Share Market  Sakal
Share Market

Share Market Closing: शेअर बाजार तेजीसह बंद; सेन्सेक्स 79,105 अंकांंवर, आयटी शेअर्समध्ये वाढ

Share Market Closing Today: बुधवारी (14 ऑगस्ट) भारतीय शेअर बाजारात चढ-उतारासह व्यवहार दिसून आले. दिवसभर मर्यादित व्यवहार केल्यानंतर शेवटी बाजार वाढीसह बंद झाले. निफ्टी 4 अंकांनी वाढून 24,143 वर बंद झाला.

राहुल शेळके

Share Market Closing Latest Update 14 August 2024: बुधवारी (14 ऑगस्ट) भारतीय शेअर बाजारात चढ-उतारासह व्यवहार दिसून आले. दिवसभर मर्यादित व्यवहार केल्यानंतर शेवटी बाजार वाढीसह बंद झाले. निफ्टी 4 अंकांनी वाढून 24,143 वर बंद झाला. सेन्सेक्स 149 अंकांनी वाढून 79,105 वर बंद झाला आणि निफ्टी बँक 104 अंकांनी घसरून 49,727 वर बंद झाला.

कोणते शेअर्स तेजीत?

आयटी शेअर्सच्या खरेदीमुळे बाजारात ही वाढ दिसून आली आहे. इतर क्षेत्रातील शेअर्सनी गुंतवणूकदारांची निराशा केली. मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समध्येही घसरण दिसून आली.

सेन्सेक्समधील 30 शेअर्सपैकी 15 शेअर्स वाढीसह आणि 15 शेअर्स घसरणीसह बंद झाले. निफ्टीच्या 50 शेअर्सपैकी 23 शेअर्स वाढीसह आणि 27 शेअर्स घसरणीसह बंद झाले.

Share Market Closing


वाढत्या शेअर्समध्ये टीसीएस 2.30 टक्के, एचसीएल टेक 2.09 टक्के, टेक महिंद्रा 1.41 टक्के, इन्फोसिस 1.28 टक्के, महिंद्रा अँड महिंद्रा 1.02 टक्के, भारती एअरटेल 0.85 टक्के, टाटा मोटर्स 0.80 टक्के, एसबीआय 0.78 टक्के, आयटीसी 0.56 टक्के, NTPC 0.29 टक्के, HDFC बँक 0.27 टक्क्यांच्या वाढीसह बंद झाले.

Share Market Closing

तर अल्ट्राटेक सिमेंट 2.46 टक्के, जेएसडब्ल्यू स्टील 1.85 टक्के, टाटा स्टील 1.81 टक्के, अदानी पोर्ट्स 1.48 टक्के, पॉवर ग्रिड 0.97 टक्के, बजाज फिनसर्व्ह 0.82 टक्के घसरणीसह बंद झाले.

BSE SENSEX

मार्केट कॅपमध्ये मोठी घसरण

आजच्या व्यवहारात सेन्सेक्स-निफ्टीमध्ये वाढ झाली असली तरी इतर क्षेत्रातील घसरण आणि मिड कॅप, स्मॉल कॅपमध्ये घसरण झाली आहे. बीएसईवर शेअर्सचे मार्केट कॅप 72,000 कोटी रुपयांनी घसरले आणि 444.58 लाख कोटी रुपयांवर बंद झाले, जे मागील सत्रात 445.30 लाख कोटी रुपये होते. गुंतवणूकदारांच्या संपत्तीत सुमारे 72,000 कोटी रुपयांची घट झाली आहे.

बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज (BSE) वर आज एकूण 4,036 शेअर्सचे व्यवहार झाले. यापैकी 1,531 शेअर्स वाढीसह बंद झाले. 2,391 शेअर्समध्ये घसरण दिसून आली. तर 114 शेअर्स कोणतेही चढ-उतार न होता बंद झाले. याशिवाय आजच्या व्यवहारादरम्यान 178 शेअर्सनी त्यांच्या 52 आठवड्यांचा उच्चांक गाठला. तर 66 शेअर्सनी त्यांच्या नवीन 52 आठवड्यांच्या नीचांकी पातळीला स्पर्श केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

12 वर्षांच्या निष्ठेचा सन्मान! जातेगावचे कैलास उगले ठरले मानाचे वारकरी; आषाढी एकादशीला मुख्यमंत्र्यांसोबत शासकीय महापूजेचा मिळाला मान

Ashadhi Ekadashi : 'ज्ञानोबा माऊली'च्या गजरात CM देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर; पारंपरिक वेशात घेतला सहभाग

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विठ्ठल मंदिरात दाखल, महापूजेला सुरुवात

MK Stalin Reaction : ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर आता CM स्टॅलिन यांचीही आली प्रतिक्रिया; केलंय मोठं विधान!

IND vs ENG 2nd Test: भारताची ऐतिहासिक विजयाच्या दिशेने कूच! Akash Deep चा भेदक मारा, इंग्लंडची उडवली झोप

SCROLL FOR NEXT