Independence Day  Sakal
Share Market

Share Market Holiday: स्वातंत्र्यदिनी शेअर बाजार आणि बँका राहणार बंद; स्टॉक एक्सचेंजने दिली माहिती

Independence Day 2024: उद्या म्हणजेच 15 ऑगस्ट रोजी देशभरात स्वातंत्र्यदिनाचा उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा होणार आहे. हा राष्ट्रीय सण आहे, त्यामुळे देशातील सर्व सरकारी आणि निमसरकारी संस्था बंद राहतील.

राहुल शेळके

Bank Holiday on Independence Day 2024: उद्या म्हणजेच 15 ऑगस्ट रोजी देशभरात स्वातंत्र्यदिनाचा उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा होणार आहे. हा राष्ट्रीय सण आहे, त्यामुळे देशातील सर्व सरकारी आणि निमसरकारी संस्था बंद राहतील. यामध्ये बँकांचाही समावेश आहे. जर तुम्हाला बँकांशी संबंधित कोणतेही महत्त्वाचे आर्थिक काम पूर्ण करायचे असेल तर ते आजच पूर्ण करा.

कारण उद्या देशभरात बँका बंद राहणार आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (आरबीआय) सुट्टीच्या यादीनुसार, 15 ऑगस्ट व्यतिरिक्त, विविध सणांमुळे पुढील 15 दिवसांत बँकांना अनेक सुट्ट्या असणार आहेत.

ऑगस्टमध्ये बँकांना किती दिवस सुट्ट्या असतील?

उद्या म्हणजेच 15 ऑगस्टला स्वातंत्र्य दिनानिमित्त सर्व सरकारी, खासगी आणि ग्रामीण बँकांना सुट्टी असेल. यानंतर 16 आणि 17 ऑगस्ट रोजी बँका काम करतील. यानंतर रविवार असल्याने 18 ऑगस्ट रोजी देशभरातील बँकांना सुट्टी असेल. 19 ऑगस्ट रोजी रक्षाबंधन असल्याने बँका बंद राहतील.

यानंतर 24 ऑगस्ट रोजी चौथ्या शनिवारी बँकेला सुट्टी असेल. रविवार असल्याने 25 ऑगस्टला बँकेला सुट्टी असेल. श्रीकृष्ण जन्माष्टमीमुळे 26 ऑगस्ट रोजी बँका या दिवशी बंद राहतील.

येत्या दोन आठवड्यांत बँकांना अनेक सुट्ट्या आहेत. अशा परिस्थितीत रिझर्व्ह बँकेची यादी पाहूनच बँकेत जावे. त्याचबरोबर बदलत्या तंत्रज्ञानामुळे बँकांशी संबंधित महत्त्वाची कामे सुट्टीच्या दिवशीही पूर्ण होऊ शकतात. सुट्टीच्या दिवशी पैसे काढण्यासाठी एटीएम वापरा. एका खात्यातून दुसऱ्या खात्यात पैसे ट्रान्सफर करण्यासाठी तुम्ही नेट बँकिंग किंवा मोबाईल बँकिंग वापरू शकता.

शेअर बाजारही बंद राहणार का?

उद्या 15 ऑगस्ट रोजी बँकांव्यतिरिक्त शेअर बाजारात सुट्टी असेल. स्वातंत्र्यदिन हा राष्ट्रीय सण आहे. यामुळे NSE आणि BSE वर कोणताही व्यवहार होणार नाही. अशा परिस्थितीत, इक्विटी, इक्विटी डेरिव्हेटिव्ह्ज, एसएलबी, करन्सी डेरिव्हेटिव्ह आणि इंटरेस्ट डेरिव्हेटिव्ह बाजार उद्याही बंद राहतील. यानंतर शुक्रवारी बाजार सुरळीत चालेल. शनिवार व रविवार बाजाराला सुट्टी असेल.

ऑगस्टमध्ये या दिवसात बाजारात कोणताही व्यवहार होणार नाही-

  • 15 ऑगस्ट 2024 - स्वातंत्र्यदिनी शेअर बाजार बंद राहील.

  • 17 ऑगस्ट 2024- शनिवार सुट्टीचा दिवस असेल

  • 18 ऑगस्ट 2024 - रविवारी सुट्टी असेल

  • 24 ऑगस्ट 2024 - शनिवारमुळे बाजार बंद राहील

  • 25 ऑगस्ट 2024 - रविवारमुळे सुट्टी असेल

  • 31 ऑगस्ट 2024 - शनिवारमुळे बाजार बंद राहील

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Award List: ऑरेंज-पर्पल कॅप आणि बक्कळ पैसा... पुरस्कार सोहळ्यातही वैभव सूर्यवंशीचाच डंका! पाहा विजेत्यांची संपूर्ण यादी

IPL 2026 Final: "जितेश राव, कसं वाटतंय?" हर्षा भोगलेंच्या प्रश्नावर RCB च्या Jitesh Sharma चं मराठीतून उत्तर; म्हणाला...

Virat Kohli Reaction : "आता मॅच जिंकवण्यासाठी मला एकट्यालाच मैदानात उतरावं लागत नाही!" विराट कोहली भावुक

Vaibhav Sooryavanshi : १५ वर्षाच्या पोराने मैदान गाजवले... Orange Cap सह ५ पुरस्कार जिंकल्यानंतर म्हणाला, या पर्वात शिकलो की...

IPL 2026: वैभव सूर्यवंशीला ५ पुरस्कार अन् पैशांचा पाऊस! १५ वर्षांच्या पोराला कारसह BCCI कडून किती रुपयांचे बक्षीस मिळाले?

SCROLL FOR NEXT