Share Market Opening Sakal
Share Market

Share Market Opening: सुस्त सुरुवातीनंतर बाजाराने मोडला विक्रम; निफ्टीने पहिल्यांदाच पार केला 23,000चा टप्पा

Share Market Today: देशांतर्गत शेअर बाजारांमध्ये कालच्या विक्रमी वाढीनंतर शुक्रवारची सुरुवात किंचित घसरणीसह झाली. बाजार भावनिक पातळीच्या जवळ उघडले. निफ्टी 50 अंकांवर असला तरी बाजार लाल चिन्हावरून हिरव्या चिन्हाकडे जाण्याचा प्रयत्न करताना दिसला.

राहुल शेळके

Share Market Opening Latest Update 24 May 2024: देशांतर्गत शेअर बाजारांमध्ये कालच्या विक्रमी वाढीनंतर शुक्रवारची सुरुवात किंचित घसरणीसह झाली. निफ्टी 50 अंकांवर असला तरी बाजार लाल चिन्हावरून हिरव्या चिन्हाकडे जाण्याचा प्रयत्न करताना दिसला. सेन्सेक्स 83 अंकांनी घसरला आणि 75,335 वर उघडला. निफ्टी 37 अंकांच्या घसरणीसह 22,930 वर उघडला.

पण बाजाराने लगेचच विक्रमी उच्चांकाकडे वाटचाल सुरू केली. सकाळी 9.30 च्या आधीच सेन्सेक्सने पहिल्यांदाच 75,500 चा टप्पा ओलांडला आणि निफ्टीनेही सर्वकालीन उच्चांक गाठला. निफ्टीने पहिल्यांदाच 23,000 चा टप्पा पार केला. मिडकॅप निर्देशांकानेही नवीन विक्रमी उच्चांक गाठला.

Share Market Opening

बीएसई सेन्सेक्समधील 30 शेअर्सपैकी 11 शेअर्समध्ये वाढ आणि 19 शेअर्स घसरत आहेत. L&T हा टॉप गेनर आहे आणि त्यासोबत बजाज फायनान्स, एसबीआय, विप्रो, भारती एअरटेल आणि टाटा स्टीलच्या शेअर्समध्येही वाढ होत आहे. घसरलेल्या शेअर्समध्ये सन फार्मा, टीसीएस, आयसीआयसीआय बँक, एम अँड एम आणि टायटनचे शेअर्स घसरले आहेत.

Share Market Opening

बँक निफ्टी आज 50,000 च्या जवळ पोहोचला

बँक निफ्टीने आज 48,976.70 ची उच्च पातळी गाठली होती आणि अशा प्रकारे तो प्रथमच 50 हजारांच्या ऐतिहासिक पातळीच्या जवळ आला होता. सध्या बँक निफ्टीच्या 12 पैकी 7 शेअर्स वाढीसह तर 5 शेअर्स घसरणीसह व्यवहार करत आहेत.

बीएसईचे बाजार भांडवल विक्रमी उच्चांकावर

बीएसईचे बाजार भांडवल विक्रमी उच्चांकावर पोहचले आहे. प्रथमच, ते 421.09 लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे आणि अशा प्रकारे प्रथमच बीएसईने 420 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त मार्केट कॅप गाठले आहे.

S&P BSE SENSEX

सध्या बीएसईवर 3129 शेअर्सचे व्यवहार होत आहेत, त्यापैकी 1743 शेअर्स वाढत आहेत. घसरणाऱ्या शेअर्सची संख्या 1263 असून 123 शेअर्समध्ये कोणताही बदल झालेला नाही. 101 शेअर्सवर अप्पर सर्किट आणि 61 शेअर्सवर लोअर सर्किट लागू करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cough Syrup: नऊ चिमुकल्यांचा मृत्यू पण एकही पोस्टमार्टेम का नाही? कफ सीरप प्रकरणात धक्कादायक खुलासा, नेमकं काय घडलं?

Shakti Cyclone: चक्रीवादळ ‘शक्ती’चा तडाखा बसणार! नेमकं काय आहे हे आणि किती घातक असेल? याचं नाव कुणी ठेवलं? वाचा...

IND vs AUS Full Schedule: भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याचे संपूर्ण वेळापत्रक ! वाचा कधी, कुठे, केव्हा खेळणार; वेळ व Live Telecast

Madhya Pradesh : मध्य प्रदेशातील शेतकऱ्यांना दसऱ्यालाच मिळालं दिवळीचं सुपर गिफ्ट; CM यादवांनी शेतकऱ्यांना दिले 653.34 कोटी

मोठी बातमी : भारतीय संघात राहायचा असेल तर... Rohit Sharma, विराट कोहली यांच्यासमोर अजित आगरकरने ठेवली अट

SCROLL FOR NEXT