Mukesh Ambani  Sakal
Share Market

Reliance Share: मुकेश अंबानींना मोठा धक्का! रिलायन्सचे एका आठवड्यात 40,000 कोटी रुपये पाण्यात, काय आहे कारण?

गेल्या पाच दिवसांत रिलायन्सच्या शेअरमध्ये 48 अंकांपेक्षा जास्त घसरण झाली आहे.

राहुल शेळके

Reliance Share Price: गेल्या आठवड्यात शेअर बाजारात घसरण पाहायला मिळाली. बाजारातील घसरणीचा परिणाम सर्वच कंपन्यांच्या मार्केट कॅपवर झाला आहे. शुक्रवारीही बाजार घसरणीसह बंद झाला होता.

सध्या बाजारात घसरण दिसून येत आहे. इक्विटी मार्केटमधील कमकुवत ट्रेंडमुळे गेल्या आठवड्यात टॉप 10 सर्वात मूल्यवान देशांतर्गत कंपन्यांपैकी सहा कंपन्यांचे बाजार भांडवल एकत्रितपणे 1,02,280.51 कोटी रुपयांनी घसरले.

यादरम्यान मुकेश अंबानींच्या रिलायन्स इंडस्ट्रीजला सर्वाधिक फटका बसला. मागील आठवड्यात बीएसई सेन्सेक्स 405.21 अंकांनी किंवा 0.63 टक्क्यांनी घसरला होता.

टॉप 10 कंपन्यांपैकी रिलायन्स इंडस्ट्रीज, ICICI बँक, हिंदुस्थान युनिलिव्हर, ITC, Infosys आणि SBI यांच्या बाजार मूल्यांकनात घसरण होऊन कंपन्यांचे नुकसान झाले आहे.

या कंपन्यांचा झाला फायदा

टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS), एचडीएफसी बँक, एचडीएफसी आणि भारती एअरटेलचे मूल्यांकन वाढले.

रिलायन्स इंडस्ट्रीजचे बाजार भांडवल 40,695.15 कोटी रुपयांनी घसरून 17,01,720.32 कोटी रुपये झाले. हिंदुस्तान युनिलिव्हरचे बाजार भांडवल 17,222.5 कोटी रुपयांनी घसरून 6,20,797.26 कोटी रुपये झाले.

एसबीआयचेही नुकसान

एसबीआयचे बाजार भांडवल 14,814.86 कोटी रुपयांनी घसरले आणि ते 4,95,048.22 कोटी रुपये राहिले. दुसरीकडे, HDFC बँकेने बाजार भांडवलात 23,525.6 कोटी रुपयांची भर घातली आणि तिचे बाजार भांडवल 9,18,984.17 कोटी रुपये झाले.

शेअर्समध्ये घसरण:

रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअर्समध्ये सातत्याने घसरण होत आहे. बाजारातील घसरणीदरम्यान रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअर्समध्येही घसरण दिसून आली. गेल्या पाच दिवसांत रिलायन्सच्या शेअरमध्ये 48 अंकांपेक्षा जास्त घसरण झाली आहे.

गेल्या शुक्रवारीही हा शेअर 17 अंकांपेक्षा अधिक घसरणीसह बंद झाला होता. रिलायन्सचा शेअर 2,517.80 रुपयांच्या पातळीवर खाली आला आहे. शेअर घसरल्याने गुंतवणूकदारांचेही नुकसान झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tamhini Ghat Accident: 'त्याच' थारवर जाऊन कार कोसळली; ताम्हिणी घाटात पुन्हा तसाच अपघात, एकाचा मृत्यू

Paithan Political : उपनगराध्यक्ष पदाची माळ कोणाच्या गळ्यात; पैठणच्या राजकारणात उत्सुकता ताणली!

Ranjangaon MIDC Scam : रांजणगाव एमआयडीसीत नोकरीचे आमिष; ४७ तरुण-तरुणींची सत्तर हजारांची फसवणूक; दोघांना अटक!

Cigarette Prices Hike : आधी १० रुपयांना मिळणारी सिगारेट आता किती रुपयांना मिळणार?

Manoj Jarange: 'दहा वाजेपर्यंत MPSCच्या विद्यार्थ्यांचा प्रश्न सोडवा, नाहीतर...', मनोज जरांगे नदीपात्रात ठाण मांडून, मुख्यमंत्री फोनवरुन बोलणार

SCROLL FOR NEXT