Stock market holiday on Dussehra A complete list of trading holidays this year  Sakal
Share Market

Stock Market Holiday: आज शेअर बाजार चालू आहे की बंद? पहा सुट्ट्यांची संपूर्ण यादी

Stock Market Holiday: शेअर बाजारात गुंतवणूक आणि ट्रेडिंग करणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे.

राहुल शेळके

Stock Market Holiday: शेअर बाजारात गुंतवणूक आणि ट्रेडिंग करणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. मंगळवारी (24 ऑक्टोबर) दसऱ्याचा सण आहे. दसऱ्याच्या दिवशी शेअर बाजार बंद राहणार आहेत. या दिवशी गुंतवणूकदार ट्रेडिंग करू शकणार नाहीत. गुंतवणूकदार बुधवारी (25 ऑक्टोबर) शेअर बाजारात ट्रेडिंग आणि गुंतवणूक करू शकतात.

Stock Market Holiday List

एनएसई आणि बीएसई या दोन्ही स्टॉक एक्स्चेंजवर शेअर बाजारात आज कोणत्याही प्रकारचे व्यवहार होणार नाहीत. इक्विटीसह, तुम्ही फ्युचर्स आणि ऑप्शन्स सारख्या डेरिव्हेटिव्ह सेगमेंटमध्ये देखील व्यापार करू शकणार नाही. यासोबतच एसएलबी सेगमेंटमध्येही कोणताही व्यवसाय होणार नाही.

कमोडिटी डेरिव्हेटिव्ह सेगमेंट आणि इलेक्ट्रॉनिक गोल्ड रिसीट (EGR) सेगमेंटमधील ट्रेडिंग सकाळच्या सत्रात म्हणजे सकाळी 9 ते संध्याकाळी 5 पर्यंत बंद राहील.

2023 मध्ये शेअर बाजार किती दिवस राहणार बंद?

शेअर बाजाराच्या सुट्ट्यांच्या यादीनुसार दसऱ्याव्यतिरिक्त नोव्हेंबरमध्ये अनेक दिवस शेअर बाजार बंद राहणार आहेत. 14 नोव्हेंबर 2023 रोजी बलिप्रतिपदेच्या मुहूर्तावर शेअर बाजारात कोणताही व्यवहार होणार नाही.

गुरु नानक जयंतीनिमित्त 27 नोव्हेंबर रोजी शेअर बाजार बंद राहणार आहे. याशिवाय 25 डिसेंबर 2023 रोजी ख्रिसमसनिमित्त शेअर बाजार बंद राहणार आहे.

याशिवाय 12 नोव्हेंबर 2023 रोजी दिवाळी किंवा लक्ष्मीपूजनाच्या दिवशी विशेष मुहूर्त ट्रेंडिंग आयोजित केले जाईल. या दिवशी शेअर बाजार संध्याकाळी एक तास उघडेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Goa Highway Traffic Jam Update : झाली दिवाळी! परतीच्या प्रवासातही वाहतूक कोंडी, मुंबई-गोवा महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा....

Satara Doctor Case : साताऱ्यात महिला डॉक्टरने शारीरिक अत्याचाराला कंटाळून जीव दिला! तिच्यावर दबाव टाकणारा 'तो' खासदार कोण?

AUS vs IND: विराट -रोहितची फक्त फलंदाजीमध्येच नाही, तर फिल्डिंगमध्येही हवा; २-२ कॅच घेत केले मोठे विक्रम

Pune News : केंद्रीय मंत्री मोहोळ यांची जैन बोर्डिंगला भेट; जैन मुनींपुढे नतमस्तक

कसं गणित जुळवायचं? १० एकरात फक्त १२ क्विंटल सोयाबीन, नापिकी अन् कर्जबाजरीपणाला कंटाळून शेतकऱ्याने संपवलं जीवन

SCROLL FOR NEXT