Share Market Today Sensex, Nifty 50 hit fresh record highs; smallcaps falter Share Market Today
Share Market

Share Market Closing: ऑटो शेअर्सच्या जोरावर बाजारातील अनेक विक्रम मोडले, मार्केट कॅप 400 लाख कोटींच्या पुढे

Share Market Today: सोमवारी शेअर बाजारात नवा विक्रम झाला. प्रमुख बाजार निर्देशांक सर्वकालीन उच्चांकावर व्यवहार करत होते. ऑटो आणि रियल्टी निर्देशांकात झालेल्या वाढीमुळे बाजारात तेजी होती. आज पहिल्यांदाच सेन्सेक्सने 74670 आणि निफ्टीने 22630 चा आकडा पार केला.

राहुल शेळके

Share Market Closing Latest Update 8 April 2024: सोमवारी शेअर बाजारात नवा विक्रम झाला. प्रमुख बाजार निर्देशांक सर्वकालीन उच्चांकावर व्यवहार करत होते. ऑटो आणि रियल्टी निर्देशांकात झालेल्या वाढीमुळे बाजारात तेजी होती. आज पहिल्यांदाच सेन्सेक्सने 74670 आणि निफ्टीने 22630 चा आकडा पार केला. आयशर मोटर्स आणि मारुती हे निफ्टीमध्ये सर्वाधिक वाढले आहेत, तर अपोलो हॉस्पिटल सर्वाधिक घसरला आहे.

Share Market Today

क्षेत्रीय निर्देशांकाची स्थिती

सोमवारी शेअर बाजारात निफ्टी आयटी आणि बीएसई स्मॉल कॅप निर्देशांक वगळता इतर सर्व क्षेत्रीय निर्देशांक वाढीसह व्यवहार करत होते. निफ्टी ऑटो इंडेक्स दोन टक्क्यांहून अधिक वाढला, तर मिडकॅप 100 निर्देशांक किरकोळ वाढला. निफ्टी बँक, निफ्टी फार्मा, निफ्टी एफएमसीजी आणि निफ्टी फायनान्शियल सर्व्हिसेस निर्देशांकही वाढीसह बंद झाले.

Share Market Today

शेअर बाजाराने दोन नवे विक्रम केले

शेअर बाजाराने आजच्या बंपर वाढीसह दोन नवे विक्रम केले आहेत. एकीकडे सेन्सेक्स-निफ्टीने नवा उच्चांक गाठला आहे, तर दुसरीकडे शेअर बाजारात सर्व कंपन्यांचे एकूण मार्केट कॅप प्रथमच 400 लाख कोटी रुपयांच्या पुढे गेले आहे. ऑटो आणि मेटल शेअर्स शेअर बाजारात सर्वाधिक तेजीत होते.

S&P BSE SENSEX

कोणते शेअर्स वाढले?

सोमवारी शेअर बाजारातील सर्वाधिक तेजीत आयशर मोटर्सचे शेअर्स होते. हा शेअर चार टक्क्यांहून अधिक वाढला. मारुती सुझुकी, महिंद्रा, एनटीपीसी, एसबीआय लाईफ, जेएसडब्ल्यू स्टील आणि ग्रासिम इंडस्ट्रीजच्या शेअर्समध्येही चांगली वाढ झाली.

शेअर बाजारातील टॉप लूजर्समध्ये अदानी पोर्ट्स, नेस्ले इंडिया, अपोलो हॉस्पिटल, विप्रो, सन फार्मा, एलटीआय माइंडट्री आणि एचसीएल टेक या कंपन्यांचे शेअर्स होते.

गुंतवणूकदारांनी 1.55 लाख कोटी कमावले

BSE वर कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल आज 8 एप्रिल रोजी वाढून 400.86 लाख कोटी रुपये झाले, जे त्याच्या आधीच्या ट्रेडिंग दिवशी म्हणजे शुक्रवारी 5 एप्रिल रोजी 399.31 लाख कोटी रुपये होते.

अशा प्रकारे, BSE मध्ये कंपन्यांचे मार्केट कॅप आज सुमारे 1.55 लाख कोटी रुपयांनी वाढले आहे. किंवा दुसऱ्या शब्दांत, गुंतवणूकदारांच्या संपत्तीत सुमारे 1.55 लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Health Insurance : आरोग्य विम्यावर ‘जीएसटी’चा भार; सर्वसामान्यांचे बिघडतेय आर्थिक गणित

Maharashtra Rain Update : महाराष्ट्रावर अतिमुसळधार पावसाचे संकट, पुढील 24 तास महत्वाचे; हवामान विभागाचा हाय अलर्ट

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : महाराष्ट्रापुढील सर्व संकटे दूर करण्याची शक्ती पांडुरंगाने द्यावी- देवेंद्र फडणवीस

Beed News: परळीतील गोळीबार खून प्रकरणात न्यायालयाचा मोठा निर्णय ,आरोपींना मिळणार नाही जामीन!

Ashadhi Ekadashi 2025 Special Recipe: आषाढी एकादशीनिमित्त उपवासाला बनवा खास अन् स्वादिष्ट पॅटिस, सोपी आहे रेसिपी

SCROLL FOR NEXT