Sensex Today Updates Sakal
Share Market

Share Market: निफ्टी ऐतिहासिक उच्चांकावर, सेन्सेक्सने केला 75 हजारांचा टप्पा पार, निवडणुकी दरम्यान बाजाराने केला नवा विक्रम

Share Market: निवडणूक निकाल येऊ द्या, बाजार आपले सर्व विक्रम मोडेल, असे पंतप्रधान मोदींनी माध्यमांशी संवाद साधताना म्हटले होते. शेवटच्या टप्प्यातील निवडणुकाही अद्याप झालेल्या नाहीत. बाजाराने आताच आपले रूप दाखवायला सुरुवात केली आहे.

राहुल शेळके

Share Market: निवडणूक निकाल येऊ द्या, बाजार आपले सर्व विक्रम मोडेल, असे पंतप्रधान मोदींनी माध्यमांशी संवाद साधताना म्हटले होते. शेवटच्या टप्प्यातील निवडणुकाही अद्याप झालेल्या नाहीत. बाजाराने आताच आपले रूप दाखवायला सुरुवात केली आहे. सेन्सेक्सने 75 हजारांचा टप्पा ओलांडला आहे तर निफ्टीने आतापर्यंतचा उच्चांक ओलांडला आहे. आजच्या ट्रेडिंग सत्रात निफ्टीने 22,841 चा सर्वोच्च आकडा गाठला आहे.

Share Market

निफ्टीचा विक्रमी उच्चांक

  • निफ्टीला विक्रमी उच्चांक गाठण्यासाठी 14 सत्रे लागली आहेत.

  • निफ्टी सलग 6 सत्रांमध्ये वधारत आहे

  • मार्केट कॅपमध्ये 1.4 लाख कोटी रुपयांची भर पडली

  • बँक आणि आयटीच्या जोरावर निफ्टी वाढला

  • निफ्टी मिडकॅपने 150 ने 19,568 चा विक्रमी उच्चांक गाठला

  • वित्तीय सेवा कंपन्यांनी निफ्टीच्या वाढीमध्ये 100 अंकांची भर घातली.

  • L&T, Axis Bank, ICICI बँक, HDFC बँक निफ्टीमध्ये सर्वाधिक योगदान देणारे शेअर्स

  • निफ्टी 50 मध्ये अदानी एंटरप्रायझेस, ॲक्सिस बँक टॉप गेनर्स

Share Market

शेअर बाजारातील तज्ज्ञांचे मत

बाजारात सध्या सुरू असलेल्या तेजीबाबत जिओजित फायनान्शिअल सर्व्हिसेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष गौरांग शहा म्हणाले की, निवडणुकीच्या निकालामुळे लोक गुंतवणुकीसाठी अधिक उत्सुक दिसत आहेत. यामुळे बाजार सर्वकालीन उच्चांकाला स्पर्श करत आहे. ते म्हणाले की 1 जून रोजी एक्झिट पोल आल्यानंतर बाजारात सध्या सुरू असलेल्या तेजीत स्थिरता दिसून येईल. यामध्ये अजूनही वाढ होण्याची शक्यता आहे.

S&P BSE SENSEX

शेअर बाजार उघडल्यापासूनच तेजीचा ट्रेंड

आज बाजार उघडल्यापासूनच तेजीचा ट्रेंड दिसायला लागला. बीएसईचा 30 शेअर्सचा निर्देशांक सेन्सेक्स सुरुवातीच्या व्यवहारात 41.65 अंकांनी वाढून 74,262.71 अंकांवर पोहोचला, त्यानंतर दुपारी 1 च्या सुमारास त्याने 75 हजारांचा टप्पा ओलांडला. त्याच वेळी, NSE निफ्टी 20.1 अंकांच्या वाढीसह 22,617.90 अंकांवर राहिला, जो अल्पावधीत 22,841 अंकांवर पोहोचला आणि मागील सर्व विक्रम मोडले.

जागतिक बाजार कसा आहे?

आशियाई बाजारात दक्षिण कोरियाचा कोस्पी आणि हाँगकाँगचा हँग सेंग तेजीत तर जपानचा निक्की आणि चीनचा शांघाय कंपोझिट घसरला आहे. बुधवारी अमेरिकन बाजार नकारात्मक ट्रेंडसह बंद झाले. शेअर बाजाराच्या आकडेवारीनुसार, बुधवारी भांडवली बाजारात विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांची (एफआयआय) विक्री दिसून आली आणि त्यांनी एकूण 686.04 कोटी रुपयांच्या शेअर्सची विक्री केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

WI vs AUS: ६ पावलं पळाला, स्वतःला दिलं झोकून; Pat Cummins चा अविश्वसनीय झेल, Viral Video नक्की पाहा

Miraj News : कौटुंबिक वादातून कीटकनाशक पिवून पिता पुत्राने संपविले जीवन

Vijay Pawar: बीड लैंगिक छळ प्रकरणातल्या विजय पवारचे कारनामे! RTE कायद्याला जुमानत नव्हता, सरकारी कार्यालयात घातला होता गोंधळ

Indian Railways New Menu : रेल्वे मंत्रालयानं जाहीर केलेलं नवं ‘मेन्यू कार्ड’ तुम्ही पाहिलं का?

Latest Maharashtra News Updates : सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे हायकोर्टाचे आदेश

SCROLL FOR NEXT