Share Market Closing Latest Update Sakal
Share Market

Share Market Closing: शेअर बाजारात जोरदार खरेदी, सेन्सेक्स 483 अंकांनी वधारला; कोणते शेअर्स चमकले?

Share Market Closing Latest Update 13 February 2024: मंगळवारी शेअर बाजारात खरेदी झाली. बाजारातील प्रमुख निर्देशांक वाढीसह बंद झाले. मिश्र जागतिक संकेत आणि हेवीवेट शेअर्समध्ये जबरदस्त खरेदी झाली यामुळे बाजाराला पाठिंबा मिळाला. यामुळे सेन्सेक्सने 482 अंकांची उसळी घेतली आणि 71,555 वर बंद झाला.

राहुल शेळके

Share Market Closing Latest Update 13 February 2024: मंगळवारी शेअर बाजारात खरेदी झाली. बाजारातील प्रमुख निर्देशांक वाढीसह बंद झाले. मिश्र जागतिक संकेत आणि हेवीवेट शेअर्समध्ये जबरदस्त खरेदी झाली यामुळे बाजाराला पाठिंबा मिळाला.

यामुळे सेन्सेक्सने 482 अंकांची उसळी घेतली आणि 71,555 वर बंद झाला. निफ्टीही 127 अंकांनी वधारुन निर्देशांक 21,743 वर बंद झाला. बँकिंग, वित्तीय सेवा, तेल, गॅस, फार्मा आणि हेल्थकेअरमध्ये बाजारात सर्वाधिक खरेदी झाली.

निफ्टी बँक निर्देशांकात एक टक्क्यांहून अधिक वाढ झाली. आयशर मोटर्सने चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले असून त्यांचा करानंतरचा नफा 34 टक्क्यांनी वाढून 996 कोटी रुपयांच्या पुढे गेला आहे. (Stock market Nifty 50, Sensex end higher; investors pocket nearly 2 lakh crore in a day)

क्षेत्रीय निर्देशांकाची स्थिती

मंगळवारी शेअर बाजारात खासगी बँकिंग शेअर्समध्ये मोठी वाढ दिसून आली. सेन्सेक्स आणि निफ्टीच्या वाढीसह, निफ्टी मिडकॅप 100, बीएसई स्मॉल कॅप, निफ्टी आयटी, निफ्टी बँक, निफ्टी फार्मा, निफ्टी एफएमसीजी आणि निफ्टी फायनान्शियल सर्व्हिसेसमध्ये वाढ झाली. निफ्टी ऑटो निर्देशांक किंचित घसरणीसह बंद झाला.

कोणते शेअर्स वाढले?

शेअर बाजारातील टॉप गेनर्समध्ये कोल इंडिया, यूपीएल, ॲक्सिस बँक, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी लाइफ, एसबीआय लाइफ आणि विप्रोचे शेअर्स होते, तर शेअर बाजारातील सर्वाधिक नुकसान झालेल्यांमध्ये हिंदाल्को, ग्रासिम इंडस्ट्रीज, अल्ट्राटेक सिमेंट, महिंद्रा अँड महिंद्रा, Divi's Labs, BPCL आणि Titan चे शेअर्स होते.

कोणते शेअर्स 52 आठवड्यांच्या उच्चांकावर?

अपोलो हॉस्पिटल, सिप्ला, बजाज ऑटो, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि डॉ. रेड्डीज लॅबचे शेअर्स 52 आठवड्यांच्या उच्चांकावर पोहोचले. पेटीएम, ओरिएंट इलेक्ट्रिक, राजेश एक्सपोर्ट, पॉलीप्लेक्स, विनती ऑरगॅनिक्स, दीपक फर्टिलायझर्स आणि वेदांत फॅशन यांचे शेअर्स 52 आठवड्यांच्या नीचांकी पातळीर होते.

गुंतवणूकदारांनी कमावले 1.96 लाख कोटी

12 फेब्रुवारी 2024 रोजी, BSE वर कंपन्यांचे मार्केट कॅप रुपये 3,78,84,837.13 कोटी होते. आज म्हणजेच 13 फेब्रुवारी 2024 रोजी ते 3,80,80,864.70 कोटी रुपयांवर पोहोचले. याचा अर्थ आज गुंतवणूकदारांच्या भांडवलात 1.96 लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BJP vs Shivsena: २०२९ तयारी? भाजपमधील इनकमींगची दूसरी बाजू काय? शिंदे गटाच्या नेत्यांविरुद्ध ‘स्ट्राँग प्लॅन-B’ तयार?

एक-दोन नाही सात दिवसात शूट केलाय गोंधळ सिनेमाचा 25 मिनिटांचा वनटेक सीन !

Solapur Politics:'सोलापूर जिल्ह्यात नगराध्यक्षपदाचे २५, तर नगरसेवकचे ४८२ अर्ज बाद'; हरकतींमुळे रात्री उशिरापर्यंत छाननी, सांगोल्यात काय घडलं?

Mundhwa Land Scam : शीतल तेजवानी, अमेडिया कंपनीला समन्स; खारगे समितीपुढे सुनावणी, व्यवहाराची इत्थंभुत माहिती घेणार

Rising Star Asia Cup 2025 : भारत 'अ' संघाचा ओमान 'अ' संघावर ६ गडी राखून दणदणीत विजय, सेमिफानलचं तिकीट केलं पक्क...

SCROLL FOR NEXT