Share Market  Sakal
Share Market

Share Market Closing: शेअर बाजारासाठी ऐतिहासिक दिवस; नवे विक्रम करत बाजार बंद, कोणते शेअर्स चमकले?

Share Market Closing Today: गुरुवारचे ट्रेडिंग सत्र सेन्सेक्स आणि निफ्टीसाठी ऐतिहासिक ठरले आहे. पहिल्यांदाच सेन्सेक्सने 79,000 आणि निफ्टी 24,000 च्या वर बंद झाला आहे. बाजारातील या वाढीचे श्रेय आयटी आणि ऊर्जा शेअर्सना जाते.

राहुल शेळके

Share Market Closing Latest Update 27 June 2024: गुरुवारचे ट्रेडिंग सत्र सेन्सेक्स आणि निफ्टीसाठी ऐतिहासिक ठरले आहे. पहिल्यांदाच सेन्सेक्स 79,000 आणि निफ्टी 24,000 च्या वर बंद झाला आहे. बाजारातील या वाढीचे श्रेय आयटी आणि ऊर्जा शेअर्सना जाते. आजच्या व्यवहाराअंती BSE सेन्सेक्स 569 अंकांच्या उसळीसह 79,243 अंकांवर बंद झाला तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 175 अंकांच्या उसळीसह 24,044 अंकांवर बंद झाला.

Share Market Closing

क्षेत्रीय निर्देशांकाची स्थिती

आजच्या सत्रात आयटी शेअर्समध्ये मोठी वाढ दिसून आली. निफ्टीचा आयटी निर्देशांक 2 टक्क्यांच्या वाढीसह बंद झाला आहे. याशिवाय ऑटो, एफएमसीजी, मेटल्स, एनर्जी, हेल्थकेअर, ऑइल आणि गॅस क्षेत्रातील शेअर्समध्ये वाढ झाली. तर मीडिया, फार्मा आणि बँकिंग शेअर्स घसरले.

मिडकॅप शेअर्स वाढीसह बंद झाले तर स्मॉलकॅप शेअर्स घसरणीसह बंद झाले. आज BSE वर 4001 शेअर्सचे व्यवहार झाले ज्यात 1519 शेअर्स वाढीसह बंद झाले आणि 2364 शेअर्स घसरणीसह बंद झाले. 314 शेअर्स अपर सर्किटवर बंद झाले तर 228 शेअर लोअर सर्किटवर बंद झाले. सेन्सेक्समधील 30 शेअर्सपैकी 24 शेअर्स तेजीसह तर 6 शेअर्स घसरणीसह बंद झाले.

Share Market Closing

कोणते शेअर्स तेजीत?

माझगाव डॉग, टॅक्समॅको रेल, टिटागड रेल, एनटीपीसी, एसजेव्हीएन, गेल इंडिया, गार्डन रीच शिप बिल्डर, कोचीन शिपयार्ड, पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन, भारत डायनॅमिक्स आणि रेल विकास निगम लिमिटेडचे ​​शेअर्स किंचित वाढले.

गुरुवारी गौतम अदानी समूहाच्या 10 कंपन्यांपैकी 6 कंपन्यांचे शेअर्स हिरव्या रंगात बंद झाले तर चार कंपन्यांचे शेअर्स लाल रंगात बंद झाले. गुरुवारी एचसीएल टेक, एशियन पेंट्स, अशोक लेलँड, कोटक महिंद्रा बँक, टीसीएस, इन्फोसिस आणि विप्रोच्या शेअर्सनी चांगला नफा कमावला.

BSE SENSEX

कोणते शेअर्स घसरले?

गुरुवारी शेअर बाजारात घसरण झालेल्या शेअर्समध्ये RITES लिमिटेड, भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड, हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड, IREDA, कंटेनर कॉर्पोरेशन, भारत अर्थ मूव्हर्स लिमिटेड, ग्रेट ईस्टर्न शिपिंग, कोल इंडिया लिमिटेड, भारतीय रेल्वे यांचा समावेश आहे.

फायनान्स कॉर्पोरेशन, IRCON इंटरनॅशनल, भारत इलेक्ट्रॉनिक्स, NHPC लिमिटेड, NMDC, Railtel आणि West Coast Paper या कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण झाली.

गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 1.67 लाख कोटी रुपयांची वाढ

आजच्या ट्रेडिंग सत्रात झालेल्या नेत्रदीपक वाढीमुळे मार्केट कॅप जोरदार वाढीसह बंद झाला आहे. बीएसईवर शेअर्सचे मार्केट कॅप 438.69 लाख कोटी रुपयांवर बंद झाले, जे मागील सत्रात 437.02 लाख कोटी रुपयांवर बंद झाले होते. म्हणजेच आजच्या सत्रात गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 1.67 लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुणे, पिंपरी-चिंचवडसह नाशिकमध्ये CNG दरात वाढ, नवे दर आजपासून लागू

Ebola Case: काळजी वाढवणारी बातमी! काँगोहून आला अन् तब्येत बिघडली… अहमदाबादमध्ये इबोलाच्या संशयाने खळबळ, ४ जण आयसोलेट

‘८ वाजून १३ मिनिटे’चा थरारक ट्रेलर प्रदर्शित; सुनील बर्वे–ऐश्वर्या नारकर यांची दमदार केमिस्ट्री चर्चेत!

Latest Marathi News Live Update : विदर्भात ६ जिल्ह्यांना उष्णतेचा रेड अलर्ट

Monsoon Gains Momentum : मॉन्सूनने पुन्हा घेतली गती; अरबी समुद्र अन् बंगालच्या उपसागरातून पुढे सरकला; हवामान विभागाची माहिती

SCROLL FOR NEXT