Share Market  Sakal
Share Market

Share Market Closing: गुंतवणूकदार मालामाल! शेअर बाजार विक्रमी उच्चांकाच्या जवळ बंद; कोणते शेअर्स वधारले?

Share Market Closing Today: बुधवारी देशांतर्गत शेअर बाजारात चांगली तेजी पाहायला मिळाली. बाजार उघडताच विक्रमी उच्चांक गाठला होता आणि सेन्सेक्स-निफ्टी नवीन उच्चांकाच्या जवळ बंद झाले.

राहुल शेळके

Share Market Closing Latest Update 3 July 2024: बुधवारी देशांतर्गत शेअर बाजारात चांगली तेजी पाहायला मिळाली. सकाळी बाजार उघडताच सेन्सेक्सने विक्रमी उच्चांक गाठला होता. शेवटी सेन्सेक्स-निफ्टी नवीन उच्चांकाच्या जवळ बंद झाले. निफ्टीने आज 24,307 ही विक्रमी पातळी गाठली. सेन्सेक्सनेही आज 80,074 चा विक्रमी स्तर गाठला.

निफ्टी बँकेनेही 53,256 च्या विक्रमी पातळीला स्पर्श केला. निफ्टी 162 अंकांनी वाढून 24,286 वर बंद झाला आणि सेन्सेक्स 545 अंकांनी वाढून 79,986 वर बंद झाला. त्याच वेळी निफ्टी बँक 921 अंकांनी वाढून 53,089 वर बंद झाला.

कोणते शेअर्स घसरले?

आज बाजारातील निफ्टी 50 च्या टॉप गेनर्समध्ये टाटा कंझ्युमर प्रॉडक्ट्सचा शेअर अव्वल होता. या शेअरमध्ये 3.50 टक्क्यांपर्यंत वाढ दिसून आली. एचडीएफसी बँकेचा शेअर 2.22 टक्क्यांच्या वाढीसह बंद झाला. निफ्टी 50 च्या इतर टॉप गेनर्समध्ये कोटक महिंद्रा बँक, अदानी पोर्ट्स आणि ॲक्सिस बँकेचे शेअर्स प्रत्येकी 2 टक्क्यांनी वाढले. आजच्या बाजारात बँकिंग स्टॉकचे वर्चस्व होते आणि बँक निफ्टी निर्देशांक संपूर्ण ट्रेडिंग सत्रात 53,000 च्या वर ट्रेड करत होता.

Share Market Closing

कोणते शेअर्स घसरले?

आजच्या बाजारात बहुतांश क्षेत्रांमध्ये खरेदी दिसून आली असली तरी निफ्टी 50 निर्देशांकातील काही शेअर्समध्ये नफा बुकिंग झाले. आयटी क्षेत्रातील टीसीएसमध्ये 1.30 टक्क्यांची घसरण दिसून आली. टायटन कंपनीत 1.20 टक्क्यांची घसरण दिसून आली.

टाटा मोटर्स आणि रिलायन्स इंडस्ट्रीजमध्येही वरच्या स्तरावरून विक्रीचा दबाव दिसून आला आणि ते 0.50 टक्क्यांनी खाली आले. आजच्या बाजारात, आयटी तसेच फार्मा क्षेत्रातील प्रमुख शेअर्समध्ये घसरण दिसून आली, ज्यात सिप्ला आणि डिव्हिस लॅब सारख्या नावांचा समावेश होता.

Share Market Closing

मार्केट कॅप ऐतिहासिक उच्चांकावर बंद

भारतीय शेअर बाजारातील जोरदार वाढीमुळे मार्केट कॅप विक्रमी उच्चांकावर पोहोचले आहे. बीएसईच्या आकडेवारीनुसार, लिस्ट कंपन्यांच्या शेअर्सचे मार्केट कॅप 445.50 लाख कोटी रुपयांवर बंद झाले, जे मागील सत्रात 442.18 लाख कोटी रुपयांवर बंद झाले होते. आजच्या सत्रात गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 3.32 लाख कोटी रुपयांची वाढ दिसून आली.

शेअर बाजारातील आजच्या वाढीमागे प्रमुख कारणे कोणती?

1. बँकिंग स्टॉक्समध्ये वाढ

एचडीएफसी बँक व्यतिरिक्त, ॲक्सिस बँक, आयसीआयसीआय बँक आणि कोटक महिंद्रा बँकेसह इतर बँकिंग शेअर्सनीही सेन्सेक्स आणि निफ्टीला त्यांच्या नवीन उच्चांकावर नेले. निफ्टी बँक निर्देशांक देखील आज बँकिंग शेअर्सच्या वाढीमुळे 53,201 या नवीन सार्वकालिक उच्चांकावर पोहोचला.

