Share Market  Sakal
Share Market

Share Market Closing: विक्रमी उच्चांक गाठल्यानंतर शेअर बाजार तेजीसह बंद; निफ्टी 25,000च्या वर, कोणते शेअर्स वाढले?

Share Market Closing Today: गुरुवारी (1 ऑगस्ट) निफ्टीने विक्रमी उच्चांक गाठल्यानंतर भारतीय शेअर बाजार वाढीसह बंद झाले. निफ्टी प्रथमच 25,000 च्या वर बंद झाला आहे. सेन्सेक्स 126 अंकांनी वधारून बंद झाला.

राहुल शेळके

Share Market Closing Latest Update 1 August 2024: गुरुवारी (1 ऑगस्ट) निफ्टीने विक्रमी उच्चांक गाठल्यानंतर भारतीय शेअर बाजार वाढीसह बंद झाले. निफ्टी प्रथमच 25,000 च्या वर बंद झाला आहे. सेन्सेक्स 126 अंकांनी वधारून बंद झाला, तर निफ्टी 50 अंकांहून अधिक वाढीसह बंद झाला.

निफ्टीने आज 25,078 ही विक्रमी पातळी गाठली होती, तर सेन्सेक्सने आज 82,129 ही विक्रमी पातळी गाठली होती. बंद होताना निफ्टी 59 अंकांनी वाढून 25,010 वर बंद झाला.

सेन्सेक्स 126 अंकांनी वाढून 81,867 वर बंद झाला. निफ्टी बँक 10 अंकांनी वाढून 51,564 वर बंद झाला. पॉवर ग्रिड, कोल इंडिया, ओएनजीसी आणि डॉ रेड्डी लॅब हे शेअर्स निफ्टीमध्ये सर्वाधिक वाढले.

Share Market Closing

क्षेत्रीय निर्देशांकाची स्थिती

आजच्या व्यवहारात एनर्जी, फार्मा, एफएमसीजी, हेल्थकेअर बँकिंग आणि ऑइल अँड गॅस क्षेत्रातील शेअर्समध्ये खरेदी दिसून आली, तर ऑटो, आयटी, कंझ्युमर ड्युरेबल्स, मेटल, रिअल इस्टेट आणि मीडिया शेअर्स घसरणीसह बंद झाले.

Share Market Closing

मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समध्ये आज तेजीला ब्रेक लागला आणि या शेअर्समध्ये प्रॉफिट बुकींग दिसून आली. सेन्सेक्समधील 30 शेअर्सपैकी 15 शेअर्स वाढीसह आणि 15 शेअर्स घसरणीसह बंद झाले. निफ्टीच्या 50 शेअर्सपैकी 28 शेअर्स वाढीसह आणि 22 शेअर्स घसरणीसह बंद झाले.

BSE SENSEX

कोणते शेअर्स तेजीत?

आजच्या व्यवहारात पॉवर शेअर्सचे वर्चस्व होते. या क्षेत्रातील शेअर्सवर नजर टाकल्यास पॉवर ग्रिड 3.73 टक्के, अदानी ग्रीन एनर्जी 3.16 टक्के, टाटा पॉवर 2.51 टक्के, ओएनजीसी 2.03  टक्के, एनटीपीसी 1.83 टक्के, रिलायन्स 0.75 टक्के वाढीसह बंद झाले.

याशिवाय एचडीएफसी बँक 1.85 टक्के, नेस्ले 1.38 टक्के, अदानी पोर्ट्स 1.07 टक्के, मारुती सुझुकी 1.01 टक्के, भारती एअरटेल 0.66 टक्के वाढीसह बंद झाले. घसरणाऱ्या शेअर्समध्ये महिंद्रा अँड महिंद्रा 2.76 टक्क्यांच्या घसरणीसह, टाटा स्टील 1.36 टक्क्यांच्या घसरणीसह, बजाज फिनसर्व्ह 1.20 टक्क्यांच्या घसरणीसह, एसबीआय 1.20 टक्क्यांच्या घसरणीसह बंद झाले.

मार्केट कॅपमध्ये घसरण

भारतीय शेअर बाजाराच्या मार्केट कॅपने बुधवारच्या ट्रेडिंग सत्रात विक्रमी उच्चांक गाठला होता, मात्र आजच्या सत्रात त्यात घसरण दिसून आली. BSE वर शेअर्सचे मार्केट कॅप 461.61 लाख कोटी रुपयांवर बंद झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Violence : बाजूलाच सर्किट बेंच, वीज खंडित, प्रचंड गोंधळ, तलवारी, पोती भरून दगडं; अपुरी पोलिस यंत्रणा, कोल्हापुरात दोन गटातील राड्याचा घटनाक्रम असा...

Shubman Gill : शुभमन गिलची स्पर्धेतून माघार; ब्लड टेस्टनंतर फिजियोने BCCI ला पाठवला अहवाल अन्...

Toll Free Scheme: ‘समृद्धी’वर चाचणीतच कटला ईव्ही वाहनांचा टोल! शासनाची घोषणा ठरली फोल, तांत्रिक अडचणी पाठ सोडेनात

Dhanashree Verma च्या सपोर्टमध्ये उतरली सूर्यकुमार यादवची पत्नी देविशा; म्हणाली, तुझ्या प्रती आदर...! नेटिझन्स म्हणायला लागले....

Latest Marathi News Updates : खड्ड्यांनी ठप्प वाहतूक! करंजाळी घाटात बससह चार वाहने अडकली

SCROLL FOR NEXT