Share Market Opening Sakal
Share Market

Share Market Opening: शेअर बाजार घसरणीसह उघडले; निफ्टी बँक सलग 9व्या दिवशी लाल रंगात, कोणते शेअर्स तेजीत?

Sensex-Nifty Today: सोमवारी (13 मे) बाजाराची सुरुवात काहीशा घसरणीने झाली. बँक निफ्टी सलग 9व्या दिवशी लाल रंगात उघडले. निफ्टी 22,000च्या खाली आला आहे. निफ्टी जवळपास 30 अंकांच्या घसरणीसह 22,027 वर उघडला.

राहुल शेळके

Share Market Opening Latest Update 13 May 2024 (Marathi News): सोमवारी (13 मे) बाजाराची सुरुवात थोड्या घसरणीने झाली, मात्र त्यानंतर बाजारात मोठी घसरण सुरू झाली. बँक निफ्टी सलग 9व्या दिवशी लाल रंगात होता. निफ्टी 21,900 च्या पातळीवर आला. सेन्सेक्स 580 अंकांनी घसरला. निफ्टी जवळपास 30 अंकांच्या घसरणीसह 22,027 वर उघडला. मागील बंदच्या तुलनेत सेन्सेक्स 188 अंकांच्या घसरणीसह सुमारे 72,776 वर उघडला. बँक निफ्टी 47,400च्या वर उघडला.

Sensex Today

सेन्सेक्सचे शेअर्स वाईट स्थितीत

BSE सेन्सेक्समधील 30 शेअर्सपैकी 25 शेअर्स घसरत आहेत आणि केवळ 5 शेअर्स वरच्या पातळीवर व्यवहार करत आहेत. टाटा मोटर्स सर्वात जास्त 6.68 टक्क्यांनी घसरला आहे आणि जेएसडब्ल्यू स्टील, मारुती, एसबीआय, टाटा स्टील हे सर्व एक टक्का किंवा त्याहून अधिक घसरत आहेत.

निफ्टीचे चित्रही उत्साहवर्धक नाही

NSE निफ्टीच्या 50 शेअर्सपैकी 37 शेअर्स घसरणीसह व्यवहार करत आहेत आणि केवळ 13 शेअर्स तेजीसह व्यवहार करत आहेत. टाटा मोटर्स देखील निफ्टीचा टॉप लूसर आहे आणि तो 7 टक्क्यांहून अधिक घसरला आहे. बीपीसीएल, हिंदाल्को, ओएनजीसी आणि जेएसडब्ल्यू स्टीललाही याचा सर्वाधिक फटका बसला आहे.

Nifty Today

ऑटो इंडेक्समध्ये सर्वात मोठी घसरण दिसून आली आणि टाटा मोटर्स व्यतिरिक्त, आयशर मोटर्स आणि हीरो मोटो कॉर्प घसरणीसह उघडले. फार्मा क्षेत्रात काही खरेदी दिसून येत आहे आणि सिप्ला आणि सन फार्माचे शेअर्स वाढीसह उघडले. चांगल्या निकालाचा परिणाम सिप्लामध्ये दिसून येत असून त्यात 5.70 टक्के वाढ दिसून येत आहे.

S&P BSE SENSEX

अदानी समुहाचे दोन शेअर्स अदानी पोर्ट्स आणि अदानी एंटरप्रायझेसही तेजीत आहेत. आयटी आणि बँकिंग निर्देशांक घसरले आहेत. अमेरिकन बाजार शुक्रवारी सकारात्मक बंद झाले होते आणि सोमवारी रात्री डाऊ जोन्स फ्युचर्स देखील सकारात्मक होते, परंतु आज आशियाई बाजारात घसरण दिसून आली.

आर्थिक डेटामध्ये चीनमधील मंदीची चिन्हे आणि अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी जगातील दुसऱ्या क्रमांकाच्या अर्थव्यवस्थेतील काही वस्तूंवर शुल्क वाढवण्याची योजना आखल्यानंतर आशियाई शेअर्स घसरले आहेत.

'या' कंपन्यांचे चौथ्या तिमाहीचे निकाल आज जाहीर होणार आहेत

झोमॅटो, आदित्य बिर्ला कॅपिटल, अलेम्बिक, सेरा सॅनिटरीवेअर, चॅलेट हॉटेल्स, डीएलएफ, इलेक्ट्रोस्टील कास्टिंग्ज, जीआयसी हाऊसिंग फायनान्स, इंड स्विफ्ट लॅब्स, जिंदाल स्टील, मनाली पेट्रोकेमिकल, मॅपमायइंडिया, सनोफी इंडिया, ट्यूब इन्व्हेस्टमेंट्स आणि वरुण ऑफ इंडिया, यूपीएल बेव्हरेजेस या कंपन्या चौथ्या तिमाहीचे निकाल जाहीर करणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sahyadri Tiger Reserve : वाघांची डरकाळी सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात घुमणार, आणखी आठ वाघ वास्तव्यास येणार; केंद्र-राज्य शासनाचा निर्णय

PM Narendra Modi : 'ऑपरेशन सिंदूर' वेळी कॉंग्रेस पाकिस्तानच्या लष्कराच्या पाठिशी; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हल्लाबोल

१६ वर्षांच्या भावाला आणून द्या आणि सामना खेळवा; पहलगाम हल्ल्यात मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांचा भारत-पाकिस्तान मॅचला विरोध

Pune Traffic Update : पादचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी शास्त्रीनगर चौकात उपाययोजना; वाहतूक कोंडीवर तोडगा

Video : शुभांशु शुक्लांनी सांगितलं, अंतराळात व्यायाम कसा करतात? तशीच आसने पृथ्वीवर केल्यास शरीराला कोणते फायदे होतात, जाणून घ्या

SCROLL FOR NEXT