Stock Market Update Sakal
Share Market

Share Market Opening: शेअर बाजारात पुन्हा तेजी; सेन्सेक्स 80,000च्या वर, कोणते शेअर्स चमकले?

Share Market Today: देशांतर्गत शेअर बाजार कालच्या तुलनेत आज रिकव्हरीसह उघडले. सेन्सेक्स 80,000 च्या वर व्यवहार करत होता. मिड-स्मॉलकॅप निर्देशांकही स्थिर होते. निफ्टी 50 अंकांच्या वाढीसह 24,380 च्या आसपास उघडला.

राहुल शेळके

Share Market Opening Latest Update 11 July 2024: देशांतर्गत शेअर बाजार कालच्या तुलनेत आज रिकव्हरीसह उघडले. सेन्सेक्स 80,000 च्या वर व्यवहार करत होता. मिड-स्मॉलकॅप निर्देशांकही स्थिर होते. निफ्टी 50 अंकांच्या वाढीसह 24,380 च्या आसपास उघडला. सेन्सेक्स 150 अंकांच्या वाढीसह 80,170 वर उघडला. टाटा स्टील, टाटा मोटर्स, टायटन, टीसीएस, हिंदाल्को या शेअर्सनी वाढ नोंदवली.

बुधवारच्या प्रॉफिट बुकींगनंतर आज निफ्टी आणि सेन्सेक्स महत्त्वाच्या पातळीवर उघडले. निफ्टी महत्त्वाच्या मूव्हिंग ॲव्हरेजच्या आसपास आहे आणि तज्ञांचा असा विश्वास आहे की निफ्टी 24250 च्या खाली गेल्याने काही डाउनसाइड पातळी सक्रिय होऊ शकतात आणि नफा बुकिंग निर्देशांकावर वर्चस्व निर्माण होऊ शकते.

मात्र, आज बाजारात खरेदीचा कल कायम आहे. आजच्या ट्रेडिंगमध्ये, IT कंपन्यांच्या शेअर्सवर लक्ष केंद्रित केले जाईल कारण TCS कंपनी पहिल्या तिमाहीतील कमाईचा अहवाल सादर करणार आहे.

Share Market Opening

सेन्सेक्सचे 22 शेअर्स तेजीत

सेन्सेक्सवर 30 शेअर्स लिस्ट आहेत, त्यापैकी 22 शेअर्स तेजीत आहेत. टाटा स्टील, टीसीएस आणि आयसीआयसीआय बँकेत सर्वाधिक वाढ झाली आहे. दुसरीकडे, एचडीएफसी बँक, आयटीसी आणि नेस्लेमध्ये सर्वात मोठी घसरण झाली आहे.

Share Market Opening

आज BSE वर 2518 शेअर्सची खरेदी-विक्री होत आहे. यामध्ये 1780 शेअर्स तेजीत दिसत आहेत, 608 शेअर्समध्ये घसरण दिसून येत आहे आणि 130 शेअर्समध्ये कोणताही बदल दिसून येत नाही. याशिवाय 100 शेअर्स एका वर्षाच्या उच्चांकावर तर 7 शेअर्स एका वर्षाच्या नीचांकी पातळीवर आले. 71 शेअर्स अप्पर सर्किटवर पोहोचले, तर 51 शेअर्स लोअर सर्किटवर पोहोचले.

BSE SENSEX

गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 1.65 लाख कोटींची वाढ

10 जुलै 2024 रोजी, BSE वर सर्व शेअर्सचे एकूण मार्केट कॅप 4,50,05,094.58 कोटी रुपये होते. आज म्हणजेच 11 जुलै 2024 रोजी बाजार उघडताच ते 4,51,70,602.22 कोटी रुपयांवर पोहोचले. याचा अर्थ गुंतवणूकदारांच्या भांडवलात 1,65,507.64 कोटी रुपयांची वाढ झाली आहे.

चीनमधील परिस्थिती बदलणार का?

15 ते 18 जुलै दरम्यान चीनमध्ये एक महत्त्वाची सरकारी बैठक आहे. त्यात आर्थिक सुधारणांसह अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. चीनमध्ये मोठ्या मदत पॅकेजची घोषणा होऊ शकते.

आशियाई बाजारात काय स्थिती?

आशियाई बाजारांमध्ये व्यवसाय तेजीत होताना दिसत आहे. गिफ्ट निफ्टी 59 अंकांनी किंवा 0.24 टक्क्यांच्या वाढीसह 24,421 च्या आसपास दिसत आहे. त्याच वेळी, निक्केई 0.88 टक्क्यांच्या वाढीसह व्यवहार करत आहे. स्ट्रेट टाइम्समध्येही 0.39 टक्के वाढ झाली आहे.

तैवानचा बाजार 1.06 टक्क्यांच्या वाढीसह व्यवहार करत आहे. तर हँग सेंग 1.44 टक्क्यांच्या वाढीसह व्यवहार करत आहे. तर कोस्पी 0.68 टक्क्यांनी घसरताना दिसत आहे. तर शांघाय कंपोझिट 0.75 टक्क्यांच्या वाढीसह व्यवहार करत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manikrao Kokate bail : मोठी बातमी! माणिकराव कोकाटेंना हायकोर्टाचा दिलासा; जामीन मंजूर, तूर्तास अटक टळली!

T20 World Cup तोंडावर असताना कर्णधारच बदलला! यजमान देशाच्या संभाव्य खेळाडूंची नावे जाहीर

नशीब असावं तर असं! 'या' कंपनीच्या २० वर्षे जुन्या AC मध्ये ग्राहकांना सापडतंय सोनं, प्रकरण वाचून थक्क व्हाल!

Crime: मेव्हणीनं दाजीला तिची समस्या सांगितली; नंतर दोघांनी भयंकर कट रचला अन् एकाचा जीव गेला, काय घडलं?

IND U19 vs SL U19 SF: जेतेपदासाठी India vs Pakistan भिडणार? उपांत्य फेरीत माफक धावांचे लक्ष्य; श्रीलंका, बांगलादेशला अपयश

SCROLL FOR NEXT