Share Market latest updates today  Sakal
Share Market

Stock Market Holiday: ऑक्टोबरमध्ये एकूण 11 दिवस शेअर बाजार राहणार बंद, आज ट्रेडिंग होणार का?

Stock Market Holiday: ऑक्टोबर महिन्यात शेअर बाजार एकूण 11 दिवस बंद राहणार आहे.

राहुल शेळके

Stock Market Holiday: ऑक्‍टोबर महिन्याची सुरुवात सुट्ट्यांसह होत असल्याने या आठवड्यात तुम्हाला शेअर बाजारातील ट्रे़डिंगसाठी फक्त चार दिवस मिळणार आहेत. 1 ऑक्टोबरला रविवार असल्याने शेअर बाजार बंद होता.

तर आज गांधी जयंतीनिमित्त 2 ऑक्टोबरला शेअर बाजार बंद असणार आहे. शेअर बाजार बंद असल्याने आज कोणतेही व्यवहार होणार नाहीत. शेअर्सच्या खरेदी-विक्रीचे कोणतेही काम होणार नाही. ऑक्टोबर महिन्यात शेअर बाजार एकूण 11 दिवस बंद राहणार आहे.

ऑक्टोबरमध्ये शेअर बाजार किती दिवस बंद राहणार?

ऑक्टोबरमध्ये एकूण 11 दिवस शेअर बाजार बंद राहणार आहे. दर आठवड्याला शनिवार-रविवारची सुट्टी सोडली तर ऑक्टोबरमध्ये अनेक सुट्ट्या आहेत, त्यामुळे जवळपास 11 दिवस शेअर बाजारात कोणताही व्यवहार होणार नाही.

Stock Market Holiday List

ऑक्टोबर महीन्यातील सुट्ट्या :

  • 1ऑक्टोबर- रविवारमुळे शेअर बाजार बंद.

  • 2 ऑक्टोबर- गांधी जयंतीनिमित्त शेअर बाजार बंद.

  • 7 ऑक्टोबर - शनिवारमुळे शेअर बाजार बंद राहणार आहे.

  • 8 ऑक्टोबर - रविवारमुळे शेअर बाजार बंद राहतील.

  • 14 ऑक्टोबर - शनिवारमुळे शेअर बाजार बंद राहतील.

  • 15 ऑक्टोबर - रविवारमुळे शेअर बाजाराला सुट्टी असेल.

  • 21 ऑक्टोबर - शनिवारमुळे शेअर बाजार बंद राहणार आहे.

  • 22 ऑक्टोबर - रविवारमुळे शेअर बाजार बंद राहणार आहे.

  • 24, ऑक्टोबर - दसऱ्यामुळे शेअर बाजारात कोणतेही कामकाज होणार नाही.

  • 28 ऑक्टोबर- शनिवारमुळे शेअर बाजार बंद राहतील.

  • 29 ऑक्टोबर- रविवारमुळे शेअर बाजार बंद राहणार आहे.

गेल्या आठवडाभरात मोठी घसरण

गेल्या आठवड्याच्या शेवटच्या दिवशी सेन्सेक्स 320 अंकांच्या तेजीसह 65,828.41 अंकांवर बंद झाला. आठवडाभरात सेन्सेक्स सुमारे 215 अंकांनी किंवा 0.32 टक्क्यांनी घसरला.

निफ्टी शुक्रवारी सुमारे 115 अंकांच्या वाढीसह 19,638.30 अंकांवर बंद झाला. गेल्या आठवड्यात निफ्टीमध्ये 0.08 टक्क्यांची किंचित घसरण झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC विद्यार्थ्यांचं आंदोलन मागे, चौकशी पूर्ण होईपर्यंत अध्यक्ष सक्तीच्या रजेवर; मध्यरात्री घडामोडी, पुण्यात आंदोलकांचा जल्लोष

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

SCROLL FOR NEXT