Shri Balaji Valve Components sets IPO price band at rs 95-100 per share  Sakal
Share Market

श्री बालाजी वॉल्व कंपोनेंट्स कंपनीचा आयपीओ 27 डिसेंबरला खुला होणार; जाणून घ्या संपूर्ण माहिती

Shri Balaji Valve Components IPO: श्री बालाजी व्हॉल्व्ह कंपोनेंट्सचा (Shri Balaji Valve Components) आयपीओ 27 डिसेंबरला उघडेल आणि 29 डिसेंबरला बंद होईल. त्यांच्या इनिशियल पब्लिक ऑफरसाठी 95-100 रुपयांचा प्राइस बँड निश्चित करण्यात आला आहे.

राहुल शेळके

Shri Balaji Valve Components IPO: श्री बालाजी व्हॉल्व्ह कंपोनेंट्सचा (Shri Balaji Valve Components) आयपीओ 27 डिसेंबरला उघडेल आणि 29 डिसेंबरला बंद होईल. त्यांच्या इनिशियल पब्लिक ऑफरसाठी 95-100 रुपयांचा प्राइस बँड निश्चित करण्यात आला आहे.

कंपनीच्या या आयपीओ अंतर्गत 21.6 लाख नवीन इक्विटी शेअर्स जारी केले जातील. प्राइस बँडच्या वरच्या स्तरावरुन, कंपनीचा आयपीओ मधून 21.60 कोटी उभारण्याचा मानस आहे.

इश्यूमधून उभारण्यात आलेला निधी अतिरिक्त प्लांट आणि मशीन्स उभारण्यासाठी, खेळत्या भांडवलाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आणि सामान्य कॉर्पोरेट हेतूंसाठी वापरला जाईल. इश्यूचे एकमेव बुक-रनिंग लीड मॅनेजर हेम सिक्युरिटीज लिमिटेड आहेत, तर बिगशेअर सर्व्हिसेस हे या आयपीओसाठीचे रजिस्ट्रार आहेत.

श्री बालाजी व्हॉल्व्ह कॉम्पोनंट्स लिमिटेड आयपीओची लॉट साइज 1,200 शेअर्स आहे. गुंतवणूकदार किमान 1,200 शेअर्ससाठी आणि त्याच्या पटीत बोली लावू शकतात. श्री बालाजी व्हॉल्व्ह कॉम्पोनंट्स लिमिटेड आयपीओसाठी अँकर गुंतवणूकदार मंगळवारपासून अर्थात 26 डिसेंबरपासून बोली लावू शकतात.

श्री बालाजी व्हॉल्व्ह कंपोनंट्स लिमिटेड आयपीओमधील 50% पेक्षा जास्त शेअर्स क्वालिफाईड इन्स्टिट्यूशनल बायर्ससाठी (QIBs) आरक्षित केले आहेत. 15% शेअर्स गैर-संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी (NIIs) आणि 35% शेअर किरकोळ गुंतवणूकदारांसाठी ऑफर केले आहेत. श्रीनिवास लक्ष्मीकांत कोले, माधुरी लक्ष्मीकांत कोले आणि लक्ष्मीकांत सदाशिव कोले हे कंपनीचे प्रमोटर्स आहेत.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुणे, पिंपरी-चिंचवडसह नाशिकमध्ये CNG दरात वाढ, नवे दर आजपासून लागू

Ebola Case: काळजी वाढवणारी बातमी! काँगोहून आला अन् तब्येत बिघडली… अहमदाबादमध्ये इबोलाच्या संशयाने खळबळ, ४ जण आयसोलेट

‘८ वाजून १३ मिनिटे’चा थरारक ट्रेलर प्रदर्शित; सुनील बर्वे–ऐश्वर्या नारकर यांची दमदार केमिस्ट्री चर्चेत!

Latest Marathi News Live Update : विदर्भात ६ जिल्ह्यांना उष्णतेचा रेड अलर्ट

Monsoon Gains Momentum : मॉन्सूनने पुन्हा घेतली गती; अरबी समुद्र अन् बंगालच्या उपसागरातून पुढे सरकला; हवामान विभागाची माहिती

SCROLL FOR NEXT