share market stock analysis should not greedy to be in profit sakal
Share Market

Share Market : लाभ असावा, लोभ नाही...

बाजारात गुंतवणुकीचा सर्वांत चांगली वेळ म्हणजे दीर्घ मंदी, तर नफा पदरी पाडून घेण्याची संधी म्हणजे कमी काळात आलेली मोठी तेजी.

सकाळ वृत्तसेवा

- श्रीनिवास जाखोटिया | रितेश मुथियान

या वर्षी शेअर बाजारात गुंतवणूकदारांची चांदी झाली. गुंतवणूकदारांना अगदी कमी कालावधीत मोठा परतावा लाभला. ‘तेजी का बोलबाला’ व्हावा, तसे आता बाजारात नवनवे उद्दिष्टे गाठली जाऊ लागली आहेत.

मात्र, या तेजीला भुलून कोरोनानंतरच्या काळात बाजारात आलेले व ज्यांनी अजून मोठी मंदी अनुभवली नाही असे नवे गुंतवणूकदार मोठ्या चुका करू शकतात. नववर्षात म्हणजे २०२४ मध्ये बाजार खाली येईल का की आणखी नवी शिखरे गाठेल?

याचे उत्तर शोधण्यापेक्षा मुद्दल व कमाविलेला नफा सुरक्षित ठेवण्याकडे गुंतवणूकदारांनी लक्ष देणे गरजेचे आहे. आगामी वर्षात अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत. त्यात आपल्या देशात होणारी सार्वत्रिक निवडणूक; तसेच अमेरिकेतदेखील होणारी निवडणूक या महत्त्वाच्या घटना आहेत. त्याचा बाजारावर मोठा परिणाम होऊ शकतो, हे लक्षात घेतले पाहिजे.

दीर्घ मंदी; फायद्याची संधी

बाजारात गुंतवणुकीचा सर्वांत चांगली वेळ म्हणजे दीर्घ मंदी, तर नफा पदरी पाडून घेण्याची संधी म्हणजे कमी काळात आलेली मोठी तेजी. २०२४ हे वर्ष बाजारातील अनिश्चितता वाढविणारे असेल.

विशेषतः वायदे बाजारात व्यवहार करणाऱ्यांसाठी हे वर्ष आव्हानात्मक राहाणार आहे. कमी भावात खरेदी करण्यासाठी या वर्षात अनेक संधी मिळण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे अशी संधी आल्यास तिचे सोने करण्यासाठी तरलता म्हणजे लिक्विडिटी असणे गरजेचे आहे.

मात्र, अनेकदा अशा मोठ्या मंदीत तरलता नसल्याने आकर्षक भावात चांगले शेअर घेण्याची संधी आपण गमावून बसतो. त्यामुळे यावर्षी मंदीच्या कालावधीत चांगले शेअर घेण्याची तयारी करून ठेवावी. लोभापायी मागील काही काळात कमविलेला नफा गमावणे योग्य ठरणार नाही; त्यापेक्षा लाभ पदरी पाडून घेऊन लोभ टाळावा, हे नव्या वर्षाचे धोरण असावे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather : महाराष्ट्रात आज पावसाचा जोर वाढणार; पुणे,साताऱ्यासह 'या' जिल्ह्यांना येलो अलर्ट, तुमच्या भागात कसे असेल हवामान?

Landowners Compensation Hike: जमीनमालकांसाठी नुकसानभरपाईत वाढ, ४० वर्षांनंतर उच्च न्यायालयाचा निर्णय

TB मुक्तीसाठी 'सरपंचां'ना साकडं! गावागावांत 'हँड हेल्ड एक्स-रे'द्वारे स्क्रीनिंग; लक्षणे नसलेल्या रुग्णांना शोधून मोफत उपचार

आजचे राशिभविष्य - 16 ऑगस्ट 2026

Aries Weekly Horoscope: मेष राशीसाठी मोठी खुशखबर! जुने वाद मिटणार, नवी दारे उघडणार; 'या' दिवसांत मिळेल भाग्याची साथ

SCROLL FOR NEXT