Stock Market Holidays 2024 Sakal
Share Market

Share Market Holiday: पुढील 11 दिवसांत 6 दिवस शेअर बाजार राहणार बंद; BSE-NSEने दिली माहिती, काय आहे कारण?

Share Market Holiday: शेअर बाजारात मार्चच्या उरलेल्या 11 दिवसांत एकूण सहा सुट्ट्या असणार आहे. साप्ताहिक सुट्यांव्यतिरिक्त देशांतर्गत शेअर बाजार मार्च महिन्यात दोन दिवस बंद राहणार आहे. या दोन्ही दिवशी बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंजवर कोणतेही व्यवहार होणार नाहीत.

राहुल शेळके

Stock Market Holidays 2024: शेअर बाजारात मार्चच्या उरलेल्या 11 दिवसांत एकूण सहा सुट्ट्या असणार आहे. साप्ताहिक सुट्यांव्यतिरिक्त देशांतर्गत शेअर बाजार मार्च महिन्यात दोन दिवस बंद राहणार आहे. या दोन्ही दिवशी बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंजवर कोणतेही व्यवहार होणार नाहीत.

या सुट्ट्यांची माहिती आधीच एनएसई आणि बीएसई या दोन्ही एक्सचेंजच्या वेबसाइटवर देण्यात आली आहे. एक्सचेंजेसच्या वेबसाइट्सवर दिलेल्या माहितीनुसार, इक्विटी सेगमेंट, इक्विटी डेरिव्हेटिव्ह सेगमेंट आणि एसएलबी सेगमेंटमधील सर्व ट्रेडिंग मार्चमधील या दोन दिवशी शेअर बाजारात बंद राहतील. शनिवार आणि रविवारची साप्ताहिक सुट्टी व्यतिरिक्त 25 मार्च (सोमवार) होळीनिमित्त बाजारपेठा बंद राहतील. आणि 29 मार्च (शुक्रवार) गुड फ्रायडेनिमित्त बाजारपेठा बंद राहतील.

मार्च 2024 मध्ये शेअर बाजारात सुट्ट्या

23 मार्च : शनिवार

24 मार्च : रविवार

25 मार्च (सोमवार): होळी

29 मार्च (शुक्रवार): गुड फ्रायडे

30 मार्च : शनिवार

31 मार्च : रविवार

Stock Market Holidays 2024 India Full List

या दिवशी दोन्ही एक्सचेंजेसवर इक्विटी सेगमेंट, इक्विटी डेरिव्हेटिव्ह सेगमेंट आणि एसएलबी सेगमेंटमध्ये कोणतेही ट्रेडिंग होणार नाही. यानंतर 29 मार्चला (शुक्रवार) गुड फ्रायडेनिमित्त शेअर बाजार बंद राहणार आहे.

या दोन्ही सुट्या एकाच आठवड्यात असल्याने या आठवड्यात केवळ तीन दिवस बाजारपेठा सुरू राहणार आहेत. 25 मार्च आणि 29 मार्च रोजी करन्सी डेरिव्हेटिव्ह सेगमेंटमध्ये कोणतेही काम होणार नाही, अशी माहितीही एक्सचेंजेसवर देण्यात आली आहे.

25 मार्च रोजी होळीच्या निमित्ताने, कमोडिटी आणि इलेक्ट्रॉनिक गोल्ड रिसीट (EGR) विभागातील सकाळचे व्यवहार, म्हणजेच सकाळी 9 ते संध्याकाळी 5 या वेळेत होणारे व्यवहार बंद राहतील. परंतु, MCX वर संध्याकाळच्या सत्रासाठी ट्रेडिंग सुरू राहील.

कमोडिटी डेरिव्हेटिव्ह सेगमेंट आणि इलेक्ट्रॉनिक गोल्ड रिसीट (EGR) सेगमेंटमध्ये संध्याकाळी 5 ते सकाळी 9 या वेळेत ट्रेडिंग सुरू राहील. 29 मार्च रोजी गुड फ्रायडे निमित्त सकाळ आणि संध्याकाळच्या सत्रात व्यवसाय बंद राहतील.

साप्ताहिक सुट्या व्यतिरिक्त, देशांतर्गत शेअर बाजार 2024 मध्ये एकूण 10 दिवस बंद राहतील. एप्रिलमध्ये दोन दिवस, मे-जून-जुलै-ऑगस्ट आणि ऑक्टोबरमध्ये प्रत्येकी एक दिवस शेअर बाजार बंद राहतील. याशिवाय नोव्हेंबर महिन्यात बाजार दोन दिवस बंद राहणार आहे. तर डिसेंबर महिन्यात बाजार 1 दिवस बंद राहणार आहे.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 3rd T20I: टीम इंडियाचे घालीन लोटांगण! इंग्लंडने ७६ धावांवर श्रेयस अय्यरच्या संघाला गुंडाळले; फलंदाज तोंड लपवताना दिसले

IND vs ENG 3rd T20I: २० चेंडूंत ५ विकेट्स! वैभव सूर्यवंशी बघा कसा OUT झाला! इंग्लंडने सापळा रचून करेक्ट कार्यक्रम केला.. Video

Argentina vs Egypt: थरार, थरार, थरार... मेस्सीची पेनल्टी हुकली तरीही अर्जेंटिनाने पिछाडीवरून मुसंडी मारली; १३ मिनिटांत मॅच फिरवली

IND vs ENG 3rd T20I: फिल सॉल्टची तुफान फटकेबाजी, इंग्लंडचे भारतासमोर तगडे लक्ष्य... प्रिंस यादव, हर्षित राणा चमकले पण...

FDA Raid : दूग्ध प्रक्रिया उद्योगावर FDAचा छापा; भेसळयुक्त दूध केले जप्त

SCROLL FOR NEXT