Share Market Opening Skala
Share Market

Share Market Opening: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; सेन्सेक्स 200 अंकांनी वाढला, बँकिंग शेअर्स वधारले

Share Market Opening: जागतिक बाजारातून मिळालेल्या संमिश्र संकेतांमुळे देशांतर्गत शेअर बाजाराची सुरुवात मंगळवारी तेजीसह झाली. सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स 200 हून अधिक अंकांनी वाढला आहे.

राहुल शेळके

Share Market Opening Latest Update 13 February 2024: जागतिक बाजारातून मिळालेल्या संमिश्र संकेतांमुळे देशांतर्गत शेअर बाजाराची सुरुवात मंगळवारी तेजीसह झाली. सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स 200 हून अधिक अंकांनी वाढला आहे. तर निफ्टी 50 अंकांपेक्षा जास्त वाढला आहे.

बँकिंग शेअर्सच्या वाढीमुळे बाजारात वाढ झाली आहे. बँक निफ्टी निर्देशांक 0.33 टक्क्यांनी वाढला आहे. क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये, मेटल आणि स्थावर मालमत्ता वगळता, सर्व निर्देशांक तेजीसह व्यवहार करत आहेत. निफ्टी मेटल इंडेक्स 2.37% घसरला आहे.

शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात

बँक निफ्टीमध्ये वाढ झाली

आज बँक निफ्टीमध्ये चांगली वाढ दिसून येत आहे आणि एसबीआयचा शेअर सुरुवातीला टॉप गेनर्समध्ये होता. परंतु मार्केट ओपनिंगच्या 15 मिनिटांनंतर, आयसीआयआय बँकेचा शेअर बँक निफ्टी शेअर्समध्ये टॉपवर आहे. बँक निफ्टीच्या 12 शेअर्सपैकी फक्त 4 शेअर्स सध्या तेजीत आहेत.

क्षेत्रीय निर्देशांकाची स्थिती

शेअर बाजाराच्या सुरुवातीच्या व्यवहारात निफ्टी मिडकॅप 100 आणि बीएसई स्मॉल कॅप निर्देशांकात घसरण झाली, तर निफ्टी आयटी आणि निफ्टी बँक निर्देशांकात वाढ झाली. शेअर बाजाराच्या सुरुवातीच्या व्यवहारात, डॉ. रेड्डीज लॅबचे शेअर्स घसरत होते तर डिवीज लॅब, विप्रो, एचसीएल टेकचे शेअर्समध्ये किंचित वाढ झाली.

कोणते शेअर्स वाढले?

मंगळवारी सुरुवातीच्या व्यवहारात शेअर बाजारातील आघाडीच्या शेअर्समध्ये कोल इंडिया, हिरो मोटोकॉर्प, एनटीपीसी, टाटा कंझ्युमर, आयशर मोटर्स, बीपीसीएल आणि रिलायन्स इंडस्ट्रीज यांचा समावेश होता, तर घसरण झालेल्या शेअर्समध्ये हिंदाल्को, जेएसडब्ल्यू स्टील, पॉवर ग्रिड, अल्ट्राटेक सिमेंट, ओएनजीसी, एसबीआय लाइफ आणि एलटीआय माइंड ट्रीचे शेअर्स होते.

S&P BSE SENSEX

पेटीएमचे शेअर्स विक्रमी नीचांकी पातळीवर

पेटीएमच्या शेअर्सने मंगळवारी इंट्राडेमध्ये 386.25 रुपयांवर पोहोचला, जो स्टॉकचा आतापर्यंतचा विक्रमी नीचांक आहे. कंपनीचे शेअर्स मंगळवारी 8.51% घसरून 386.25 रुपयांच्या विक्रमी नीचांकी पातळीवर पोहोचले.

31 जानेवारी रोजी, RBI ने पेटीएम पेमेंट्स बँकेला 29 फेब्रुवारीपासून ठेवी घेण्यास बंदी घातल्यानंतर शेअर्समध्ये घसरण सुरूच होती. 31 जानेवारीच्या बंद किंमतीपासून आतापर्यंत स्टॉक 49.26% घसरला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT