Share Market Latest Update  Sakal
Share Market

Share Market Closing: विक्रमी उच्चांकानंतर शेअर बाजारात प्रॉफिट बुकिंग; कोणते शेअर्स घसरले?

Share Market Closing Today: भारतीय शेअर बाजारात, गुरुवारी (19 सप्टेंबर) विक्रमी उच्चांकी नोंद झाली, परंतु दिवसभरात नफा बुकिंगने बाजारावर वर्चस्व गाजवले. बेंचमार्क निर्देशांक त्यांच्या विक्रमी उच्चांकावरून घसरले.

राहुल शेळके

Share Market Closing Latest Update 19 September 2024: भारतीय शेअर बाजारात, गुरुवारी (19 सप्टेंबर) विक्रमी उच्चांकाची नोंद झाली, परंतु दिवसभरात प्रॉफिट बुकिंगने बाजारावर वर्चस्व गाजवले. बेंचमार्क निर्देशांक त्यांच्या विक्रमी उच्चांकावरून घसरले. चांगली गोष्ट म्हणजे निफ्टी 25,400 च्या वर बंद झाला.

सेन्सेक्सही 300 हून अधिक अंकांच्या वाढीसह बंद झाला. यूएस फेडने दर कपात केल्यामुळे मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांक घसरले. व्यवहाराअंती बीएसई सेन्सेक्स 236.57 अंकांच्या उसळीसह 83,184.30 वर बंद झाला आणि राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 38.25 अंकांच्या उसळीसह 25,415.80 अंकांवर बंद झाला.

Share Market Closing

क्षेत्रीय निर्देशांकाची स्थिती

आजच्या व्यवहारात बँकिंग, ऑटो, एफएमसीजी, रिअल इस्टेट, कंझ्युमर ड्युरेबल्स क्षेत्रातील शेअर्स वाढीसह बंद झाले. तर आयटी, फार्मा, हेल्थकेअर, ऑइल अँड गॅस, एनर्जी आणि मीडिया शेअर्स घसरले.

निफ्टीचा मिड-कॅप निर्देशांक दिवसाच्या उच्चांकावरून 1850 अंकांनी घसरला होता, तर स्मॉल कॅप निर्देशांक 680 अंकांनी घसरला होता. दोन्ही निर्देशांक खालच्या पातळीवरून सावरले. आणि मिड-कॅप निर्देशांक 400 अंकांनी आणि स्मॉल कॅप निर्देशांक 245 अंकांनी घसरला.

Share Market Closing

कोणते शेअर्स तेजीत?

आजच्या व्यवहारात बीएसईवर 4075 शेअर्सचे व्यवहार झाले. ज्यामध्ये 1249 शेअर्स वाढीसह बंद झाले तर 2732 शेअर्स घसरणीसह बंद झाले. बीएसई सेन्सेक्सच्या 30 शेअर्सपैकी 19 शेअर्स वाढीसह बंद झाले आणि 11 शेअर्स घसरणीसह बंद झाले. तर निफ्टीच्या 50 शेअर्सपैकी 27 शेअर्स वाढीसह आणि 23 शेअर्स घसरणीसह बंद झाले.

BSE SENSEX

वाढत्या शेअर्समध्ये एनटीपीसी 2.45 टक्क्यांनी, कोटक महिंद्रा बँक 1.82 टक्क्यांनी, टायटन 1.56 टक्क्यांनी, नेस्ले 1.51 टक्क्यांनी, एचयूएल 1.21 टक्क्यांनी, मारुती सुझुकी 0.99 टक्क्यांनी, एचडीएफसी बँक 0.81 टक्क्यांनी वाढीसह बंद झाले.

तर अदानी पोर्ट्स 1.30 टक्के, एलअँडटी 1.26 टक्के, टीसीएस 1.14 टक्के, जेएसडब्ल्यू स्टील 0.91 टक्के, एचसीएल टेक 0.86 टक्के, टाटा स्टील 0.66 टक्के, टेक महिंद्रा 0.64 टक्के घसरणीसह बंद झाले.

गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान

शेअर बाजार भलेही वाढीसह बंद झाला असेल, परंतु मिड-कॅप आणि स्मॉल-कॅप शेअर्सच्या घसरणीमुळे गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान झाले आहे. बीएसईवर शेअर्सचे मार्केट कॅप 465.69 लाख कोटी रुपयांवर बंद झाले, जे मागील सत्रात 467.72 लाख कोटी रुपयांवर बंद झाले होते. म्हणजेच आजच्या सत्रात गुंतवणूकदारांचे 2.03 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Education Decision: राज्य शासनाचा महत्त्वाचा निर्णय! आरटीई प्रवेशाची अंतराची अट अखेर रद्द; पालकांना २५ मार्चपर्यंत अर्जाची संधी!

CJI SuryaKant यांचा मोठा निर्णय! कोर्टातील ‘काळे कोट’ संपणार? नावही बदलणार, मोठा बदल लवकरच!

Latest Marathi News Live Update : नाशिकच्या तपोवन वृक्ष तोडप्रकरणी आज मुंबई उच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी

Beed Forest Department News: वन विभागात टक्केवारीचा खेळ; बोगस बिलांमुळे कोट्यवधींचा गैरव्यवहार?; सामाजिक कार्यकर्त्यांचा मोठा आरोप

Deepak Dalvi Death : मराठी अस्मितेचा ढाण्या वाघ हरपला! म. ए. समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांचे निधन; काही महिन्यांपूर्वीच शरद पवार, जयंत पाटलांनी घेतली होती भेट

SCROLL FOR NEXT