Nifty 50, Sensex see deep cuts as investors lose Sakal
Share Market

Share Market Closing: शेअर बाजारातील 4 दिवसांच्या तेजीला ब्रेक; सेन्सेक्स 195 अंकांनी घसरला, कोणत्या क्षेत्रात वाढ?

Share Market Today: मंगळवारी शेअर बाजारात घसरण दिसून आली. सलग 4 दिवसांच्या वाढीनंतर प्रमुख निर्देशांक आज घसरणीसह बंद झाले. सेन्सेक्स 195 अंकांनी घसरून 73,677 वर आला. निफ्टीही 49 अंकांनी घसरून 22,356 वर आला.

राहुल शेळके

Share Market Closing Latest Update 5 March 2024: मंगळवारी शेअर बाजारात घसरण दिसून आली. सलग 4 दिवसांच्या वाढीनंतर प्रमुख निर्देशांक आज घसरणीसह बंद झाले. सेन्सेक्स 195 अंकांनी घसरून 73,677 वर आला. निफ्टीही 49 अंकांनी घसरून 22,356 वर आला. बाजारात सर्वाधिक घसरण आयटी, मीडिया, मेटल आणि खासगी बँकिंग क्षेत्रात झाली, तर ऑटो, फार्मा आणि पीएसयू बँकिंगमध्ये खरेदी झाली.

क्षेत्रीय निर्देशांकाची स्थिती

मंगळवारी शेअर बाजारातील घसरणी दरम्यान निफ्टी बँक, निफ्टी ऑटो आणि निफ्टी फार्मा निर्देशांकांत वाढ झाली. मंगळवारी निफ्टी मिडकॅप 100, बीएसई स्मॉल कॅप, निफ्टी आयटी, निफ्टी एफएमसीजी आणि निफ्टी फायनान्शियल सर्व्हिसेस निर्देशांक घसरणीसह बंद झाले.

टाटा मोटर्स, भारती एअरटेल, बजाज ऑटो, ओएनजीसी, एसबीआय, सन फार्मा आणि एनटीपीसी या कंपन्यांच्या शेअर्सचा शेअर बाजारातील टॉप गेनर्सच्या यादीत समावेश होता.

बजाज फिनसर्व्ह, बजाज फायनान्स, नेस्ले, एसबीआय लाइफ, इन्फोसिस, टीसीएस आणि एलटीआय माइंड ट्री या कंपन्यांचे शेअर्स मंगळवारी शेअर बाजारातील टॉप लूजर्सच्या यादीत होते.

कोणते शेअर्स वाढले?

शेअर बाजारातील गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर परतावा देणाऱ्या कंपन्यांमध्ये गार्डन रीच शिप बिल्डर, मुथूट फायनान्स, देवयानी इंटरनॅशनल, फेडरल बँक, मारुती सुझुकी आणि एचडीएफसी बँक यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली.

कोणते शेअर्स 52 आठवड्यांच्या उच्चांकावर?

Aavas Financier, Timken India आणि KRBL चे शेअर्स 52 आठवड्यांच्या नीचांकी पातळीवर पोहोचले. तर Tata Motors, ONGC, SBI, NTPC, मारुती सुझुकी आणि ICICI बँक यांचे शेअर्स 52 आठवड्यांच्या उच्चांकाच्या जवळ व्यवहार करत होते.

शेअर बाजारात अदानी समूहाच्या 10 पैकी 7 कंपन्यांचे शेअर्स घसरणीसह बंद झाले. अदानी ग्रीन, अदानी एनर्जी सोल्युशन आणि अदानी पॉवरचे शेअर्स किंचित वाढीसह बंद झाले.

गुंतवणूकदारांचे 58,000 कोटी रुपयांचे नुकसान

BSE वर कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल आज 5 मार्च रोजी 393.17 लाख कोटी रुपयांवरुन खाली आले, जे त्याच्या आधीच्या ट्रेडिंग दिवशी म्हणजेच सोमवारी 4 मार्च रोजी 393.75 लाख कोटी रुपये होते.

अशा प्रकारे, BSE मध्ये कंपन्यांचे मार्केट कॅप आज सुमारे 58,000 कोटी रुपयांनी कमी झाले आहे. किंवा दुसऱ्या शब्दांत, गुंतवणूकदारांच्या संपत्तीत सुमारे 58,000 कोटी रुपयांची घसरण झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Multibagger Stock: 1 लाखाचे झाले 8.50 लाख! शेअर बाजार लाल, पण या शेअरने केले मालामाल; 9 महिन्यांत तब्बल 700% रिटर्न

IND vs WI, 2nd ODI: दुसऱ्या सामन्यापूर्वीच मोठी बातमी! पहिल्या वनडेत शतक केलेला खेळाडू संघातून बाहेर, कारण काय?

'जैसे तू है पास मेरे तेरे पास मे' योगिता चव्हाणचा डान्स पाहिलात का? स्टेप्स आणि एक्सप्रेशन पाहून नेटकरी म्हणाले...Viral Video

Latest Marathi News Live Update : पुण्यात स्वाईन फ्लूचा वाढता धोका; दोन महिन्यांत ६२६ रुग्णांची नोंद

Asian Games, Archery: भारताच्या लेकींचा सुवर्णवेध! चीनचा धुव्वा अन् थेट वर्ल्ड रेकॉर्ड करत जिंकलं भारतासाठी सातवं गोल्ड मेडल

SCROLL FOR NEXT