Special market trading session tomorrow on May 18; Here is all you need to know  Sakal
Share Market

Stock Market: शनिवारी खुला राहणार शेअर बाजार; NSE-BSE वर विशेष ट्रेडिंग सत्र, जाणून घ्या तपशील

Special Trading Session: नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) आणि बॉम्बे स्टॉक एक्सचेंजने (BSE) सांगितले की ते शनिवारी, 18 मे रोजी स्टॉक आणि इक्विटी फ्यूचर्स आणि ऑप्शन्स विभागांमध्ये विशेष ट्रेडिंग सत्र आयोजित करतील.

राहुल शेळके

Special Trading Session: शेअर मार्केट ट्रेडिंग करणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. साधारणपणे, शुक्रवार हा शेअर बाजारात आठवड्याचा शेवटचा ट्रेडिंग दिवस असतो. आठवड्याच्या शेवटी शनिवार आणि रविवारी शेअर बाजाराला सुट्टी असते, म्हणजेच शनिवार आणि रविवारी शेअर बाजार बंद असतो. पण शनिवारी म्हणजेच 18 मे रोजी देखील शेअर बाजार व्यापारासाठी खुला होणार आहे.

नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) आणि बॉम्बे स्टॉक एक्सचेंजने (BSE) सांगितले की ते शनिवारी, 18 मे रोजी स्टॉक आणि इक्विटी फ्यूचर्स आणि ऑप्शन्स विभागांमध्ये विशेष ट्रेडिंग सत्र आयोजित करतील.

'लाइव्ह' ट्रेडिंग सत्रांमध्ये 'डिझास्टर रिकव्हरी' साइटचा वापर

विशेष 'लाइव्ह' ट्रेडिंग सत्रांदरम्यान, 'डिझास्टर रिकव्हरी' (DR) साइटचा वापर प्राथमिक साइट (PR) च्या जागी केला जाईल जर आपत्कालीन परिस्थितीत प्राथमिक 'डेटा सेंटर' उपलब्ध नसेल, ट्रेडिंग सायबर हल्ले, सर्व्हर क्रॅश किंवा इतर कोणत्याही समस्यांपासून बचावासाठी 'डिझास्टर रिकव्हरी' साइटची चाचणी घेतली जाणार आहे.

विशेष ट्रेडिंग सत्राची वेळ

याबाबत, दोन्ही स्टॉक एक्स्चेंजने सांगितले की, 18 मे रोजी दोन विशेष ट्रेडिंग सत्रे होतील. ज्यामध्ये पहिले सत्र सकाळी 9.15 ते सकाळी 10 या वेळेत प्राइमरी साइट (PR) आणि दुसरे सत्र 11 पर्यंत असेल. तर DR साइटवरून 11:30 ते दुपारी 12:30 पर्यंत होईल.

NSE आणि BSE ने 2 मार्च रोजी देखील अशाच प्रकारचे ट्रेडिंग सत्र आयोजित केले होते. बाजार नियामक सेबी आणि त्यांच्या तांत्रिक सल्लागार समितीशी झालेल्या चर्चेच्या आधारे ही सत्रे आयोजित केली जात आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MNS Warning: "बाप बनण्याचा प्रयत्न करू नका, मेहता-बिहतांनी..." ; मिरा भाईंदर व्यापार्‍यांच्या बंद नंतर मनसेचा आक्रमक इशारा!

Amit Shah : अमित शहा यांचे पुण्यात आगमन; अनेक कार्यक्रमांना उपस्थिती

Latest Maharashtra News Updates : अमित शहांचा आज पुणे दौरा, वाहतुकीत बदल

Asian Hockey Cup: क्रीडा मंत्रालयाकडून पाकला हिरवा कंदील; भारतात खेळण्याची परवानगी

Kolhapur Police : कोल्हापुरातील गुंडगिरी संपवण्यासाठी एसपी अॅक्शन मोडवर, कुचकोरवी उर्फ एस. के. गॅंगच्या १७ जणांना केलं हद्दपार

SCROLL FOR NEXT