निफ्टी बँक निर्देशांकात एकूण 10 शेअर्सचा समावेश आहे आणि सकाळी 11:00 वाजेपर्यंत हे सर्व शेअर्स हिरव्या रंगात व्यवहार करत होते. एचडीएफसी बँक आणि फेडरल बँक प्रत्येकी 3 टक्के वाढीसह आघाडीवर होते.

BSE SENSEX

2. FMCG शेअर्स तेजीत

आजच्या तेजीत एफएमसीजी कंपन्यांचाही वाटा आहे. ब्रिटानिया इंडस्ट्रीज, झायडस वेलनेस, मिसेस बेक्टर्स फूड स्पेशालिटीज, टाटा कंझ्युमर प्रॉडक्ट्स, नेस्ले इंडिया आणि डाबर इंडिया 2 टक्क्यांपर्यंत वाढले. जूनमध्ये तुरळक पावसानंतर मान्सूनची पुनरावृत्ती ही FMCG मार्केटसाठी, विशेषतः ग्रामीण भागासाठी चांगली बातमी आहे. याशिवाय ग्रामीण भागातील उत्पन्न वाढवण्यासाठी सरकार अर्थसंकल्पात अनेक सकारात्मक घोषणा करू शकते, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे.

3. आर्थिक डेटा

जून महिन्याचे आतापर्यंतचे आर्थिक आकडे चांगले आहेत. जूनमध्ये जीएसटी संकलन जोरदार झाले आहे. तसेच मॅन्युफॅक्चरिंग पीएमआय इंडेक्स जूनमध्ये 58.3 वर परतला. यामुळे गुंतवणूकदारांची भावनाही सुधारली आहे.

4. पहिल्या तिमाहीत चांगल्या कमाईचा अंदाज

जून तिमाहीत कंपन्यांचे निकाल चांगले राहतील अशी बाजाराची अपेक्षा आहे. जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेसचे विनोद नायर यांच्या मते, आर्थिक वर्ष 2025 च्या पहिल्या तिमाहीत कंपन्यांच्या कमाईतील वाढ 12-15 टक्क्यांच्या दरम्यान अपेक्षित आहे. याशिवाय पहिल्या तिमाहीत जीडीपी वाढीचा दर 7.3 टक्के राहण्याचा अंदाजही आरबीआयने व्यक्त केला आहे.

विनोद नायर म्हणाले, आर्थिक वर्ष 2024 च्या चौथ्या तिमाहीत दिसलेली मजबूत कामगिरी आर्थिक वर्ष 2025 च्या पहिल्या तिमाहीतही कायम राहण्याची अपेक्षा आहे. चौथ्या तिमाहीत निफ्टी 500 च्या कमाईत 18 टक्के वाढ झाली होती आणि पहिल्या तिमाहीतही हीच वाढ दिसून आली आहे.

5. बजेटशी संबंधित अपेक्षा

अर्थसंकल्पाशी संबंधित अपेक्षांमुळे अनेक क्षेत्रे आणि शेअर्समध्ये खरेदी वाढली आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन जुलैच्या अखेरीस 2024-25 चा सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर करू शकतात. उत्पादन लिंक्ड इन्सेंटिव्हज (PLI) योजनेच्या कक्षेत आणखी अनेक क्षेत्रे आणली जातील अशी अपेक्षा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Retirement Plan : मोठी बातमी! अमित शहांनी सांगितला ‘रिटारयमेंट प्लॅन'

Thane News: संतापजनक! शाळेच्या टॉयलेटमध्ये रक्त दिसलं, मासिक पाळीच्या संशयातून मुलींना विवस्त्र केलं अन्...; ठाण्यातील प्रकारानं खळबळ

Bhoom Crime : भूममध्ये कत्तलीसाठी जाणारी १६ जणावरे पकडली, आठ लाखाचा मुद्देमाल जप्त

Lungs Health Tips: थोडं चाललं तरी धाप लागते? श्वास घेताना त्रास होतोय? जाणून घ्या तज्ज्ञांनी सांगितलेले ५ सोपे घरगुती उपाय!

Bike Accident : दोन दुचाकींची समोरासमोर धडक; १ जण ठार, तर ३ जण जखमी

SCROLL FOR NEXT