Share Market Today Sakal
Share Market

Share Market Opening: शेअर बाजाराची चांगली सुरुवात; सेन्सेक्स 600 अंकांनी वधारला, Hindalco, M&Mचे शेअर्समध्ये उत्साह

Share Market Today: जागतिक बाजारातून मिळालेल्या चांगल्या संकेतांदरम्यान शुक्रवारी (16 ऑगस्ट) भारतीय शेअर बाजारांनी चांगली सुरुवात केली. सेन्सेक्स 600 हून अधिक अंकांनी वाढला आहे. तर निफ्टी देखील 170 अंकांची वाढला आहे.

राहुल शेळके

Share Market Opening Latest Update 16 August 2024: जागतिक बाजारातून मिळालेल्या चांगल्या संकेतांदरम्यान शुक्रवारी (16 ऑगस्ट) भारतीय शेअर बाजारांनी चांगली सुरुवात केली. सेन्सेक्स 600 हून अधिक अंकांनी वाढला आहे. तर निफ्टी देखील 170 अंकांनी वाढला आहे. बँक निफ्टी 400 हून अधिक अंकांच्या वाढीसह उघडला. Hindalco, M&M हे निफ्टी वर सर्वाधिक वाढणारे शेअर्स आहेत. याशिवाय आयटी शेअर्समध्येही चांगली वाढ झाली आहे.

सुरुवातीच्या व्यवहारात आयटी शेअर्समध्ये खरेदीचे वातावरण दिसत आहे. विप्रो ONGC, Hindalco, M&M सारखे शेअर्स निफ्टी 50 मधील टॉप गेनर्सच्या यादीत दिसत आहेत. तर निफ्टी 50 इंडेक्सचे सर्वाधिक विकले जाणारे शेअर्स एचडीएफसी लाइफ, हीरो मोटो कॉर्प, पॉवर ग्रिड आहेत.

Share Market Opening

जागतिक बाजार कसे आहेत?

अमेरिकन बाजार गुरुवारी वाढीसह बंद झाले, ज्याचा परिणाम शुक्रवारी सकाळी आशियाई बाजारांवर दिसत आहे. गिफ्टी निफ्टीने 170 अंकांची वाढ दाखवून सकाळी दमदार सुरुवात करण्याचे संकेत दिले होते.

टोकियो वेळेनुसार सकाळी 9.09 पर्यंत S&P 500 फ्युचर्समध्ये थोडासा बदल झाला. जपानचे TOPICS 2.2% वाढले. ऑस्ट्रेलियाचा S&P/ASX 200 0.8% वाढला. युरो स्टॉक्स 50 फ्युचर्स 1.9% वाढले.

Share Market Opening

गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 3.67 लाख कोटींची वाढ

14 ऑगस्ट 2024 रोजी, BSE वर सर्व शेअर्सचे एकूण मार्केट कॅप 4,44,29,443.69 कोटी रुपये होते. आज म्हणजेच 16 ऑगस्ट 2024 रोजी बाजार उघडताच ते 4,47,97,106.64 कोटी रुपयांवर पोहोचले. याचा अर्थ गुंतवणूकदारांच्या भांडवलात 3,67,662.95 कोटी रुपयांची वाढ झाली आहे.

BSE SENSEX

सेन्सेक्सचे 28 शेअर्स तेजीत

सेन्सेक्सवर 30 शेअर्स लिस्ट आहेत, त्यापैकी 28 शेअर्स तेजीत आहेत. सर्वात मोठी वाढ M&M आणि टाटा स्टीलमध्ये झाली आहे. दुसरीकडे, आज केवळ पॉवर ग्रीड आणि एचयूएलची घसरण सुरू आहे.

आज BSE वर 2685 शेअर्सचे व्यवहार होत आहेत. यामध्ये 1997 शेअर्स तेजीत दिसत आहेत, 538 शेअर्समध्ये घसरण दिसून येत आहे आणि 150 शेअर्समध्ये कोणताही बदल दिसून येत नाही. याशिवाय 74 शेअर्स एका वर्षाच्या उच्चांकावर तर 17 शेअर्स एका वर्षाच्या नीचांकी पातळीवर आले. 90 शेअर्स अप्पर सर्किटवर पोहोचले, तर 74 शेअर्स लोअर सर्किटवर पोहोचले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Award List: ऑरेंज-पर्पल कॅप आणि बक्कळ पैसा... पुरस्कार सोहळ्यातही वैभव सूर्यवंशीचाच डंका! पाहा विजेत्यांची संपूर्ण यादी

IPL 2026 Final: "जितेश राव, कसं वाटतंय?" हर्षा भोगलेंच्या प्रश्नावर RCB च्या Jitesh Sharma चं मराठीतून उत्तर; म्हणाला...

Virat Kohli Reaction : "आता मॅच जिंकवण्यासाठी मला एकट्यालाच मैदानात उतरावं लागत नाही!" विराट कोहली भावुक

Vaibhav Sooryavanshi : १५ वर्षाच्या पोराने मैदान गाजवले... Orange Cap सह ५ पुरस्कार जिंकल्यानंतर म्हणाला, या पर्वात शिकलो की...

IPL 2026: वैभव सूर्यवंशीला ५ पुरस्कार अन् पैशांचा पाऊस! १५ वर्षांच्या पोराला कारसह BCCI कडून किती रुपयांचे बक्षीस मिळाले?

SCROLL FOR NEXT