Share Market Opening Sakal
Share Market

Share Market Opening: सरकार स्थापनेच्या आशेने बाजार तेजीत; सेन्सेक्स 500 अंकांनी बहरला, कोणते शेअर्स वाढले?

Share Market Today: गुरुवारी (6 जून) शेअर बाजार हिरव्या चिन्हासह सुरू झाला. सेन्सेक्स 500 अंकांच्या वाढीसह उघडला. तर निफ्टीने 100 हून अधिक अंकांची वाढ नोंदवली. काल 74,382 वर बंद झाल्यानंतर सेन्सेक्स आज 75,000 च्या वर उघडला.

राहुल शेळके

Share Market Opening Latest Update 6 June 2024: गुरुवारी (6 जून) शेअर बाजार हिरव्या चिन्हासह सुरू झाला. सेन्सेक्स 500 अंकांच्या वाढीसह उघडला. तर निफ्टीने 100 हून अधिक अंकांची वाढ नोंदवली. काल 74,382 वर बंद झाल्यानंतर सेन्सेक्स आज 75,000 च्या वर उघडला. निफ्टी 22,798 च्या पातळीवर उघडला.

उघडल्यानंतर, निर्देशांक 22,700 च्या श्रेणीत व्यवहार करत होता. मिडकॅप निर्देशांकात 800 अंकांची वाढ झाली. BHEL चे शेअर्स 8% ची वाढ नोंदवत आहेत. याशिवाय ओएनजीसी, अदानी पोर्ट्स, बजाज फायनान्स, बजाज फिनसर्व्ह, बीपीसीएलमध्ये तेजी आहे. एचयूएल, ब्रिटानियाचे शेअर्स घसरले आहेत.

Share Market

क्षेत्रीय निर्देशांकाची स्थिती

भारतीय बाजारपेठेत एफएमसीजी, बँकिंग, आयटी, फार्मा, मेटल, ऊर्जा, तेल आणि गॅस, आरोग्यसेवा, कंज्यूमर ड्यूरेबल्स यासारख्या क्षेत्रांच्या शेअर्समध्ये मोठी वाढ दिसून आली आहे.

याशिवाय मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समध्ये जोरदार खरेदी झाली, ज्यामुळे निफ्टी मिडकॅप निर्देशांक 853 अंकांच्या वाढीसह व्यवहार करत आहे आणि स्मॉल कॅप निर्देशांक 1,000 अंकांच्या वाढीसह व्यवहार करत आहे. आजच्या व्यवहारात सेन्सेक्समधील 20 शेअर्स वाढीसह व्यवहार करत आहे.

Share Market

कोणते शेअर्स तेजीत?

शेअर बाजाराच्या सुरुवातीच्या काळात अमरा राजा बॅटरी, मिंडा इंडस्ट्रीज, केएनआर कन्स्ट्रक्शन, वर्धमान टेक्सटाइल, बिकाजी फूड्स, आदित्य बिर्ला रिटेल आणि मुथूट फायनान्सचे शेअर्स 52 आठवड्यांच्या उच्चांकावर पोहोचले. शेअर बाजाराच्या सुरुवातीच्या कामकाजात गौतम अदानी समूहाच्या सर्व 10 कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली. अदानी पोर्ट्समध्ये एक टक्क्यांची वाढ झाली तर अदानी पॉवरचे शेअर्स 6 टक्क्यांहून अधिक वाढले.

BSE SENSEX

मल्टीबॅगर शेअरची स्थिती

शेअर बाजाराच्या सुरुवातीच्या काळात भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेडचे ​​शेअर्स 8 टक्क्यांहून अधिक वाढले आणि 276 रुपयांच्या पातळीवर पोहोचले. गुरुवारी एनएचपीसी, इंजिनिअर्स इंडिया, भारत इलेक्ट्रॉनिक, इरकॉन इंटरनॅशनल, प्राज इंडस्ट्रीज, ओएनजीसी, अशोक लेलँड, विप्रो, एचसीएल टेक, इन्फोसिस, टीसीएस, लार्सन यांचे शेअर्स तेजीत होते.

तर बँकिंग क्षेत्रातील आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक आणि कोटक यांचे शेअर्स तेजीत होते. एशियन पेंट्स आणि फिनोलेक्स इंडस्ट्रीजच्या शेअर्समध्ये थोडीशी घसरण झाली.

मार्केट कॅपमध्ये जोरदार वाढ

मंगळवारी भारतीय शेअर बाजाराच्या मार्केट कॅपमध्ये 31 लाख कोटी रुपयांची घसरण झाली. पण बुधवारच्या ट्रेडिंग सत्रात भारतीय शेअर बाजारातील जोरदार वाढीमुळे मार्केट कॅपमध्ये मोठी वाढ झाली आहे. बीएसईवर कंपन्यांचे मार्केट कॅप पुन्हा 400 लाख कोटी रुपयांच्या पुढे गेले आहे आणि 407.58 लाख कोटी रुपयांच्या पातळीवर पोहोचले आहे.

जे गेल्या सत्रात 394.83 लाख कोटी रुपयांच्या पातळीवर बंद झाले होते. म्हणजेच आजच्या सत्रात गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 12.75 लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat Arrested : 'कॅप्टन' खरातचा घाणेरडा चेहरा उघड; महिलांच्या लैंगिक शोषणाचे 58 व्हिडिओ पोलिसांच्या हाती, राजकीय वर्तुळात खळबळ

लैंगिक शोषणाचे ५८ व्हिडिओ; अनेक महिला सेलिब्रिटींचा सहभाग, कोण आहे अशोक खरात? बाहेर लोक बसलले असताना, आत कॅबीनमध्ये करायचा चाळे

आपला माणूस शिवचा मराठी इंडस्ट्रीत दमदार कमबॅक ! मी धुरंधर गाणं होतंय सोशल मिडियावर ट्रेंड

Latest Marathi News Live Update : गुढीपाडव्यानिमित्त पुण्यातील दगडूशेठ गणपती मंदिरात भाविकांची मोठी गर्दी

Pune News: पुण्यात गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर खरेदीची धामधूम; पारंपरिक ते आधुनिक वस्तू; इलेक्ट्रॉनिक्स, वाहन, गृहखरेदीचा उत्साह

SCROLL FOR NEXT