Share Market Today Sakal
Share Market

Share Market Closing: अर्थसंकल्पापूर्वी शेअर बाजार किंचित घसरणीसह बंद; कोणते शेअर्स वधारले?

Share Market Closing Today: अर्थसंकल्पापूर्वी सोमवारी (22 जुलै) देशांतर्गत शेअर बाजार काहीशा घसरणीसह बंद झाले. बाजारात बजेटपूर्व दहशत नव्हती. सेन्सेक्स जवळपास 100 अंकांनी घसरून 24,500 च्या वर बंद झाला.

राहुल शेळके

Share Market Closing Latest Update 22 July 2024: अर्थसंकल्पापूर्वी सोमवारी (22 जुलै) देशांतर्गत शेअर बाजार घसरणीसह बंद झाले. बाजारात अर्थसंकल्पापूर्वी दहशत नव्हती. सेन्सेक्स जवळपास 100 अंकांनी घसरून 24,500 च्या वर बंद झाला. मिड आणि स्मॉलकॅप निर्देशांकही वाढले. दिवसभर चढ-उतारांसह व्यवहार केल्यानंतर निफ्टी 21 अंकांनी घसरला आणि 24,509 वर बंद झाला.

सेन्सेक्स 102 अंकांनी घसरून 80,502 वर बंद झाला आणि निफ्टी बँक 14 अंकांनी वाढून 52,280 वर बंद झाला. विप्रो, रिलायन्स, कोटक या शेअर्सनी आज सर्वात मोठी घसरण नोंदवली. त्याचवेळी ग्रासिम, अल्ट्राटेक, एचडीएफसी बँक यांसारखे शेअर्स तेजीत होते.

Share Market Closing

क्षेत्रीय निर्देशांकाची स्थिती

आजच्या व्यवहारात ऑटो, फार्मा, मेटल, इन्फ्रा, कंझ्युमर ड्युरेबल्स, हेल्थकेअर आणि बँकिंग क्षेत्रातील शेअर्स तेजीसह बंद झाले. तर ऑइल आणि गॅस, आयटी, ऊर्जा, मीडिया, रिअल इस्टेट, एफएमसीजी क्षेत्रातील शेअर्स घसरणीसह बंद झाले. आजच्या व्यवहारात मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समध्ये जोरदार खरेदी दिसून आली.

Share Market Closing

निफ्टीचा मिडकॅप निर्देशांक 1.24 टक्क्यांच्या उसळीसह 56,604 अंकांवर बंद झाला. तर स्मॉलकॅप निर्देशांक 0.96 टक्क्यांच्या वाढीसह बंद झाला. सेन्सेक्समधील 30 शेअर्सपैकी 14 शेअर्स वाढीसह तर 16 शेअर्स घसरणीसह बंद झाले.

BSE SENSEX

गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 2 लाख कोटी रुपयांची वाढ

आजच्या व्यवहारात मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्सच्या वाढीमुळे गुंतवणूकदारांची संपत्ती वाढली आहे. बीएसईवर शेअर्सचे मार्केट कॅप 448.38 लाख कोटी रुपयांवर बंद झाले, जे मागील ट्रेडिंग सत्रात 446.38 लाख कोटी रुपयांवर बंद झाले होते. याचा अर्थ आजच्या ट्रेडिंग सत्रात गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 2 लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे.

कोणत्या शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण?

निफ्टी शेअर्समध्ये आज सर्वात मोठी घसरण विप्रोमध्ये 9.31 टक्के तर रिलायन्स 3.42 टक्के, कोटक बँक 3. 25 टक्के, आयटीसी 1.74 टक्के आणि एसबीआय लाईफ 1.74 टक्क्यांची घसरण झाली. तर ग्रासिममध्ये 2.58 टक्के, अल्ट्राटेक सिमेंटमध्ये 2.41 टक्के, एनटीपीसीमध्ये 2.22 टक्के, एचडीएफसी बँकमध्ये 2.16 टक्के आणि महिंद्रा अँड महिंद्रामध्ये 2.03 टक्के वाढ झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bapu Pathare: १०० लोक जमा केले अन्...; बापू पठारेंना मारहाण का झाली? पत्रकार परिषदेत आमदारांनी संपूर्ण विषयच उलगडून सांगितला!

दिवाळीत Invitation Cards बनवायचयं? तर Google Geminiचे 'हे' प्रॉम्प्ट वापरा

World Cup 2025: भारताने जिंकलेला टॉस? पण पाकिस्तानी कर्णधार राहिली चूप; IND vs PAK सामन्यापूर्वीच वादग्रस्त घटना; Video

Solapur Crime:'पैशांवरून पत्नीचा खून; पतीस जन्मठेप'; गॅस टाकीसाठी ठेवलेले पैसे पतीने दारुत उडवले, नेमकं काय घडलं?

Latest Marathi News Live Update: सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांचा ट्रॅक्टरमधून प्रवास

SCROLL FOR NEXT