Share Market Today Sakal
Share Market

Share Market Closing: शेअर बाजार घायाळ; सेन्सेक्स 1 टक्क्यांनी घसरला, गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान

Share Market Today: आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शुक्रवारी देशांतर्गत बाजाराची जोरदार सुरुवात झाली, मात्र त्यानंतर वरच्या स्तरावरून बाजारात मोठी घसरण झाली. सेन्सेक्स 1 टक्क्यांहून अधिक घसरला आणि निफ्टीही 300 हून अधिक अंकांनी घसरला.

राहुल शेळके

Share Market Closing Latest Update 3 May 2024: आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शुक्रवारी देशांतर्गत बाजाराची जोरदार सुरुवात झाली, मात्र त्यानंतर वरच्या स्तरावरून बाजारात मोठी घसरण झाली. सेन्सेक्स 1 टक्क्यांहून अधिक घसरला. सेन्सेक्स 732.96 अंकांनी घसरला आणि 73878.15 अंकांवर बंद झाला. निफ्टीही 172.35 अंकांनी घसरून 22475.85 अंकांवर बंद झाला.

बीएसईवर कंपन्यांचे मार्केट कॅप देखील सुमारे 4.25 लाख कोटी रुपयांनी कमी झाले आहे. गुंतवणूकदारांना सुमारे 4 लाख कोटी रुपयांचा फटका बसला आहे. ही घसरण केवळ भारतापुरती मर्यादित नव्हती.

आशियातील सर्व शेअर बाजारांचीही मोठी घसरण झाली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज, एल अँड टी, एचडीएफसी बँक आणि भारती एअरटेल यांच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली. त्याचा परिणाम संपूर्ण बाजारपेठेवर दिसून आला.

Share Market Today

कोणते शेअर्स तेजीत?

शुक्रवारी निफ्टीचे सर्व क्षेत्रीय निर्देशांक घसरणीसह बंद झाले. निफ्टीच्या फार्मा निर्देशांकात किंचित वाढ झाली आहे. शेअर बाजारातील टॉप गेनर्समध्ये कोल इंडिया, ग्रासिम, ओएनजीसी, डॉ. रेड्डीज, हिंदाल्को, अपोलो हॉस्पिटल आणि बजाज फिनसर्व्हचे शेअर्स तेजीत होते. तर लार्सन, मारुती सुझुकी, नेस्ले, रिलायन्स, भारती एअरटेल, कोटक बँक आणि एचडीएफसीचे शेअर्स घसरणीसह बंद झाले.

Share Market Today

ओएनजीसी, आयसीआयसीआय बँकेचे शेअर्स वधारले

चालू आठवड्यातील शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी शुक्रवारी शेअर बाजारात मोठी घसरण झाली. शेअर बाजारातील व्यवहाराच्या शेवटी ओएनजीसी, इन्फोसिस आणि आयसीआयसीआय बँकेचे शेअर्स किरकोळ वाढीसह बंद झाले, तर विप्रो, बीईएल, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, एचसीएल टेक, एचडीएफसी बँक, कोटक महिंद्रा बँक, एशियन पेंट्स आणि लार्सन अँड टुब्रो यांचे शेअर्स घसरणीसह बंद झाले.

S&P BSE SENSEX

गुंतवणूकदारांचे चार लाख कोटींचे नुकसान

शुक्रवारी शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदारांचे चार लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज आणि एचडीएफसी बँक सारख्या मोठ्या शेअर्समध्ये झालेल्या विक्रीमुळे बाजारात विक्री सुरू झाली. भारतीय बाजारातील उच्च स्तरावरून नफा बुकिंगमुळे शेअर बाजारात घसरण झाली.

शेअर बाजारातील घसरणीमागील मुख्य कारणे:

हेवीवेट स्टॉक्समध्ये नफा बुकिंग

आजच्या घसरणीमागे हेवीवेट शेअर्समधील नफा बुकिंग हे प्रमुख कारण असल्याचे बाजारातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे. हेवीवेट शेअर्समध्ये नफा बुकिंग केल्यामुळे बाजाराला सुरुवातीच्या नफ्यावरच तोटा झाला आणि निर्देशांक घसरले.

सेन्सेक्स शेअर्स बद्दल बोलायचे झाल्यास, रिलायन्स इंडस्ट्रीज, मारुती सुझुकी, लार्सन अँड टुब्रो, भारती एअरटेल आणि नेस्ले इंडिया या सर्व शेअर्समध्ये 2 टक्क्यांहून अधिक घसरण झाली आणि ते टॉप-5 लूजर्समध्ये सामील झाले.

लोकसभा निवडणुकीच्या निकालापूर्वीची चिंता

शुक्रवारच्या घसरणीमागील महत्त्वाचे कारण लोकसभा निवडणुकीच्या निकालापूर्वीची अस्वस्थता असल्याचे बाजारातील जाणकारांचे म्हणणे आहे. पहिल्या दोन टप्प्यांमध्ये कमी मतदानामुळे निवडणुकीचे निकाल बाजाराच्या अपेक्षेपेक्षा थोडे वेगळे असू शकतात ही भीती थोडी वाढली आहे.

आशियाई बाजारात घसरण

केवळ डी-सेंटच नाही तर अनेक प्रमुख आशियाई निर्देशांक घसरणीसह व्यवहार करत होते. यापैकी जपानी निक्केई 37 अंकांनी किंवा 0.10% घसरून 38,236.07 वर होता. चीनचा शांघाय कंपोझिट 0.26% घसरून 3,104.82 वर व्यापार करत होता. त्याचप्रमाणे दक्षिण कोरियाचा कोस्पीही 0.30 टक्क्यांनी घसरला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT