Sensex, Nifty flat  Sakal
Share Market

Share Market Opening: शेअर बाजार उघडताच घसरला, सेन्सेक्स 250 अंकांनी खाली, कोणते शेअर्स वधारले?

Share Market Today: सोमवारी शेअर बाजारात घसरण झाली. बाजारावर नफाबुकिंगचे वर्चस्व आहे. सेन्सेक्स सुमारे 250 अंकांनी घसरला आणि 72,900 च्या पातळीवर व्यवहार करत होता. निफ्टीही 60 अंकांनी घसरला. निर्देशांक 22,150 च्या पातळीवर आला.

राहुल शेळके

Share Market Opening Latest Update 26 February 2024: सोमवारी शेअर बाजारात घसरण झाली. बाजारावर नफाबुकिंगचे वर्चस्व आहे. सेन्सेक्स सुमारे 250 अंकांनी घसरला आणि 72,900 च्या पातळीवर व्यवहार करत होता. निफ्टीही 60 अंकांनी घसरुन निर्देशांक 22,150 च्या पातळीवर आला. आयटी, बँकिंग आणि वाहन क्षेत्रात सर्वाधिक विक्री झाली आहे. तर मेटल आणि फार्मा मध्ये खरेदी होत आहे. निफ्टी एशियन पेंट सर्वाधिक 4 टक्क्यांनी घसरला आहे.

क्षेत्रीय निर्देशांकाची स्थिती

शेअर बाजाराच्या सुरुवातीच्या व्यवहारात, निफ्टी मिड कॅप, बीएसई स्मॉल कॅप आणि निफ्टी फार्मा निर्देशांकात वाढ होत होती तर निफ्टी आयटी, निफ्टी बँक, निफ्टी ऑटो, निफ्टी एफएमसीजी आणि निफ्टी फायनान्शियल सर्व्हिसेस निर्देशांकात घसरण झाली.

शेअर बाजारात घसरण

कोणते शेअर्स वाढले?

सोमवारी सुरुवातीच्या व्यवहारात अदानी एंटरप्रायझेस, लार्सन अँड टुब्रो, पॉवर ग्रिड, डॉ. रेड्डीज, सिप्ला, कोल इंडिया आणि ग्रासिम इंडस्ट्रीजचे शेअर्स वाढले, तर एशियन पेंट्स, टायटन, एचडीएफसी लाईफ, एलटीआय माइंडट्री, टेक महिंद्रा, टीसीएस आणि बजाज फायनान्सचे शेअर्स घसरले.

S&P BSE SENSEX

शेअर बाजारातील तज्ज्ञांचे मत

शेअर बाजारातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे की बाजाराचा एकूण कल सकारात्मक आहे आणि त्यामुळे जेव्हा शेअर बाजारात घसरण असते तेव्हा गुंतवणूकदारांना खरेदी करण्याचा सल्ला दिला जातो.

शुक्रवारी विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी 1276 कोटी रुपयांचे शेअर्स खरेदी केले तर देशांतर्गत संस्थागत गुंतवणूकदारांनी 176 कोटी रुपयांचे शेअर्स खरेदी केले. या आठवड्यात गुंतवणूकदार अनेक जागतिक आर्थिक डेटावर लक्ष ठेवणार आहेत. यामध्ये अमेरिकेच्या चौथ्या तिमाहीतील जीडीपीचे आकडे आणि बेरोजगारीच्या आकडेवारीवर लक्ष असणार आहे.

अदानी समूहाच्या सर्व शेअर्समध्ये वाढ

अदानी समुहाचे सर्व शेअर्स वाढीसह व्यवहार करत आहेत. अदानी टोटल गॅसमध्ये सर्वाधिक 5.26% वाढ होत आहे. त्याच वेळी, अदानी एनर्जी देखील 4.16% ने वाढला आहे. अदानी विल्मार आणि एनडीटीव्ही 2% पेक्षा जास्त वाढताना दिसत आहेत. अदानी समूहाच्या शेअर्सचे एकूण मार्केट कॅप 16,65,522.64 कोटी रुपयांच्या उच्चांकावर पोहोचले.

डिक्सन टेकचे शेअर्स विक्रमी उच्चांकावर

डिक्सन टेकच्या शेअर्सने सोमवारी 2% पेक्षा जास्त उसळी घेत रु. 7,025 चा विक्रमी उच्चांक गाठला. कंपनीचे शेअर्स इंट्राडेमध्ये 2.93% वाढले. गेल्या 12 महिन्यांत स्टॉक 145% वाढला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis: ठाकरेंचं चॅलेंज फडणवीसांनी स्वीकारलं; म्हणाले, एक लाख रुपये जिंकलो!

रेल्वे प्रवाशांसाठी महत्वाची बातमी! पुणे, दौड, काष्टी रुळाचे काम होणार; नागपूर-पुणे मार्गावरील गाड्या झाल्या रद्द..

Nashik Grapes Export : नाशिकच्या द्राक्षांचा परदेशात डंका! नेदरलँड अन् जर्मनीसाठी पहिली ३० टनांची खेप रवाना

Chhatrapati Sambhajinagar News : शहर पर्यटन वाढीला आडकाठी! नियोजित पर्यटन धोरण वर्षभरापासून रखडले

Bigg Boss Marathi 6 Video : "तुझं तोंड शेणात घाल"; पहिल्याच दिवशी रुचिता-तन्वीमध्ये जुंपली !

SCROLL FOR NEXT