Share Market Today Sakal
Share Market

Share Market Closing: अर्थसंकल्पाच्या दुसऱ्या दिवशी शेअर बाजाराचा मूड बिघडला; सेन्सेक्स-निफ्टी घसरणीसह बंद

Share Market Closing Today: अर्थसंकल्पाच्या दुसऱ्या दिवशीच्या व्यापार सत्रातही जोरदार विक्री दिसून आली. या विक्रीचे नेतृत्व बँकिंग आणि एफएमसीजी क्षेत्रातील शेअर्सनी केले. मात्र, मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समध्ये जोरदार खरेदी दिसून आली.

राहुल शेळके

Share Market Closing Latest Update 24 July 2024: भारतीय शेअर बाजार बुधवारी (24 जुलै) घसरणीसह बंद झाले. निफ्टी 24350च्या जवळपास 125 अंकांनी घसरला आणि सेन्सेक्सही 80 हजारांच्या खाली गेला. बँक, वित्त, एफएमसीजी आणि वाहन शेअर्सवर दबाव दिसून आला.

अर्थसंकल्पाच्या दुसऱ्या दिवशीच्या व्यापार सत्रातही जोरदार विक्री दिसून आली. या विक्रीचे नेतृत्व बँकिंग आणि एफएमसीजी क्षेत्रातील शेअर्सनी केले. मात्र, मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समध्ये जोरदार खरेदी दिसून आली.

Share Market Closing

आजच्या व्यवहाराअंती BSE सेन्सेक्स 280 अंकांच्या घसरणीसह 80,149 अंकांवर बंद झाला तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 65 अंकांच्या घसरणीसह 24,413 अंकांवर बंद झाला.

अर्थसंकल्पात भांडवली नफा कर वाढीनंतर बँक आणि इतर वित्तीय शेअर्सनी सेन्सेक्स आणि निफ्टीला खाली खेचले, परंतु फायनान्स बिलात काहीही बदल झाले नसल्याप्रमाणे स्मॉलकॅप आणि मिडकॅप्स वाढतच राहिले.

Share Market Closing

क्षेत्रीय निर्देशांकाची स्थिती

आजच्या ट्रेडिंग सत्रात आयटी, फार्मा, मीडिया, एनर्जी, कंझ्युमर ड्युरेबल्स, हेल्थकेअर, ऑइल अँड गॅस, रिअल इस्टेट आणि ऑटो शेअर्स वाढीसह बंद झाले. तर बँकिंग आणि एफएमसीजी क्षेत्रातील शेअर्समध्ये विक्री दिसून आली.

मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समधील खरेदीमुळे निफ्टीचा मिडकॅप निर्देशांक 587 अंकांच्या वाढीसह 56,872 अंकांवर बंद झाला, तर निफ्टीचा स्मॉलकॅप निर्देशांक 323 अंकांच्या वाढीसह बंद झाला. सेन्सेक्समधील 30 शेअर्सपैकी 10 शेअर्स वाढीसह आणि 20 शेअर्स घसरणीसह बंद झाले.

BSE SENSEX

गुंतवणूकदारांच्या संपत्तीत वाढ

सेन्सेक्स-निफ्टीमध्ये घसरण होऊनही मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्सच्या वाढीमुळे शेअर बाजाराचे बाजार भांडवल वाढीसह बंद झाले. बीएसईवर शेअर्सचे बाजार भांडवल 449.75 लाख कोटी रुपयांवर बंद झाले, जे गेल्या ट्रेडिंग सत्रात 446.80 लाख कोटी रुपयांवर बंद झाले होते. म्हणजेच आजच्या सत्रात बाजार भांडवलात 2.95 लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे.

सेन्सेक्सचे कोणते शेअर्स वाढले?

आज BSE सेन्सेक्समधील 30 शेअर्सपैकी 10 शेअर्स वाढीसह बंद झाले. यामध्येही टेक महिंद्राच्या शेअर्समध्ये सर्वाधिक 3.01 टक्के वाढ झाली आहे. यानंतर एनटीपीसी, टाटा मोटर्स, सन फार्मा आणि पॉवर ग्रिडचे शेअर्स सर्वात जास्त वाढले.

सेन्सेक्समधील उर्वरित 20 शेअर्स आज घसरणीसह बंद झाले. यामध्येही बजाज फिनसर्व्हचे शेअर्स 2.03 टक्क्यांनी घसरले. याशिवाय बजाज फायनान्स, हिंदुस्तान युनिलिव्हर (एचयूएल), कोटक महिंद्रा बँक आणि अदानी पोर्ट्सचे शेअर्स लाल रंगात बंद झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bageshwar Dham Update : Video - बागेश्वर धामबद्दल मोठी बातमी, सर्व कार्यक्रम रद्द ; आता धीरेंद्र शास्त्रींनी केले ‘हे’ आवाहन!

मन, मेंदू आणि आपण

हौस ऑफ बांबू : सहासष्ट आणि नव्याण्णव..!

एनटीपीसी प्रकल्पग्रस्त मिथूनची आत्महत्या! खासदार प्रणिती शिंदेंच्या समजुतीनंतर १२ तासांनंतर नातेवाईकांनी मृतदेह घेतला ताब्यात, प्रणिती म्हणाल्या....

Pune News : एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'च्या घोषणेने वादाला तुटले तोंड

SCROLL FOR NEXT