Share Market Latest Update Sakal
Share Market

Share Market Opening: शेअर बाजार आजही सुस्त; सेन्सेक्स 79,000च्या खाली, कोणते शेअर्स घसरले?

Share Market Today: बुधवारी (14 ऑगस्ट) भारतीय शेअर बाजारांची सुस्त सुरुवात झाली. सुमारे 100 अंकांच्या वाढीसह सेन्सेक्स 79,000 च्या वर उघडला. निफ्टीही 35 अंकांच्या वाढीसह तर बँक निफ्टी 40 अंकांच्या वाढीसह उघडला.

राहुल शेळके

Share Market Opening Latest Update 14 August 2024: बुधवारी (14 ऑगस्ट) भारतीय शेअर बाजारांची सुस्त सुरुवात झाली. सुमारे 100 अंकांच्या वाढीसह सेन्सेक्स 79,000 च्या वर उघडला. निफ्टीही 35 अंकांच्या वाढीसह तर बँक निफ्टी 40 अंकांच्या वाढीसह उघडला.

बाजार उघडताच, निर्देशांकांनी नफा गमावला आणि सपाट व्यवहार केला. मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांकातही थोडीशी घसरण दिसून आली. टेक महिंद्रा, टाटा मोटर्स, हिंदाल्को, एचसीएल टेक शेअर्समध्ये वाढ झाली.

Share Market Opening

सेन्सेक्सच्या शेअर्सची स्थिती

आज सेन्सेक्समधील 30 शेअर्सपैकी 18 शेअर्स वाढीसह तर 12 शेअर्स घसरणीसह व्यवहार करत आहेत. सेन्सेक्सच्या टॉप 5 शेअर्सपैकी 3 शेअर्स आयटी क्षेत्रातील आहेत आणि एचसीएल टेक 1.58 टक्के वाढीसह आघाडीवर आहे. टेक महिंद्रा 1.20 टक्क्यांनी वर आहे.

Share Market Opening

यानंतर M&M, SBI, Tata Motors आणि TCS यांना सर्वाधिक फायदा झाला आहे. घसरलेल्या शेअर्समध्ये अल्ट्राटेक सिमेंट सर्वाधिक घसरला असून अदानी पोर्ट्स, टाटा स्टील, आयसीआयसीआय बँकेसह एचयूएलचे शेअर्स घसरले आहेत.

BSE SENSEX

निफ्टी शेअर्सची स्थिती

निफ्टीच्या 50 शेअर्सपैकी 27 शेअर्स वाढीसह व्यवहार करत आहेत आणि 23 शेअर्समध्ये घसरण होत आहे. सकाळच्या व्यवहारात, निफ्टीने 24196 चा उच्चांक गाठला आणि 2411 पर्यंत घसरला.

यामध्ये Hindalco, HCL Tech, M&M, Apollo Hospitals आणि Tech Mahindra यांच्या शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ झाली आहे. सर्वात मोठी घसरण हीरो मोटोकॉर्प, डीव्हीज लॅब, अल्ट्राटेक सिमेंट, अदानी पोर्ट्स आणि अदानी एंटरप्रायझेसच्या शेअर्समध्ये दिसून येत आहे.

गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 52.2 हजार कोटी रुपयांची घट

13 ऑगस्ट 2024 रोजी, BSE वर सर्व शेअर्सचे एकूण मार्केट कॅप 4,45,30,265.42 कोटी रुपये होते. आज म्हणजेच 14 ऑगस्ट 2024 रोजी बाजार उघडताच ते 4,45,82,529.81 कोटी रुपयांवर आले. याचा अर्थ गुंतवणूकदारांच्या भांडवलात 52,264.39 कोटी रुपयांची घट झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Award List: ऑरेंज-पर्पल कॅप आणि बक्कळ पैसा... पुरस्कार सोहळ्यातही वैभव सूर्यवंशीचाच डंका! पाहा विजेत्यांची संपूर्ण यादी

IPL 2026 Final: "जितेश राव, कसं वाटतंय?" हर्षा भोगलेंच्या प्रश्नावर RCB च्या Jitesh Sharma चं मराठीतून उत्तर; म्हणाला...

Virat Kohli Reaction : "आता मॅच जिंकवण्यासाठी मला एकट्यालाच मैदानात उतरावं लागत नाही!" विराट कोहली भावुक

Vaibhav Sooryavanshi : १५ वर्षाच्या पोराने मैदान गाजवले... Orange Cap सह ५ पुरस्कार जिंकल्यानंतर म्हणाला, या पर्वात शिकलो की...

IPL 2026: वैभव सूर्यवंशीला ५ पुरस्कार अन् पैशांचा पाऊस! १५ वर्षांच्या पोराला कारसह BCCI कडून किती रुपयांचे बक्षीस मिळाले?

SCROLL FOR NEXT