Share Market Today Sakal
Share Market

Share Market Closing: शेअर बाजार किरकोळ वाढीसह बंद; पॉवर शेअर्स बनले 'सुपरस्टार'

Share Market Today: गुरुवारच्या व्यवहारात भारतीय शेअर बाजार तेजीसह बंद झाला. ऑटो आणि एनर्जी शेअर्समधील खरेदीमुळे बाजारात ही वाढ दिसून आली. आजच्या ट्रेडिंग सत्रात मिडकॅप शेअर्समध्येही खरेदी दिसून आली.

राहुल शेळके

Share Market Closing Latest Update 2 May 2024: गुरुवारच्या व्यवहारात भारतीय शेअर बाजार तेजीसह बंद झाला. ऑटो आणि एनर्जी शेअर्समधील खरेदीमुळे बाजारात ही वाढ दिसून आली. आजच्या ट्रेडिंग सत्रात मिडकॅप शेअर्समध्येही खरेदी दिसून आली. बाजार बंद होताना बीएसई सेन्सेक्स 128 अंकांच्या वाढीसह 74,611 अंकांवर तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 44 अंकांच्या वाढीसह 22,649 अंकांवर बंद झाला.

Share Market Today

क्षेत्रीय निर्देशांकाची स्थिती

आजच्या व्यवहारात ऑटो, फार्मा, एफएमसीजी, मेटल, एनर्जी, हेल्थकेअर, ऑइल आणि गॅस क्षेत्रातील शेअर्स वाढीसह बंद झाले. तर बँकिंग आणि मीडिया क्षेत्रातील शेअर्स घसरणीसह बंद झाले. निफ्टी मिडकॅप निर्देशांक आणि स्मॉल कॅप निर्देशांकही वाढीसह बंद झाले.

मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समध्ये खरेदी दिसून येत आहे. सेन्सेक्समधील 30 शेअर्सपैकी 18 शेअर्स वाढीसह बंद झाले तर 12 शेअर्स घसरणीसह बंद झाले.

Share Market Today

अमेरिकन सेंट्रल बँक फेडरल रिझर्व्हने व्याजदरात बदल न केल्याने शेअर बाजारावर विशेष परिणाम दिसून आला नाही. कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली घसरण आणि एप्रिलमध्ये देशांतर्गत वाहन विक्रीचे चांगले आकडे यामुळे शेअर बाजारातील वातावरण सकारात्मक होते.

मार्केट कॅपने गाठला ऐतिहासिक उच्चांक

भारतीय शेअर बाजारातील तेजीमुळे मार्केट कॅपने ऐतिहासिक उच्चांक गाठला आहे. बीएसईवर शेअर्सचे मार्केट कॅप 408.54 लाख कोटी रुपयांवर बंद झाले, जे मागील सत्रात 406.55 लाख कोटी रुपये होते. आजच्या सत्रात गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 1.99 लाख कोटी रुपयांची वाढ दिसून आली.

S&P BSE SENSEX

कोणते शेअर्स तेजीत?

आजच्या व्यवहारात ऊर्जा क्षेत्रातील शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ दिसून आली आहे. पॉवर फायनान्स 5.96 टक्के, ट्रेंट 5.37 टक्के, चोला इन्व्हेस्टमेंट 9.08 टक्के, डाबर इंडिया 3.46 टक्के, इंडिगो 3.16 टक्के, आयसीओ 2.69 टक्के वाढीसह बंद झाले. तर पीएनबी 2.13 टक्के, गेल 1.94 टक्के, अदानी एनर्जी 1.16 टक्क्यांनी घसरणीसह बंद झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Rule: उत्तर प्रदेशमध्ये 1200 कुटुंबांचा गॅस पुरवठा रोखला; 413 कुटुंबांचे कनेक्शन तोडले, नेमकं कारण काय?

'दृश्यम ३' थिएटर गाजवतोय पण ओटीटीवर अचानक ट्रेंड होतोय अजय देवगनचा ११ वर्ष जुना चित्रपट; तुम्ही पाहिलाय का?

अल निनोमुळे 'पाणीबाणी', राज्यात ऑगस्ट २०२७पर्यंत पाणीकपात; सरकारचा मोठा निर्णय, साठा राखीव ठेवण्याचे आदेश

७५ वर्षीय आजोबांचं नातीसोबत अश्लील वर्तन, संतापलेल्या २० वर्षीय तरुणीने आजोबांना संपवलं; क्रिकेट बॅटने डोक्यात वार करत...

WCL 2026, IND vs PAK: पाकडे पुन्हा तोंडावर आपटले! भारताकडून हवी होती लेखी माफी पण... क्रिकेटच्या मैदानात राडा

SCROLL FOR NEXT