Share Market Latest Update Sakal
Share Market

Share Market Opening: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; अमेरिकन बाजारात वाढ, कोणते शेअर्स तेजीत?

Share Market Today: देशांतर्गत शेअर बाजार तेजीसह उघडले. बेंचमार्क निर्देशांक सुरुवातीच्या व्यवहारात सपाट दिसत होते, परंतु यानंतर सेन्सेक्स 132 अंकांच्या वाढीसह 73,237 वर उघडला.

राहुल शेळके

Share Market Opening Latest Update 15 May 2024: देशांतर्गत शेअर बाजार तेजीसह उघडले. बेंचमार्क निर्देशांक सुरुवातीच्या व्यवहारात सपाट दिसत होते, परंतु यानंतर सेन्सेक्स 132 अंकांच्या वाढीसह 73,237 वर उघडला. निफ्टी 58 अंकांच्या वाढीसह 22,276 वर उघडला. निफ्टी बँक देखील 47,900 च्या वर उघडला. सिप्ला, भारती एअरटेल, एनटीपीसी, थरमॅक्समध्ये सर्वाधिक वाढ दिसून आली आहे.

अमेरिकन बाजार एका दिवसाच्या घसरणीनंतर, डाऊ जोन्स इंडस्ट्रियल 125 अंकांच्या उसळीसह बंद झाला आणि नॅस्डॅक 0.75% वाढून विक्रमी उच्चांक गाठला.

Share Market Opening

कोणते शेअर्स तेजीत?

सेन्सेक्समधील 30 शेअर्सपैकी 20 शेअर्समध्ये वाढ तर 10 शेअर्स घसरत आहेत. सेन्सेक्समध्ये सर्वाधिक वाढ करणाऱ्यांपैकी NTPC 1.66 टक्क्यांनी आणि टाटा स्टील 1.18 टक्क्यांनी वर आहे. भारती एअरटेल, पॉवरग्रिड, आयटीसी, एसबीआयच्या शेअर्समध्ये वाढ होताना दिसत आहे. सेन्सेक्सच्या सर्वाधिक घसरणीत JSW स्टीलचा शेअर आहे. सन फार्मा, एचडीएफसी बँक, अल्ट्राटेक सिमेंट, मारुती आणि एशियन पेंट्सच्या शेअर्समध्ये घसरण दिसून येत आहे.

Share Market Opening

निफ्टीच्या 50 शेअर्सपैकी 36 शेअर्समध्ये वाढ तर 14 शेअर्स घसरत आहेत. सिप्ला शेअर्स तीन टक्क्यांहून अधिक तर कोल इंडिया 2.25 टक्क्यांपेक्षा जास्त वाढले आहेत. अदानी एंटरप्रायझेस, हिंदाल्को आणि एनटीपीसीचे शेअर्स वधारत आहेत.

S&P BSE SENSEX

गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 1.64 लाख कोटींची वाढ

एक ट्रेडिंग दिवस आधी म्हणजेच 14 मे 2024 रोजी, BSE वर सर्व शेअर्सचे एकूण मार्केट कॅप 4,01,90,904.50 कोटी रुपये होते. आज म्हणजेच 15 मे 2024 रोजी बाजार उघडताच ते 4,03,54,948.31 कोटी रुपयांवर पोहोचले. याचा अर्थ गुंतवणूकदारांच्या भांडवलात 1,64,043.81 कोटी रुपयांची वाढ झाली आहे.

आज 3194 शेअर्समध्ये वाढ तर 2403 शेअर्समध्ये घसरण दिसून येत आहे. 691 शेअर्समध्ये घसरण होत असून 100 शेअर्स कोणत्याही बदलाशिवाय व्यवहार करत आहेत. 101 शेअर्समध्ये 52 आठवड्यांची उच्च पातळी तर 13 शेअर्समध्ये 52 आठवड्यांची नीचांकी पातळी दिसून येत आहे. 162 शेअर्सवर अप्पर सर्किट आणि 51 शेअर्सवर लोअर सर्किट आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 3rd Test: KL Rahul ने झेल सोडला! शुभमन गिल अम्पायरसोबत भांडला; Umpire ने मागे ढकलले अन् म्हणाले, जा...

Valhe News : बँकेबाहेर विसरलेली सव्वा लाखाची रोकड असलेली पिशवी दांपत्यास केली परत

Video: बापरे! प्रार्थना बेहरेच्या पायाला गंभीर दुखापत, व्हिडिओ शेअर करत म्हणाली...'तुमच्या आशिर्वादाची...'

Viral Video: हत्तीच्या बाळाची टरबूज मागण्याची क्यूट अदा, हृदयस्पर्शी व्हिडिओने जिंकली नेटकऱ्यांची मने

Thane Crime: कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनांमध्ये वाढ, धक्कादायक आकडेवारी समोर

SCROLL FOR NEXT