Share Market Today Sakal
Share Market

Share Market Closing: विक्रमी उच्चांकानंतर शेअर बाजार सुस्त; सेन्सेक्स-निफ्टी घसरणीसह बंद, कोणते शेअर्स तेजीत?

Share Market Today: मंगळवारी बीएसई सेन्सेक्स 58 अंकांच्या घसरणीसह 74,683 अंकांच्या पातळीवर बंद झाला तर निफ्टी 23 अंकांच्या घसरणीसह 22,642 अंकांच्या पातळीवर बंद झाला. शेअर बाजारातील व्यवहाराला मंगळवारी चांगली सुरुवात झाली.

राहुल शेळके

Share Market Closing Latest Update 9 April 2024: आज मंगळवारी बीएसई सेन्सेक्स 58 अंकांच्या घसरणीसह 74,683 अंकांच्या पातळीवर बंद झाला तर निफ्टी 23 अंकांच्या घसरणीसह 22,642 अंकांच्या पातळीवर बंद झाला. शेअर बाजारातील व्यवहाराला मंगळवारी चांगली सुरुवात झाली. व्यवहाराच्या शेवटी नफा बुकिंगमुळे शेअर बाजारात घसरण झाली.

Share Market Today

क्षेत्रीय निर्देशांकाची स्थिती

मंगळवारी शेअर बाजाराने जोरदार सुरुवात केल्यानंतर अखेर शेअर बाजार घसरणीसह बंद झाला. शेअर बाजारात, निफ्टी मिडकॅप 100, बीएसई स्मॉल कॅप, निफ्टी ऑटो, निफ्टी फार्मा आणि निफ्टी एफएमसीजी निर्देशांकात घसरण झाली. मंगळवारच्या व्यवहारात निफ्टी आयटी, निफ्टी बँक आणि निफ्टी फायनान्शिअल सर्व्हिसेसमध्ये वाढ झाली.

Share Market Today

कोणते शेअर्स वाढले?

मंगळवारी शेअर बाजारातील टॉप गेनर्समध्ये अपोलो हॉस्पिटल, हिंदाल्को, आयसीआयसीआय बँक, इन्फोसिस, आयशर मोटर्स, बजाज फिनसर्व्ह आणि ग्रासिम इंडस्ट्रीजच्या शेअर्समध्ये वाढ झाली.

तर टायटन, हीरो मोटोकॉर्प, कोल इंडिया, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड, बीपीसीएल आणि टाटा कंझ्युमरच्या शेअर्समध्ये घसरण झाली आहे. सेन्सेक्समधील 30 शेअर्सपैकी केवळ 12 शेअर्स वाढीसह बंद झाले आणि 18 शेअर्स घसरणीसह बंद झाले.

S&P BSE SENSEX

कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये घसरण

सकाळी 401 लाख कोटी रुपयांच्या वर गेलेला मार्केट कॅप बाजार बंद होताना पुन्हा 400 लाख कोटी रुपयांच्या खाली आले आहे. आज BSE वर कंपन्यांचे मार्केट कॅप 399.98 लाख कोटी रुपये झाले.

बँक निफ्टीच्या शेअर्सची स्थिती

बँक निफ्टी 148.55 अंकांच्या किंवा 0.31 टक्क्यांच्या वाढीसह 48,730.55 च्या पातळीवर बंद झाला. बँक निफ्टीच्या 12 पैकी फक्त 4 शेअर्स वाढीसह बंद झाले आणि 8 शेअर्स घसरणीसह बंद झाले.

वाढत्या शेअर्समध्ये, आयसीआयसीआय बँक 1.83 टक्क्यांच्या वाढीसह सर्वाधिक तेजीत होती आणि त्यानंतर फेडरल बँक 0.91 टक्क्यांच्या वाढीसह बंद झाली. ॲक्सिस बँक आणि एचडीएफसी बँकेचे शेअर्सही वाढीसह बंद झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT