Share Market Opening Sakal
Share Market

Share Market Opening: निफ्टी विक्रमी उच्चांकावर उघडला; पण बाजार फ्लॅट, कोणत्या शेअर्समध्ये झाली वाढ?

Share Market Today: देशांतर्गत शेअर बाजारात बुधवारी (10 जुलै) पुन्हा NSE निफ्टीमध्ये विक्रमी वाढ दिसून आली. निर्देशांक विक्रमी उच्चांकावर उघडला, परंतु संपूर्ण बाजाराने सपाट सुरुवात केली. सेन्सेक्स जवळपास 100 अंकांनी घसरला होता.

राहुल शेळके

Share Market Opening Latest Update 10 July 2024: देशांतर्गत शेअर बाजारात बुधवारी (10 जुलै) पुन्हा NSE निफ्टीमध्ये विक्रमी वाढ दिसून आली. निर्देशांक विक्रमी उच्चांकावर उघडला, परंतु संपूर्ण बाजाराने सपाट सुरुवात केली. सेन्सेक्स जवळपास 100 अंकांनी घसरला होता. त्याचवेळी बँक निफ्टीमध्येही मोठी घसरण पाहायला मिळाली. ग्रासिम, मारुती सुझुकी, नेस्ले, अदानी पोर्ट्स या शेअर्समध्ये वाढ झाली.

आज गिफ्ट निफ्टी सकाळी 24,483 च्या आसपास फ्लॅट फिरत होता. अमेरिकन फ्युचर्स मार्केटही सपाट होते. काल, Nasdaq आणि S&P ने अमेरिकन बाजारातील उच्चांक गाठला आणि Dow 52 अंकांनी घसरला. काल देशांतर्गत बाजारात एफआयआय आणि देशांतर्गत फंड या दोघांची चांगली खरेदी दिसून आली.

Share Market Opening

9 जुलै रोजी विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी (FII) 314.46 कोटी रुपयांचे शेअर्स खरेदी केले, तर देशांतर्गत संस्थागत गुंतवणूकदारांनी (DIIs) 1,416.46 कोटी रुपयांचे शेअर्स खरेदी केले. जागतिक आर्थिक संकेत आणि फेडरल रिझर्व्हचे अध्यक्ष पॉवेल यांच्या अलीकडील विधानामुळे गुंतवणूकदार सावध झाले आहेत. पॉवेल यांनी मंगळवारी चिंता व्यक्त केली की व्याजदर दीर्घकाळ उच्च ठेवल्यास आर्थिक विकास थांबू शकतो.

Share Market Opening

गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 1.24 लाख कोटींची वाढ

9 जुलै 2024 रोजी, BSE वर सर्व शेअर्सचे एकूण मार्केट कॅप रुपये 4,51,27,853.30 कोटी होते. आज म्हणजेच 10 जुलै 2024 रोजी बाजार उघडताच ते 4,52,51,962.87 कोटी रुपयांवर पोहोचला. याचा अर्थ गुंतवणूकदारांच्या भांडवलात 1,24,109.57 कोटी रुपयांची वाढ झाली आहे.

BSE SENSEX

सेन्सेक्सचे 19 शेअर्स तेजीत

सेन्सेक्सवर 30 शेअर्स लिस्टआहेत, त्यापैकी 19 शेअर्स तेजीत आहेत. मारुती, अदानी पोर्ट्स आणि नेस्लेमध्ये सर्वाधिक वाढ झाली आहे. दुसरीकडे, M&M, SBIमध्ये सर्वात मोठी घसरण झाली आहे.

आज BSE वर 2792 शेअर्सचे व्यवहार होत आहेत. यामध्ये 1723 शेअर्स तेजीत दिसत आहेत, 937 शेअर्समध्ये घसरण दिसून येत आहे आणि 132 शेअर्समध्ये कोणताही बदल दिसून येत नाही. याशिवाय 124 शेअर्स एका वर्षाच्या उच्चांकावर तर 9 शेअर्स एका वर्षाच्या नीचांकी पातळीवर आले. 88 शेअर्स अप्पर सर्किटवर पोहोचले, तर 48 शेअर्स लोअर सर्किटवर पोहोचले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maratha Reservation: १९९४ चा जीआर नेमका काय आहे? मराठा समाज आरक्षणाबाहेर राहिला, कारण...

Pachod News : चौकशीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांच्या धमकीने घाबरलेल्या शेतकऱ्याने विहिरीत उडी घेऊन संपविले जीवन

Latest Marathi News Updates: भाजपमध्ये घराणेशाही नाही- देवेंद्र फडणवीस

कोकणातलं तुम्हाला काय आवडलं? दिलीप प्रभावळकर म्हणाले, 'ते पाहून मीच चकीत झालो कारण...

BCCI ची अब्जावधींची कमाई होते तरी कशी? भारताच्या तुलनेत पाकिस्तान क्रिकेट बोर्ड किती कमावतो पैसा, जाणून घ्या

SCROLL FOR NEXT