Steel Company sakal
Share Market

Steel Company : 5 रुपयांचा शेअर 286 रुपयांवर, या स्टील कंपनीकडून दमदार परतावा...

ही कंपनी लोह खनिज उत्पादनापासून डीआरआय मॅन्युफॅक्चरींगच्या व्यवसायात आहे.

सकाळ डिजिटल टीम

Steel Company : लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी (Lloyds Metals and Energy) या कंपनीने गेल्या 3 वर्षात शेअर बाजारात सर्वाधिक परतावा दिला आहे. ही एक मिडकॅप कंपनी आहे जिचे मार्केट कॅप 12,730 कोटी आहे.

ही कंपनी लोह खनिज उत्पादनापासून डीआरआय मॅन्युफॅक्चरींगच्या व्यवसायात आहे. गेल्या 3 वर्षांत, कंपनीच्या शेअरची किंमत 4.70 रुपयांवरून 286.10 रुपयांपर्यंत वाढली आहे आणि या काळात त्यांनी आपल्या गुंतवणूकदारांना 5,600 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. (Steel Company Lloyds Metals and Energy share price share market news)

3 वर्षांपूर्वी, 27 मार्च 2020 रोजी कंपनीच्या शेअर्सची किंमत 5.58 रुपये होती. याचा अर्थ असा की जर एखाद्या गुंतवणूकदाराने 3 वर्षांपूर्वी लॉयड्स मेटल्सच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते तर आज त्याचे 57.22 लाख झाले असते.

त्यांचा निव्वळ नफा चालू आर्थिक वर्षाच्या डिसेंबर तिमाहीत 230.03 कोटी होता, तर मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत कंपनीने  26.2 कोटींचा तोटा नोंदवला होता. तिमाही आधारावर कंपनीचा नफा 61 टक्क्यांनी वाढून 142.71 कोटी रुपये झाला आहे.

गेल्या 1 महिन्यात ते 2.67% वाढले आहे. तर गेल्या 6 महिन्यांत ते 54.07% वाढला आहे. त्याच वेळी, गेल्या एका वर्षात, कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना 110.52% परतावा दिला आहे. कंपनीच्या एकूण महसुलात 495 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Winter Update : राज्यातील थंडी गायब की गारठा कायम राहणार? हवामान विभागाचा महत्त्वाचा अंदाज समोर

PIFF Mahotsav : ‘पिफ’ १५ जानेवारीपासून रंगणार; सुमारे १४० चित्रपट दाखविले जाणार

होता स्‍कार्फ म्‍हणून वाचला गळा! 'बिबट्याचा वृद्ध महिलेवर जीवघेणा हल्ला; गवतातून झडप, जिवाच्या आकांताने आरडाओरडा अन्..

सोलापूर जिल्ह्यात 2 वर्षात 1350 जणांचा अपघाती मृत्यू! दुपारी 4 ते रात्री 12 या वेळेत सर्वाधिक अपघात; ‘या’ 5 महिन्यात अपघाताचे प्रमाण जास्त

लाडक्या बहिणींना ‘ई-केवायसी’साठी ३१ डिसेंबरपर्यंत मुदत! महापालिकेत लाडक्या बहिणींचे मतदान आपल्यालाच मिळावे म्हणून भावी नगरसेवकांकडून मोफत ‘ई-केवायसी’ शिबिरे

SCROLL FOR NEXT