Share Market Updates Sensex ends 170 pts lower, Nifty gives up 21,750  Sakal
Share Market

Share Market Closing: 2023च्या शेवटच्या ट्रेडिंग सत्रात शेअर बाजार घसरणीसह बंद; कोणते शेअर्स वधारले?

Share Market Closing: शेअर बाजार शुक्रवारी घसरणीसह बंद झाला. सेन्सेक्स 170 अंकांनी घसरून 72240 वर आला. निफ्टीही 47 अंकांनी घसरून 21731 वर आला. बाजारात सर्वाधिक विक्री बँकिंग आणि आयटी क्षेत्रात नोंदवली गेली, तर वाहन क्षेत्रात खरेदीची नोंद झाली.

राहुल शेळके

Share Market Closing Latest Update 29 December 2023:

शेअर बाजार शुक्रवारी घसरणीसह बंद झाला. सेन्सेक्स 170 अंकांनी घसरून 72240 वर आला. निफ्टीही 47 अंकांनी घसरून 21731 वर आला. बाजारात सर्वाधिक विक्री बँकिंग आणि आयटी क्षेत्रात झाली, तर वाहन क्षेत्रात खरेदी झाली.

शुक्रवारी, निफ्टी मिड कॅप 100, बीएसई स्मॉल कॅप निर्देशांक वधारत होते तर निफ्टी आयटी आणि निफ्टी बँक घसरले होते. शेअर बाजारातील वाढत्या शेअर्समध्ये टाटा कंझ्युमर, टाटा मोटर्स, बजाज ऑटो आणि आयशर मोटर्सचे शेअर्स होते, तर घसरण झालेल्या शेअर्समध्ये बीपीसीएल, ओएनजीसी, एसबीआय आणि कोल इंडियाच्या शेअर्सचा समावेश होता.

शेअर बाजारातील गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर परतावा देणाऱ्या कंपन्यांमध्ये डोडला डेअरी, जेन्सॉल इंजिनिअरिंग, अशोक लेलँड, सीएमएस इन्फो सिस्टीम्स, गेटवे डिस्ट्रीपार्क्स, गार्डन रीच शिप बिल्डर, फिनोलेक्स केबल, कोरोमंडल इंटरनॅशनल, महिंद्रा हॉलिडेज, फेडरल बँक, युनी पार्ट्स इंडियाच्या शेअर्समध्ये वाढ झाली.

तर होम फर्स्ट फायनान्स, ईआयडी पॅरीच्या शेअर्समध्ये घसरण झाली. गौतम अदानींच्या नऊ कंपन्यांपैकी आठ कंपन्यांचे शेअर्स वाढले तर एनडीटीव्हीचे शेअर्स घसरले होते.

गुंतवणूकदारांनी 1.11 लाख कोटी कमावले

आज BSE वर कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल 364.11 लाख कोटी रुपयांवर पोहोचले, जे त्याच्या आधीच्या व्यवहाराच्या दिवशी म्हणजे गुरुवारी 28 डिसेंबर रोजी 363 लाख कोटी रुपये होते.

अशाप्रकारे, BSEवर कंपन्यांचे मार्केट कॅप आज सुमारे 1.11 लाख कोटी रुपयांनी वाढले आहे. किंवा दुसऱ्या शब्दांत गुंतवणूकदारांच्या संपत्तीत सुमारे 1.34 लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubman Gill: भारताच्या सर्वात मोठ्या विजयासह कर्णधार गिलने मोडला गावसकरांचा ४९ वर्षांपूर्वीचा विक्रम अन् घडवला नवा इतिहास

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT