Share Market Updates Sensex, Nifty open in the red Sakal
Share Market

Share Market Opening: शेअर बाजारात मोठी घसरण; सेन्सेक्स 200 अंकांनी खाली, कोणते शेअर्स तेजीत?

Share Market Today: गुरुवारी (18 जुलै) देशांतर्गत शेअर बाजाराची सुरुवात घसरणीसह झाली. सेन्सेक्स 200 हून अधिक अंकांच्या घसरणीसह उघडला. निफ्टीमध्ये 70 पेक्षा जास्त अंकांची घसरण होती. बँक निफ्टीवर 150 हून अधिक अंकांची घट दिसून आली.

राहुल शेळके

Share Market Opening Latest Update 18 July 2024: गुरुवारी (18 जुलै) देशांतर्गत शेअर बाजाराची सुरुवात घसरणीसह झाली. सेन्सेक्स 200 हून अधिक अंकांच्या घसरणीसह उघडला. निफ्टीमध्ये 70 पेक्षा जास्त अंकांची घसरण होती. बँक निफ्टीवर 150 हून अधिक अंकांची घट दिसून आली. सेन्सेक्स 200 अंकांनी घसरला आणि 80,514 वर उघडला.

निफ्टी 70 अंकांनी घसरून 24,543 वर तर निफ्टी बँक 181 अंकांनी घसरून 52,215 वर उघडला. टीव्हीएस मोटर्स, बजाज ऑटो या दुचाकींच्या शेअर्समध्ये घसरण दिसून आली. बाजाराला आयटी शेअर्सचा पाठिंबा मिळत असल्याचे दिसून आले.

मोठ्या IT कंपन्यांचे निकाल जाहीर होणार

दिग्गज IT कंपनी इन्फोसिस तिचे Q1 निकाल जाहीर करेल. त्यामुळे बाजारात आयटी शेअर्समध्ये तेजी दिसण्याची शक्यता आहे. याशिवाय पर्सिस्टंट सिस्टम्स, पॉलीकॅब इंडिया, टाटा कम्युनिकेशन्स आणि एल अँड टी टेक्नॉलॉजी सर्व्हिसेस यांसारख्या मोठ्या कंपन्यांचे निकालही येतील.

Share Market Opening

शेअर बाजारातील तज्ज्ञांचे मत

केंद्रीय अर्थसंकल्प 2024 हा शेअर बाजारासाठी महत्त्वाचा असणार आहे आणि त्यापूर्वी बाजारात अस्थिरता येऊ शकते. बाजार आधीच उच्च पातळीवर आहेत आणि प्रश्न असा आहे की जर अर्थसंकल्प मार्केट फ्रेंडली असेल तर बाजार किती वर जाऊ शकेल.

Share Market Opening

सिद्धार्थ खेमका, (रिटेल इन्व्हेस्टर रिसर्चचे प्रमुख, मोतीलाल ओसवाल) म्हणाले, "मेगा इव्हेंट केंद्रीय अर्थसंकल्प जसजसा जवळ येईल तशी बाजारात चिंता वाढेल. यासोबतच, मोठ्या कंपन्यांचे Q1FY25 निकाल शेअर बाजारावर परिणाम करतील."

जोपर्यंत निफ्टी 24500-24450च्या झोनमध्ये आहे, तोपर्यंत या स्तरांवर त्याला चांगला सपोर्ट मिळेल आणि बाजार बाय ऑन डिप्स राहील, असे तज्ञांचे मत आहे. उच्च स्तरावरून प्रॉफिट बुकींग होण्याची शक्यता नाकारता येत नसली तरी बाजाराची रचना अशी झाली आहे की तळाशी अनेक सपोर्ट झोन आहेत.

BSE SENSEX

गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 48.8 हजार कोटी रुपयांची घट

16 जुलै 2024 रोजी, BSE वर सर्व शेअर्सचे एकूण मार्केट कॅप रुपये 4,55,24,617.83 कोटी होते. आज म्हणजेच 18 जुलै 2024 रोजी बाजार उघडताच ते 4,54,75,725.11 कोटी रुपयांवर आहे. याचा अर्थ गुंतवणूकदारांच्या भांडवलात 48,892.72 कोटी रुपयांची वाढ झाली आहे.

सेन्सेक्सचे कोणते शेअर्स तेजीत?

सेन्सेक्सवर 30 शेअर्स लिस्ट आहेत, त्यापैकी फक्त 11 शेअर्स ग्रीन झोनमध्ये आहेत. इन्फोसिस, टीसीएस आणि ॲक्सिस बँकेत सर्वाधिक वाढ झाली आहे. दुसरीकडे, एशियन पेंट, एचडीएफसी बँक आणि नेस्ले यांच्या शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण झाली आहे.

आज BSE वर 2798 शेअर्सचे व्यवहार होत आहेत. यामध्ये 1503 शेअर्स तेजीत दिसत आहेत, 1088 शेअर्समध्ये घसरण दिसून येत आहे आणि 207 शेअर्समध्ये कोणताही बदल दिसून येत नाही. याशिवाय 102 शेअर्सनी एका वर्षाच्या उच्चांकावर तर 7 शेअर्स एका वर्षाच्या नीचांकी पातळीवर आहेत. 81 शेअर्स अप्पर सर्किटवर पोहोचले, तर 63 शेअर्स लोअर सर्किटवर पोहोचले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aditya Thackeray Vs BJP : ‘’भाजप 'त्या' थर्ड क्लास दर्जाच्या लोकांना बडतर्फ करणार का? की...’’; आदित्य ठाकरेंचा सवाल!

जय शाहांनंतर आणखी एक भारतीय ICC मध्ये! नवे CEO झालेले संजोग गुप्ता आहेत तरी कोण?

Latest Maharashtra News Updates : डेटिंग ॲप वर मुलीचे बनावट प्रोफाइल तयार करून तरुणांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

Mumbai Politics: शिंदेसेनेचा राजकीय गाफीलपणा, चालकांचा जीव धोक्यात; पलावा पूल प्रकरण तापलं

Pune News : न्यायालयाने काय बांगड्या घातल्या आहेत का? म्हणत न्यायालयाचा अवमान

SCROLL FOR NEXT