Stock Market Crash Sakal
Share Market

Stock Market Crash: जागतिक बाजारपेठेत हाहाकार, 22 अब्जाधीशांनी गमावले 30,01,98,31,58,000 रुपये

Stock Market Crash: भारताबरोबरच जगभरातील शेअर बाजारांमध्ये मोठी घसरण झाली आहे.

राहुल शेळके

Stock Market Crash: बुधवारी भारताबरोबरच जगभरातील शेअर बाजारांमध्ये घसरण झाली. त्यामुळे जगातील 22 अब्जाधीशांच्या संपत्तीचे मोठे नुकसान झाले. जगातील 22 अब्जाधीशांच्या संपत्तीत एकाच वेळी मोठी घसरण झाली. या अब्जाधीशांच्या संपत्तीत सामुहिक 3 लाख कोटी रुपयांची म्हणजेच 36 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त घट झाली आहे.

ज्यामध्ये सर्वात जास्त नुकसान इलॉन मस्क आणि बर्नार्ड अर्नॉल्ट यांचे झाले आहे. दुसरीकडे, भारतातील अंबानी अदानी यांच्यासह टॉप 14 अब्जाधीशांच्या संपत्तीत घट झाली आहे.

22 अब्जाधीशांच्या संपत्तीत घट

जगातील 22 अब्जाधीशांच्या संपत्तीत एकाच वेळी घसरण झाल्याचे असे प्रसंग क्वचितच पाहायला मिळतात. इलॉन मस्क ते गौतम अदानी यांच्यापर्यंत जगातील 22 अब्जाधीशांच्या संपत्तीत 3 लाख कोटी रुपयांची घट झाली आहे.

जर आपण डॉलरमध्ये पाहिले तर हा आकडा 36 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त आहे. इलॉन मस्क व्यतिरिक्त बेझोस, झुकेरबर्ग, बिल गेट्स, अंबानी आणि भारतातील अदानी यांचाही या यादीत समावेश आहे.

Bloomberg Billionaires Index

मस्कच्या संपत्तीत सर्वाधिक घट

जर आपण टॉप 10 अब्जाधीशांबद्दल बोललो तर सर्वात मोठी घसरण इलॉन मस्कच्या संपत्तीत दिसून आली. बुधवारी, मस्कची एकूण संपत्ती सुमारे 5 अब्ज डॉलरने कमी होऊन 233 अब्ज डॉलर झाली आहे.

मस्कच्या नेट वर्थमध्ये सलग दुसऱ्या दिवशी घसरण झाली आहे. बर्नार्ड अर्नॉल्टच्या संपत्तीत 4 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त घट झाली आहे. जेफ बेझोस यांच्या संपत्तीत 3.52 डॉलर्सने घट झाली आहे.

वॉरेन बफेच्या संपत्तीत सर्वात कमी घट झाली. त्यांचे केवळ 416 दशलक्षचे नुकसान झाले. तर लॅरी एलिसन, लॅरी पेज, मार्क झुकरबर्ग, स्टीव्ह बाल्मर, सर्जी ब्रिन यांच्या संपत्तीत 2 ते 3 अब्ज डॉलरची घट झाली आहे.

अंबानी आणि अदानींचा संपत्तीत घट झाली

अंबानी आणि अदानी यांच्या संपत्तीतही घट झाली आहे. आशियातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या संपत्तीत 1.27 अब्ज डॉलरची घट झाली आहे. त्यानंतर त्यांची एकूण संपत्ती 94.5 बिलियन डॉलर झाली आहे.

तर गौतम अदानी यांच्या संपत्तीत 1.08 अब्ज डॉलरची घट झाली आहे आणि एकूण संपत्ती 62.8 बिलियन डॉलरवर आली आहे. या दोघांशिवाय शापूर मिस्त्री, शिव नादर, अझीम प्रेमजी, लक्ष्मी मित्तल यांसारख्या 19 अब्जाधीशांच्या संपत्तीत घट झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT