star health share price brokerage firm bullish buy target of rs 730 motilal oswal  Esakal
Share Market

Star Health Share: स्टार हेल्थच्या शेअर्समध्ये तेजीची आशा! 33 टक्के परतावा मिळण्याची शक्यता

Star Health Share: कंपनीचे मार्केट कॅप सध्या 31,880.85 कोटी आहे.

राहुल शेळके

Star Health Share: शेअर बाजारात गुंतवणुकीसाठी तुम्ही चांगल्या स्टॉकच्या शोधात असाल तर तुम्ही स्टार हेल्थच्या (Star Health) शेअर्सचा विचार करु शकता. ब्रोकरेज कंपन्या या शेअरबाबत बुलिश असल्याचे दिसत आहे. नुकतीच कंपनीच्या शेअर्समध्ये 0.22 टक्क्यांची घसरण दिसून आली आणि हा शेअर 547.70 रुपयांवर बंद झाला.

कंपनीचे मार्केट कॅप सध्या 31,880.85 कोटी आहे. तिचा 52 आठवड्यांचा उच्चांक 735 रुपये आणि 52 आठवड्यांचा नीचांक 451.10 रुपये आहे.

ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवालला स्टार हेल्थच्या शेअर्समध्ये वाढ होण्याची शक्यता वर्तवली आहे. 31 ऑक्टोबर 2023 च्या रिसर्च रिपोर्ट ब्रोकरेजने याला बाय रेटिंग दिले आहे आणि 730 रुपयांचे टारगेट निश्चित केले आहे.

त्यानुसार, गुंतवणूकदारांना 33 टक्क्यांचा बंपर नफा मिळण्याची शक्यता आहे. स्टार हेल्थने (STARHEAL) आर्थिक वर्ष 2024 च्या दुसऱ्या तिमाहीत INR1.3b चा प्रॉफीट आफ्टर टॅक्स नोंदवला, तर आर्थिक वर्ष 2023 च्या दुसऱ्या तिमाहीत INR934m प्रॉफीट आफ्टर टॅक्स नोंदवल्याचे ब्रोकरेजने आपल्या अहवालात म्हटले आहे.

शक्यतेपेक्षा अधिक क्लेम आणि खर्चाचे प्रमाण जास्त असल्यामुळे प्रॉफीट आफ्टर टॅक्स अंदाजापेक्षा 32% कमी होता असे ते म्हणाले.

स्टार हेल्थचे शेअर्स गेल्या एका महिन्यात 8 टक्क्यांनी घसरले आहेत. गेल्या 6 महिन्यांत हा शेअर सुमारे 9 टक्क्यांनी घसरला आहे. या वर्षी आतापर्यंत त्यात सुमारे 6 टक्क्यांनी घट झाली आहे. गेल्या वर्षभरात गुंतवणूकदारांचे 21 टक्के नुकसान झाले आहे.

नोंद: क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Crime News : महिलेच्या नावाने इंस्टाग्राम अकाउंट काढलं अन् नको ते व्हिडिओ टाकले... मुंबईत नेमक काय घडलं?

Helicopter News : नादच पुरा केला ! कोल्हापूरच्या पठ्ठ्याने हेलिकॉप्टर विकत घेतलं, सांगलीत सासऱ्याला दाखवायला गेल्यावर जावयाचं केलं असं स्वागत...

कफ सिरपमध्ये ब्रेक ऑइलचं विषारी केमिकल, किडनी निकामी होऊन १४ मुलांचा मृत्यू; औषधावर घातली बंदी

Latest Marathi News Live Update: अमित शाह शिर्डीच्या साई मंदिरात दाखल

Kolhapur Cricket : कोल्हापुरच्या पोरी महाराष्ट्राच्या क्रिकेट संघाच करणार नेतृत्व, टी-२० च्या कर्णधारपदी अनुजा पाटील

SCROLL FOR NEXT