Stock Analysis  esakal
Share Market

Stock Analysis : शेअर्स होल्ड करावेत की विकावेत ? काय सांगतायत एक्सपर्ट जाणून घेऊयात...

अशात तुम्हाला शेअर मार्केटमधील एक्स्पपर्ट मदत करु शकतात.

सकाळ डिजिटल टीम

Stock Analysis : शेअर बाजार अस्थिरतेच्या काळात पैसे गुंतवणे तुमच्यासाठी येत्या काळात फायदेशीर ठरु शकते. त्यामुळे या अस्थिर वातावरणात दर्जेदार शेअर्स तुमच्या पोर्टफोलिओमध्ये समाविष्ट करुन घ्या, जेणेकरुन तुम्हाला लाँग टर्मच्या दृष्टीने फायदा होऊ शकतो.

अशात तुम्हाला शेअर मार्केटमधील एक्स्पपर्ट मदत करु शकतात. एंजल वनचे समीत चव्हाण तुमच्यासाठी काही शेअर्सच्या बाबतीत सल्ला घेऊन आले आहेत. कोणते शेअर्स होल्ड केले पाहिजेत, कोणते विकले पाहिजेत हे जाणून घेऊयात. (Stock Analysis how to decide Buy or Hold shares read what expert said )

अल्ट्राटेक सिमेंट (UltraTech Cement)

गेल्या काही महिन्यांत सिमेंटच्या काही शेअर्सनी चांगली कामगिरी केल्याचे समीत चव्हाण म्हणालेत. शेअर बाजारात सुरु असलेल्या उलथापालथीतही या शेअरने ताकद दाखवली आहे. नुकताच हा शेअर स्टॉक त्याच्या कंसोलिडेशनमधून बाहेर पडल्याचे दिसून आले आणि डेली चार्टवर बुलिश फ्लॅग पॅटर्न तयार केला आहे.

किमतीत वाढ होण्याबरोबरच शेअर्सच्या व्हॉल्यूममध्ये जोरदार वाढ झाली आहे. सध्याच्या किमतीत 7170 रुपयांच्या स्टॉपलॉससह या स्टॉकमध्ये 7400 रुपयांचे टारगेट निश्चित केले आहे.

मणप्पुरम फायनान्स (Manappuram Finance)

समीत चव्हाण यांनी मणप्पुरम फायनान्सचे शेअर्स विकण्याचा सल्ला आहे. येत्या काळात या स्टॉकमध्ये 3% ची घसरण होण्याचा धोका समीत यांनी वर्तवला आहे. गेल्या काही महिन्यांपासून या शेअरमध्ये कमजोरी दिसून येत आहे.

गेल्या सुमारे 3 आठवड्यांपासून हा स्टॉक त्याच्या शॉर्ट-टर्म मूव्हिंग एव्हरेजच्या आसपास आहे. त्यामुळेच या शेअरमध्ये आणखी कमजोरीचे संकेत असताना समीत चव्हाण यांनी हे शेअर्स विकण्याचा सल्ला दिला आहे.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aadhaar New Rules : आता आधारची झेरॉक्स काढणे बंद, सरकारचा मोठा निर्णय; नवा नियम कशामुळे लागू?

Ajay Murdia: चित्रपट निर्माते भट्ट यांच्यावर गुन्हा दाखल करणारे उद्योजक अजय मुरडिया नेमके कोण? मोठे दावे अन् महत्त्वाची माहिती समोर

नेहरूंनी 'वंदे मातरम्'ऐवजी 'जन-गण-मन' राष्ट्रगीत म्हणून का निवडलं? ७७ वर्षांपूर्वी काय भूमिका मांडलेली? वाचा

Latest Marathi News Update : नांदेड विद्यापीठाच्या क्रीडा महोत्सवातील खेळाडूंच्या जेवणात निघाल्या आळ्या

INC आता IMC बनलंय, नेहरुंमुळे वंदे मातरमचे तुकडे; पंतप्रधान मोदींचा लोकसभेत काँग्रेसवर घणाघात

SCROLL FOR NEXT