Share Market  Sakal
Share Market

Share Market Opening: निफ्टीमध्ये मोठी घसरण; सेन्सेक्स 500 अंकांनी कोसळला, कोणते शेअर्स वधारले?

Share Market Today: आज (25 जुलै) भारतीय शेअर बाजारात घसरणीसह व्यवहाराला सुरुवात झाली आहे. निफ्टी 180 अंकांच्या घसरणीसह व्यवहार करत होता. सेन्सेक्सही जवळपास 500 अंकांच्या घसरणीसह उघडला.

राहुल शेळके

Share Market Opening Latest Update 25 July 2024: आज (25 जुलै) भारतीय शेअर बाजारात घसरणीसह व्यवहाराला सुरुवात झाली आहे. निफ्टी 180 अंकांच्या घसरणीसह व्यवहार करत होता. सेन्सेक्सही जवळपास 500 अंकांच्या घसरणीसह उघडला. बँक निफ्टीतही अशीच घसरण होती. मिडकॅप निर्देशांकही 400 अंकांच्या घसरणीसह व्यवहार करताना दिसत आहे. मेटल आणि बँकिंग शेअर्स घसरले आहेत.

आज सकाळी गिफ्ट निफ्टीमध्ये 238 अंकांची मोठी घसरण झाली. निर्देशांक 24,152 च्या आसपास व्यवहार करत होता. टेक स्टॉक्समधील विक्रीमुळे यूएस मार्केटमध्ये काल 2022 नंतरची सर्वात मोठी घसरण दिसून आली. Nasdaq आणि Dow दोन्ही मोठ्या घसरणीसह बंद झाले.

Share Market Opening

सेन्सेक्सचे कोणते शेअर्स घसरले?

सेन्सेक्सवर 30 शेअर्स लिस्ट आहेत, त्यापैकी फक्त 4 शेअर्स तेजीत आहेत. एल अँड टी, टाटा मोटर्स आणि नेस्लेमध्ये सर्वाधिक वाढ झाली आहे. दुसरीकडे, ॲक्सिस बँक, टाटा स्टील आणि पॉवर ग्रिडमध्ये सर्वाधिक घसरण झाली आहे.

Share Market Opening

आज BSE वर 2601 शेअर्सचे व्यवहार होत आहेत. यामध्ये 895 शेअर्स तेजीत दिसत आहेत, 1561 शेअर्समध्ये घसरण दिसून येत आहे आणि 145 शेअर्समध्ये कोणताही बदल दिसून येत नाही. याशिवाय 72 शेअर्स एका वर्षाच्या उच्चांकावर तर 6 शेअर्स एका वर्षाच्या नीचांकी पातळीवर आले. 88 शेअर्स अप्पर सर्किटवर पोहोचले, तर 34 शेअर्स लोअर सर्किटवर पोहोचले.

BSE SENSEX

बँक निफ्टीमध्ये जोरदार घसरण

सकाळी 9.30 वाजता बँक निफ्टी 545.45 अंकांनी किंवा 1.06 टक्क्यांनी घसरून 50,771.55 वर आला. बाजार उघडताच बँक निफ्टी 395 अंकांनी किंवा 0.77 टक्क्यांनी घसरून 50922 च्या पातळीवर आला. निफ्टी आयटी निर्देशांक 396 अंकांनी घसरला असून 39718 वर आला आहे. सर्व क्षेत्रीय निर्देशांक घसरणीसह लाल रंगात व्यवहार करत आहेत.

गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 3.28 लाख कोटी रुपयांची घसरण

काल 24 जुलै 2024 रोजी, BSE वर सर्व शेअर्सचे एकूण मार्केट कॅप 4,49,47,552.63 कोटी रुपये होते. आज म्हणजेच 25 जुलै 2024 रोजी बाजार उघडताच ते 4,46,19,199.92 कोटी रुपयांवर आले. याचा अर्थ गुंतवणूकदारांच्या भांडवलात 3,28,352.71 कोटी रुपयांची घसरण झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Shetty : रोहित शेट्टीच्या घरावर गोळीबार, आणखी चौघांना अटक; मोबाईलसह महत्त्वाचे पुरावे हाती

Nashik Ration Shops : ग्रामपंचायती अन् बचत गटांची प्रतीक्षा संपणार कधी? नवीन रेशन परवान्यांसाठी नाशिककर आक्रमक

Pune News: वारज्यात महामार्गाचीच कोंडी! दीड किलोमीटर अंतर पार करण्यासाठी लागतो दीड तास; काय आहेत काेंडीची कारणे..

फक्त एका मालिकेमुळे रातोरात प्रसिद्ध झाली अभिनेत्री नंतर अचानक झाली गायब; आता ओळखणंही झालं कठीण

Latest Marathi News Update : नागपूर विमानतळावरील सुरक्षा मशिन्स पूर्ववत सुरू

SCROLL FOR NEXT