Share Market  Sakal
Share Market

Share Market Closing: नवीन उच्चांक गाठल्यानंतर बाजार सपाट बंद; HDFC बँक निफ्टीमध्ये सर्वाधिक तेजीत

Share Market Closing: शुक्रवारी देशांतर्गत शेअर बाजारात विक्रमी वाढ झाल्यानंतर बेंचमार्क निर्देशांक सेन्सेक्स-निफ्टी फ्लॅट बंद झाले. निफ्टी बँक वाढीसह बंद झाला. दिवसभरातील व्यवहारादरम्यान, सेन्सेक्स 75,636 वर पोहोचला आणि निफ्टीने 23,026 च्या नवीन विक्रमी पातळीला स्पर्श केला.

राहुल शेळके

Share Market Closing Latest Update 24 May 2024: शुक्रवारी देशांतर्गत शेअर बाजारात विक्रमी वाढ झाल्यानंतर बेंचमार्क निर्देशांक सेन्सेक्स-निफ्टी फ्लॅट बंद झाले. निफ्टी बँक वाढीसह बंद झाला. दिवसभरातील व्यवहारादरम्यान, सेन्सेक्स 75,636 वर पोहोचला आणि निफ्टीने 23,026 च्या नवीन विक्रमी पातळीला स्पर्श केला.

मात्र, विक्रमी पातळीला स्पर्श केल्यानंतर बाजारात किंचित नफा बुकिंग झाली आणि निफ्टी 10 अंकांनी घसरून 22,957 वर बंद झाला. सेन्सेक्स 7 अंकांनी घसरून 75,410 वर बंद झाला आणि निफ्टी बँक 203 अंकांनी वाढून 48,971 वर बंद झाला. HDFC बँक आज टॉप गेनर होता. या शेअरमध्ये दीड टक्क्यांनी वाढ झाली आहे.

Share Market Closing

क्षेत्रीय निर्देशांकाची स्थिती

आजच्या व्यवहारात बँकिंग, ऑटो, मीडिया, ऊर्जा, तेल आणि गॅस क्षेत्रातील शेअर्स वाढीसह बंद झाले. तर हेल्थकेअर, कंझ्युमर ड्युरेबल्स, फार्मा, एफएमसीजी, मेटल, रिअल इस्टेट या क्षेत्रातील शेअर्स घसरणीसह बंद झाले.

निफ्टीच्या मिडकॅप शेअर्सचा निर्देशांक किंचित वाढीसह बंद झाला आहे तर स्मॉलकॅप निर्देशांक घसरणीसह बंद झाला आहे. सेन्सेक्समधील 30 शेअर्सपैकी केवळ 9 शेअर्स वाढीसह बंद झाले तर 21 शेअर्स घसरणीसह बंद झाले.

Share Market Closing

मार्केट कॅपमध्ये घसरण

भारतीय शेअर बाजाराच्या सपाट व्यवहारामुळे, शेअर्सच्या मार्केट कॅपमध्ये घसरण झाली आहे. बीएसईवर शेअर्सचे मार्केट कॅप घसरून 419.83 लाख कोटी रुपयांवर बंद झाले आहे जे गेल्या सत्रात 420.22 लाख कोटी रुपये होते. म्हणजेच आजच्या सत्रात गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 39,000 कोटी रुपयांची घसरण झाली आहे.

S&P BSE SENSEX

कोणते शेअर्स तेजीत?

आजच्या व्यवहारात HDFC बँक 1.64 टक्क्यांच्या वाढीसह, भारती एअरटेल 1.12 टक्क्यांच्या वाढीसह, L&T 1.11 टक्क्यांच्या वाढीसह, NTPC 0.68 टक्क्यांच्या वाढीसह, अल्ट्राटेक सिमेंट 0.61 टक्क्यांच्या वाढीसह बंद झाले. एशियन पेंट्स 1.21 टक्क्यांनी, टेक महिंद्रा 1.18 टक्क्यांनी, आयटीसी 1.16 टक्क्यांनी घसरणीसह बंद झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP आंदोलनातील धरपकडीची संयुक्त राष्ट्रांकडून दखल; आंदोलकांना ताब्यात घेतल्याबद्दल चिंता व्यक्त, भारताचे प्रत्युत्तर!

Jayasri Burman Paintings : जयश्री बर्मन यांच्या चित्रांत पुराणकथा आणि निसर्गाचे अनोखे विश्व

Crime News: कड्यावरून ढकलून प्रेयसीचा केली हत्या;लग्न ठरल्यामुळे भेटण्यास टाळाटाळ केल्याने कृत्य

RICH ZODIAC SIGNS 2027: २०२७ मध्ये ‘या’ राशींचं नशीब चमकणार! मेहनतीला मिळेल भाग्याची साथ, अचानक होऊ शकतो मोठा धनलाभ

Maharashtra Weather Update : मॉन्सूनची महाराष्ट्रातून माघार, तापमानाचा पारा ३९ अंशांपार, ६ जिल्ह्यांना उष्णतेचा येलो अलर्ट

SCROLL FOR NEXT