Share Market Latest Updates Sakal
Share Market

Stock Market Holiday: 'या' आठवड्यात शेअर बाजार किती दिवशी बंद राहणार? जाणून घ्या बाजाराचे संपूर्ण वेळापत्रक

Stock Market Holiday This Week: BSE, NSE सह सर्व बाजार आज बंद राहणार

राहुल शेळके

Stock Market Holiday:  मंगळवार, 15 ऑगस्ट रोजी देश आपला 77 वा स्वातंत्र्यदिन साजरा करत आहे. स्वातंत्र्याच्या 76 व्या वर्धापन दिनानिमित्त देशाचा शेअर बाजार बंद राहणार आहे. नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) आणि बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज (BSE) यांना आज स्वातंत्र्य दिनानिमित्त सुट्टी असेल. या दिवशी दोन्ही प्रमुख निर्देशांकांमध्ये कोणतेही काम होणार नाही आणि उद्या बुधवारी शेअर बाजारात व्यवहार होईल.

बीएसईच्या वेबसाइटवर माहिती दिली

स्वातंत्र्यदिनी देशाच्या शेअर बाजारात कोणताही ट्रेंड नसला तरी चलन बाजार आणि मल्टी कमोडिटी एक्सचेंजला सुट्टी असेल. बीएसईच्या वेबसाइटनुसार, 15 ऑगस्ट रोजी इक्विटी सेगमेंट, इक्विटी डेरिव्हेटिव्ह सेगमेंट आणि एसएलबी सेगमेंटमध्ये कोणतेही ट्रेडिंग होणार नाही. मंगळवारच्या कमोडिटी मार्केटमध्ये सकाळचे सत्र आणि सायंकाळच्या सत्रात व्यवहार बंद राहतील.

चलन बाजारातील व्यवहार या आठवड्यात दोन दिवस बंद राहणार

चलन बाजारातील व्यवहार या आठवड्यात दोन दिवस बंद राहणार आहेत. याचे कारण म्हणजे 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनानिमित्त चलन डेरिव्हेटिव्हमध्ये कोणताही व्यापार होणार नाही, तर 16 ऑगस्ट रोजी पारशी नववर्ष निमित्त चलन बाजारात कोणतेही व्यवहार होणार नाहीत.

Stock Market Holiday List

शेअर बाजार किती दिवस बंद राहणार आहे?

यंदाच्या उर्वरित सुट्ट्यांमध्ये गणेश चतुर्थी (19सप्टेंबर), महात्मा गांधी जयंती (2 ऑक्टोबर), दसरा (24 ऑक्टोबर), दिवाळी बली प्रतिपदा (14 नोव्हेंबर), गुरु नानक जयंती (27 नोव्हेंबर) आणि ख्रिसमस (25 डिसेंबर) या दिवशी शेअर बाजारात व्यवहार होणार नाहीत.

काल बाजार कसा होता?

कालच्या व्यवहारात बीएसईचा 30 शेअर्सचा निर्देशांक 168.85 अंकांच्या किंवा 0.26 टक्क्यांच्या घसरणीसह 65,153 च्या पातळीवर उघडला. दुसरीकडे, NSE चा 50 शेअर्सचा निर्देशांक निफ्टी 44.35 अंकांच्या किंवा 0.23 टक्क्यांच्या घसरणीसह 19,383 च्या पातळीवर उघडला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : पुण्यात वर्दळीच्या रस्त्यावर "ड्रंक अँड ड्राइव्ह"चा थरार; मद्यधुंद चालकाने आधी दुचाकीला धडक दिली अन् मग...

Latest Marathi News Live Update: माढा तालुक्यातील पूरग्रस्त १८ गावांना विविध समाजसेवी संस्थांकडून मदतीचा ओघ

Amit Shah: महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना लवकरच दिलासा मिळणार! अमित शहांनी राज्य सरकारने दिले मोठे आश्वासन, म्हणाले...

West Bengal Rains : पश्चिम बंगालमध्ये पावसाचा कहर; दार्जिलिंगमधील भूस्खलनात आतापर्यत १८ जणांचा मृत्यू, पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक

INDW vs PAKW: पाकिस्तानी कर्णधाराने चालू सामन्यात स्प्रे मारला, नंतर सर्वच खेळाडूंना मैदानाबाहेर काढलं; नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT