Stock market holidays in 2023 NSE, BSE to remain closed on November 27 for Guru Nanak Jayanti  Sakal
Share Market

Stock Market Holiday: पुढील आठवड्यात 'या' दिवशी शेअर बाजार राहणार बंद, काय आहे कारण?

Stock Market Holiday: नोव्हेंबर महिन्यातील भारतीय शेअर बाजाराची ही दुसरी सुट्टी असेल.

राहुल शेळके

Stock Market Holiday: पुढील आठवड्यात गुरु नानक यांची जयंती आहे. या निमित्ताने शेअर बाजार बंद राहणार आहे. बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजवर उपलब्ध सुट्टीच्या यादीनुसार, गुरु नानक जयंतीनिमित्त भारतीय शेअर बाजार 27 नोव्हेंबर रोजी बंद असणार आहे. 27 नोव्हेंबरला म्हणजेच पुढच्या सोमवारी शेअर बाजारात कोणताही व्यवहार होणार नाही.

27 नोव्हेंबरला बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंजमध्ये कोणतेही व्यवहार होणार नाहीत. इक्विटी सेगमेंट, इक्विटी डेरिव्हेटिव्ह सेगमेंट, SLB सेगमेंट आणि करन्सी डेरिव्हेटिव्ह मार्केट 27 नोव्हेंबर रोजी बंद राहतील आणि येथे कोणतेही ट्रेडिंग होणार नाही.

27 नोव्हेंबर ही गुरु नानक जयंती आहे आणि या दिवशी शीखांचे पहिले गुरू, गुरु नानक देवजी यांचा जन्म झाला होता. हा दिवस शीख धर्मात अतिशय पवित्र दिवस म्हणून साजरा केला जातो.

नोव्हेंबर महिन्यातील भारतीय शेअर बाजाराची ही दुसरी सुट्टी आहे. याआधी 14 नोव्हेंबरला दिवाळी बलिप्रतिपदेनिमित्त देशांतर्गत शेअर बाजारही बंद राहिला होता. या वर्षी, देशांतर्गत शेअर बाजार कॅलेंडरनुसार 15 सुट्ट्या आहेत, ज्या गेल्या वर्षी म्हणजेच 2022 च्या तुलनेत 2 अधिक सुट्ट्या आहेत.

या वर्षी बाजार कसा होता?

देशांतर्गत बाजारासाठी 2023 हे वर्ष चांगले ठरले आहे. या वर्षात आतापर्यंत सेन्सेक्स सुमारे 8 टक्के वाढला आहे, तर निफ्टी सुमारे 9 टक्के वाढला आहे. वर्षभरात बीएसई सेन्सेक्स आणि एनएसई निफ्टी या दोघांनी सातत्याने ऐतिहासिक उच्चांक गाठला. दोन्ही प्रमुख निर्देशांक त्यांच्या उच्च पातळीपासून किंचित घसरले आहेत.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

EPF Rule: नोकरी बदलली तर 5 वर्षांचा PF नियम तुटतो का? NCP Days म्हणजे काय? पेन्शन-टॅक्सवर काय परिणाम

Summer Heatwave : उन्हाच्या तडाख्याने कळपावर संकट; २८ मेंढ्यांचा मृत्यू, ७० मेंढ्यांवर उपचार सुरू

Mumbai Goa Highway Update : गडकरी म्हणाले महिनाभर, पण वास्तव काही वेगळंच! मुंबई-गोवा महामार्गाची पाहा सविस्तर 'डेडलाईन'; पावसाळ्यापूर्वी रस्ता होणार का चकाचक?

Electricity Bill Saving Tips : सरकारने स्वतःच सांगितली लाईट बिल कमी करण्याची पद्धत; मीटर पळेल एकदम हळू, पाहा सोपी ट्रिक

Latest Marathi News Live Update: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात, अनेकांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT