात उत्साह आहे.

राहुल शेळके

Share Market Opening Latest Update 23 February 2024: शेअर बाजारात आज नवा विक्रम झाला. प्रमुख निर्देशांक नवीन विक्रमी उच्चांकावर उघडले, निफ्टीने प्रथमच 22290 ची पातळी ओलांडली. सेन्सेक्सनेही 73400चा टप्पा पार केला. चौफेर खरेदीमुळे बाजारात उत्साह आहे. निफ्टीमध्ये ग्रासिमचा शेअर सर्वाधिक वाढलेला आहे, तर एशियन पेंटचा शेअर सर्वाधिक घसरला आहे.

शेअर बाजाराच्या सुरुवातीच्या व्यवहारात निफ्टी मिडकॅप 100, बीएसई स्मॉल कॅप, निफ्टी आयटी आणि निफ्टी बँक निर्देशांक वाढत होते. शेअर बाजाराच्या सुरुवातीच्या व्यवहारात, ग्रासिम इंडस्ट्रीज, हीरो मोटोकॉर्प, विप्रो, एलटीआय माइंडट्री, टायटन, जेएसडब्ल्यू स्टील आणि टेक महिंद्रा या कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली होती.

शेअर बाजार नव्या विक्रमी उच्चांकावर

तर घसरण झालेल्या शेअर्समध्ये एशियन पेंट्स, ॲक्सिस बँक, ब्रिटानिया, भारती एअरटेल, पॉवर ग्रिड आणि एसबीआय लाईफच्या शेअर्सचा समावेश होता.

बँक निफ्टीमध्ये मोठी वाढ

निफ्टीच्या 50 शेअर्सपैकी 29 शेअर्स वाढीसह तर 21 शेअर्स घसरणीसह व्यवहार करत आहेत. आज बँक निफ्टी मार्केट उघडल्यानंतर लगेच 47,135 वर गेला होता आणि त्याचे 12 पैकी 10 शेअर्स वाढीसह व्यवहार करत आहेत. बँक ऑफ बडोदा, बंधन बँक, आयडीएफसी फर्स्ट बँक, पंजाब नॅशनल बँक आणि एचडीएफसी बँक यांचे शेअर्स निफ्टीमध्ये सर्वाधिक वाढले आहेत.

S&P BSE SENSEX

गुंतवणुकदारांना मल्टीबॅगर परतावा देणाऱ्या शेअर्समध्ये हजूर मल्टी प्रोजेक्ट्स, स्पाईसजेट, बीसीएल इंडस्ट्रीज, बंधन बँक, चेमबॉन्ड केमिकल, सर्व्होटेक पॉवर, पंजाब नॅशनल बँक, पेटीएम, साउथ इंडियन बँक यांचे शेअर्स वधारत होते तर गेल, आयटीसी, एलआयसी, इंडियन ऑइल, एबीबी इंडिया आणि आयआरईडीएचे शेअर्स घसरत होते.

व्होडाफोन आयडियामध्ये 8% पेक्षा जास्त वाढ

व्होडाफोन आयडियाच्या शेअर्समध्ये शुक्रवारी 8% पेक्षा जास्त वाढ होत आहे. शेअर 8.28% वाढून इंट्राडे रु 17.65 वर पोहोचला. कंपनीच्या शेअर्समध्ये ही वाढ 27 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या बोर्ड मिटिंगच्या वृत्तानंतर झाली आहे.

या बैठकीत कंपनी पैसे उभारण्याच्या प्रस्तावांवर विचार करू शकते. कुमार मंगलम बिर्ला यांनी म्हटले आहे की आदित्य बिर्ला समूह व्यवसायातून बाहेर पडण्याचा विचार करत नाही आणि नवीन गुंतवणूकदार शोधत आहे. गेल्या 12 महिन्यांत स्टॉक 158% वाढला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लक्ष्मीकांत बेर्डेंनी गाजवलेलं नाटक परत येणार; 'अबब विठोबा बोलू लागला’ मध्ये हास्यजत्रेतील अभिनेता साकारणार धम्माल पुजारी

Building Collapsed: मोठी घटना! तीन मजली घराचा भाग कोसळून दुर्घटना; एकाचा मृत्यू, ११ कामगार ढिगाऱ्याखाली दबले

Thane Politics: राजकारण तापले! भाजपच्या ज्येष्ठ नेत्याचा पक्षत्याग, संतप्त कार्यकर्त्यांकडून फोटोला शाई फासून निषेध

Aishwarya Rai Bachchan and PM Modi VIDEO : पंतप्रधान मोदींना बघताच ऐश्वर्याने भर स्टेजवर केली अशी काही कृती, की पाहणारेही पाहातच राहिले

Latest Marathi Breaking News Live Update: लासलगाव बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणात मक्याची आवक

SCROLL FOR NEXT