Share Market Today Sakal
Share Market

Share Market Closing: ऐतिहासिक उच्चांक गाठल्यानंतर बाजार वाढीसह बंद, बँक निफ्टीत तेजी, कोणते शेअर्स चमकले?

Share Market Closing Today: देशांतर्गत शेअर बाजार गुरुवारी (18 जुलै) विक्रमी पातळीवर बंद झाला.आज सेन्सेक्स-निफ्टीने नवीन उच्चांक गाठला. आयटी शेअर्समध्ये प्रचंड वाढ झाली. त्यानंतर बाजार विक्रमी उच्चांकासह बंद झाला.

राहुल शेळके

Share Market Closing Latest Update 18 July 2024: देशांतर्गत शेअर बाजार गुरुवारी (18 जुलै) विक्रमी पातळीवर बंद झाला. आज सेन्सेक्स-निफ्टीने नवीन उच्चांक गाठला. आयटी शेअर्समध्ये प्रचंड वाढ झाली. त्यानंतर बाजार विक्रमी उच्चांकासह बंद झाला.

निफ्टीने आज 24,837 चा नवा उच्चांक गाठला आणि सेन्सेक्सने आज 81,522 चा विक्रमी उच्चांक गाठला. बंद होताना निफ्टी 187 अंकांनी वाढून 24,800 वर बंद झाला. सेन्सेक्स 627 अंकांनी वाढून 81,343 वर आणि निफ्टी बँक 223 अंकांनी वाढून 52,620 वर बंद झाला.

आजच्या बाजारातील तेजीचे नेतृत्व आयटी क्षेत्राने केले आणि लार्जकॅप आयटी शेअर्सना चांगला फायदा झाला. निफ्टीचा आयटी निर्देशांक अडीच टक्क्यांनी वाढला. एफएमसीजी क्षेत्रातही चांगली खरेदी झाली. OMAC कंपन्यांचे शेअर्सही चर्चेत होते. रिअल इस्टेट, कमोडिटी आणि मेटल क्षेत्रात घसरण दिसून आली.

Share Market Closing

आजच्या बाजारात, निफ्टी 50 शेअर्सपैकी, एलटीआय माइंडट्री आणि टीसीएसमध्ये साडेतीन टक्क्यांनी वाढ झाली आणि टॉप गेनर्सच्या यादीतील हे पहिले दोन शेअर्स होते. ओएनजीसी, बजाज फिनसर्व्ह आणि एमअँडएम हे शेअर्स निफ्टीमध्ये सर्वाधिक वाढले.

Share Market Closing

क्षेत्रीय निर्देशांकाची स्थिती

आजच्या व्यवहारात सर्वात जास्त वाढ आयटी शेअर्समध्ये दिसून आली. निफ्टीचा आयटी निर्देशांक 2.22 टक्क्यांच्या वाढीसह बंद झाला. याशिवाय बँकिंग, ऑटो, एफएमसीजी, ऊर्जा, आरोग्य सेवा, ऑइल आणि गॅस क्षेत्राचे शेअर्स तेजीसह बंद झाले. परंतु कंझ्युमर ड्युरेबल, मेटल आणि फार्मा शेअर्समध्ये घसरण दिसून आली आहे.

BSE SENSEX

आजच्या सत्रात मिडकॅप निर्देशांकात 1000 अंकांची घसरण पाहायला मिळाली, मात्र बाजार बंद झाल्यानंतर तो 523 अंकांच्या घसरणीसह बंद झाला. तर निफ्टीचा स्मॉलकॅप निर्देशांक 231 अंकांनी किंवा 1.21 टक्क्यांच्या घसरणीसह बंद झाला.

शेअर बाजार तेजीत पण मार्केट कॅपमध्ये घसरण

सेन्सेक्स-निफ्टी ऐतिहासिक उच्चांकावर बंद झाला आहे, तरीही भारतीय शेअर बाजाराच्या मार्केट कॅपमध्ये घसरण झाली आहे. मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समध्ये जोरदार प्रॉफिट बुकींग झाल्यामुळे मार्केट कॅपमध्ये घसरण झाली आहे.

बीएसईवर शेअर्सचे मार्केट कॅप 454.36 लाख कोटी रुपयांवर बंद झाले, जे गेल्या सत्रात 455.24 लाख कोटी रुपये होते. म्हणजेच आजच्या सत्रात गुंतवणूकदारांचे 90 हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.

2,500 शेअर्समध्ये घसरण झाली

बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) वर आज एकूण 4,016 शेअर्सची खरेदी-विक्री झाली. यापैकी 1,425 शेअर्स वाढीसह बंद झाले. 2,500 शेअर्समध्ये घसरण दिसून आली. तर 91 शेअर्समध्ये कोणतेही चढ-उतार न होता शेअर्स बंद झाले.

याशिवाय आजच्या व्यवहारादरम्यान 239 शेअर्सनी त्यांच्या 52 आठवड्यांच्या उच्चांकाला स्पर्श केला. तर 25 शेअर्सनी त्यांच्या नव्या 52 आठवड्यांच्या नीचांकी पातळीला स्पर्श केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : बळकावलेल्या जमिनींपासून बंदूकीच्या गोळ्यांपर्यंत! पुणे पोलिसांनी निलेश घायवळभोवती आवळला फास, घरावर छापेमारी, हाती लागलं मोठं घबाड

योजनांना पात्र, तरीही कर्ज मिळेना; उपचाराअभावी मुलगा गमावला, चित्रकार मंत्रालयासमोर करणार 'अर्ध नग्न लक्षवेधी चित्र' आंदोलन

Latest Marathi News Live Update : पूर्व विदर्भात विजांसह पावसाचा अंदाज; उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता

Coldrif Syrup : मध्य प्रदेश-राजस्थानमध्ये मृत्यूंनंतर 'कोल्ड्रिफ सिरप'वर महाराष्ट्रात बंदी

Raju Shetti:'अन्यथा मुख्यमंत्र्यांना दिवाळी करू देणार नाही': माजी खासदार राजू शेट्टी; शेतकऱ्यांवर गंभीर संकट, मुख्यमंत्र्यांकडून दिशाभूल

SCROLL FOR NEXT