Share Market Latest Update Sakal
Share Market

Share Market Opening: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; सेन्सेक्समध्ये 230 अंकांची वाढ, कोणते शेअर्स चमकले?

Sensex-Nifty Today: चालू आठवड्यातील शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी शुक्रवारी शेअर बाजाराचे कामकाज वाढीसह सुरू झाले. BSE सेन्सेक्स 230 अंकांच्या वाढीसह 72,637अंकांच्या पातळीवर तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 52 अंकांच्या वाढीसह 22,002 अंकांच्या पातळीवर उघडला आहे.

राहुल शेळके

Share Market Opening Latest Update 10 May 2024 (Marathi News): चालू आठवड्यातील शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी शुक्रवारी शेअर बाजाराचे कामकाज वाढीसह सुरू झाले. BSE सेन्सेक्स 230 अंकांच्या वाढीसह 72,637अंकांच्या पातळीवर तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 52 अंकांच्या वाढीसह 22,002 अंकांच्या पातळीवर उघडला आहे. शेअर बाजाराच्या सुरुवातीच्या व्यवहारात निफ्टीच्या सर्व क्षेत्रीय निर्देशांकांत वाढ झाली.

Sensex Today

कोणते शेअर्स तेजीत?

शेअर बाजारातील टॉप शेअर्समध्ये बीपीसीएल, एनटीपीसी, पॉवर ग्रिड, टाटा मोटर्स, कोल इंडिया, हीरो मोटोकॉर्प आणि ओएनजीसी यांचे शेअर्स होते. तर इन्फोसिस, ब्रिटानिया, एचडीएफसी बँक, एलटीआय माइंडट्री, टेक महिंद्रा, एशियन पेंट्स आणि एचसीएल टेकच्या शेअर्समध्ये घसरण झाली.

Nifty Today

शेअर बाजाराच्या सुरुवातीच्या व्यवहारात लार्सन अँड टुब्रो, भारत इलेक्ट्रॉनिक्स, बाटा इंडिया, ऑल कार्गो लॉजिस्टिक्स आणि इंडसइंड बँक यांचे शेअर्स तेजीसह व्यवहार करत होते, तर विप्रो, कोटक महिंद्रा बँक, टीसीएस, एचसीएल टेक, एशियन पेंट्स, एचडीएफसी बँक आणि इन्फोसिसचे शेअर्स घसरले होते.

शेअर बाजाराच्या सुरुवातीच्या व्यवहारात गौतम अदानी समूहाच्या सर्व 10 कंपन्यांचे शेअर्स वाढीसह व्यवहार करत होते. अदानी पॉवरमध्ये दोन टक्क्यांहून अधिक वाढ झाली होती, तर एसीसी लिमिटेडही वाढीसह व्यवहार करत होता.

S&P BSE SENSEX

क्षेत्रीय निर्देशांकाची स्थिती

IT, PSU बँक आणि रियल्टी क्षेत्र वगळता, इतर सर्व क्षेत्रीय निर्देशांक तेजीसह व्यवहार करत होते. एफएमसीजी शेअर्समध्ये सर्वाधिक 1.42 टक्के वाढ दिसून येत आहे तर फार्मा शेअर्स 1.11 टक्क्यांनी वाढले आहेत. आरोग्य सेवा निर्देशांकात 0.96 टक्के आणि मेटल क्षेत्रात 0.75 टक्के वाढ झाली आहे.

सेन्सेक्सच्या 30 शेअर्सपैकी 25 शेअर्समध्ये वाढ होत आहे आणि 5 शेअर्समध्ये घसरण होत आहे. आयटीसीचे शेअर्स 2.13 टक्क्यांनी आणि सन फार्मा 1.75 टक्क्यांनी वधारले आहेत. JSW स्टील 1.84 टक्के आणि NTPC 1.37 टक्क्यांनी वधारले आणि नेस्ले देखील टॉप गेनर आहे.

निफ्टीच्या 50 शेअर्सपैकी 42 शेअर्समध्ये वाढ दिसून येत आहे आणि 8 शेअर्स घसरत आहेत. BPCL 2.78 टक्के आणि ITC 2 टक्क्यांनी वर आहे. हिरो मोटोकॉर्पचा शेअर 1.64 टक्क्यांनी आणि एशियन पेंट्सचा शेअर 1.62 टक्क्यांनी वाढला आहे, तर JSW स्टीलचाही शेअर 1.62 टक्क्यांनी वाढला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Manhole News: 'तेच घर चालवत होते, आमचा एकमेव आधार गेला...'; मॅनहोलमध्ये पडून असलम शेख यांचा मृत्यू; कुटुंबाचा न्यायासाठी आक्रोश

Aashadhi Wari: आषाढी वारीसाठी आळंदी सज्ज! दोन दिवसांत सर्व प्रलंबित कामे पूर्ण करण्याचे आदेश; वारीपूर्व तयारीला अंतिम वेग

Maharashtra Loan Waiver : जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून खात्यात जमा होणार पैसे; 56 लाख शेतकऱ्यांना 2 लाखांपर्यंत कर्जमाफी, बँक खात्यांची पडताळणी सुरू

Gold Smuggling Sangli Man Arrested : आसाममध्ये सोने तस्करी करणारा संशयित दिघंचीचा? सोन्याच्या तस्करीविरोधात मोठी कारवाई, 55 कोटींची सोन्याची बिस्किटे जप्त

Pune Metro: आता रस्ता ओलांडणे झाले सुरक्षित! वाकड मेट्रो स्थानकावर ६० मीटरचा पादचारी पूल; नागरिकांसाठी मोफत सुविधा

SCROLL FOR NEXT