Stock Market Today Sakal
Share Market

Stock Market Open Today: सुट्टीच्या दिवशीही उघडणार शेअर बाजार; काय आहे कारण? तुम्हाला ट्रेडिंग करता येणार का?

Stock Market Open Today: भारतातील शेअर बाजार शनिवारी बंद असतात, परंतु देशातील शेअर बाजार सप्टेंबरच्या शेवटच्या शनिवारी म्हणजेच 28 सप्टेंबरला खुला राहणार आहे. अशा स्थितीत शेअर बाजार खुला असण्याचे कारण आणि ट्रेडिंगची वेळ जाणून घेणे तुमच्यासाठी महत्त्वाचे आहे.

राहुल शेळके

Stock Market Open Today: भारतातील शेअर बाजार शनिवारी बंद असतात, परंतु देशातील शेअर बाजार सप्टेंबरच्या शेवटच्या शनिवारी म्हणजेच 28 सप्टेंबरला खुला राहणार आहे. अशा स्थितीत शेअर बाजार खुला असण्याचे कारण आणि ट्रेडिंगची वेळ जाणून घेणे तुमच्यासाठी महत्त्वाचे आहे.

शनिवारी नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) आपल्या प्लॅटफॉर्मवर 'मॉक ट्रेडिंग सेशन' सुरू करणार आहे. हे ट्रेडिंग सत्र NSE च्या डिझास्टर रिकव्हरी साइटवर होईल आणि त्यांच्या नियमित साइटवर नाही. संकटाच्या वेळी NSE वर व्यापार सुरू ठेवण्याच्या क्षमतेची चाचणी करणे हा त्याचा उद्देश आहे.

स्टॉक मार्केट ट्रेडिंगच्या वेळा

NSEने दिलेल्या माहितीनुसार शनिवारी मॉक ट्रेडिंग सत्र दुपारी 12 वाजता सुरू होईल आणि दुपारी 1 वाजेपर्यंत सुरू राहील. तर NSE ने 30 सप्टेंबर ते 3 ऑक्टोबर या कालावधीत डिझास्टर रिकव्हरी साइटवर थेट ट्रेडिंग सत्र देखील शेड्यूल केली आहेत. यामध्ये 30 सप्टेंबर आणि 1 ऑक्टोबरची सत्रे नियमित बाजाराच्या वेळेत होणार आहेत.

एनएसईने चाचणीसाठी हे मॉक ट्रेडिंग सत्र आयोजित केले आहे. NSE ने 2024 मध्ये अशी दोन ट्रेडिंग सत्रे आधीच आयोजित केली आहेत. एकदा असे ट्रेडिंग सत्र 2 मार्चला आणि दुसरे ट्रेडिंग सत्र 18 मे रोजी झाले.

गुंतवणूकदार व्यवहार करू शकतील का?

हे एक मॉक ट्रेडिंग सत्र आहे, म्हणून NSE ने मॉक ट्रेडिंग सत्रात, ब्रोकर्स आणि त्यांचे क्लायंट 'खरेदी' आणि 'विक्री' ऑर्डर देऊ शकतात. मात्र, या काळात कोणतेही आर्थिक व्यवहार होणार नाहीत. अशा परिस्थितीत, सामान्य गुंतवणूकदार व्यापारात भाग घेऊ शकतील, परंतु या कालावधीत ते प्रत्यक्षात कोणतेही व्यवहार करणार नाहीत.

अशा सत्रांमुळे एक्सचेंजला दीर्घकालीन फायदा होतो. जोखीम व्यवस्थापनाचा हा एक भाग आहे. अशा चाचण्या सायबर हल्ला, त्रुटी किंवा बिघाड यासारख्या आपत्कालीन परिस्थितीत बाजारातील कामकाज सुरळीत ठेवण्यासाठी केल्या जातात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amravati News : दहा दिवसांच्या बाळावर अघोरी उपचार; गरम विळ्याने दिले ३९ चटके अन्... मेळघाटातील धक्कादायक प्रकार

Tulsi Remedies Ekadashi: आषाढी एकादशीला करा तुळशीचे 'हे' उपाय सर्व मनोकामना होतील पूर्ण

Ashadhi Wari: विदर्भातून १५९४ मध्ये निघाली पहिली पालखी; १९३८ दिंड्या पंढरपुरात,रुक्मिणी संस्थान नंतर चंदाजी महाराज दिंडीचा समावेश

Elon Musk New Party: इलॉन मस्क स्थापन करणार अमेरिकेतील तिसरा सर्वात मोठा पक्ष, डोनाल्ड ट्रम्प यांचा फायदा होणार की नुकसान?

Ashadhi Ekadashi: देहेडच्या पुरातन वटवृक्षावर ‘कान्होपात्राची महावेल’;भोकरदन तालुक्यातील विठ्ठल भक्त दर्शनासाठी करतात गर्दी

SCROLL FOR NEXT