Share Market Today Sakal
Share Market

Share Market Opening: यूएस फेडच्या निर्णयामुळे बाजारात तेजी; सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर, निफ्टी प्रथमच 25,500च्या वर

Share Market Today: यूएस फेडरल रिझर्व्हने व्याजदरात 0.50 टक्के कपात केली आहे आणि अपेक्षेप्रमाणे देशांतर्गत शेअर बाजार उच्चांकासह उघडले आहेत.

राहुल शेळके

Share Market Opening Latest Update 19 September 2024: यूएस फेडरल रिझर्व्हने व्याजदरात 0.50 टक्के कपात केली आहे आणि अपेक्षेप्रमाणे देशांतर्गत शेअर बाजार उच्चांकासह उघडले आहेत. आज यूएस फेडच्या निर्णयाचा तात्काळ परिणाम भारतीय बाजारावर दिसत असून सेन्सेक्स-निफ्टी विक्रमी उच्चांकावर उघडले आहेत.

आज, बीएसई सेन्सेक्स 410.95 अंकांनी किंवा 0.50 टक्क्यांनी वाढून 83,359.17 च्या पातळीवर सुरू झाला. NSE चा निफ्टी 109.50 अंक किंवा 0.43 टक्क्यांच्या वाढीसह 25,487.05 वर आहे.

ऑइल आणि गॅस वगळता सर्व निफ्टी क्षेत्रांचे निर्देशांक तेजीत आहेत. रियल्टी आणि आयटीचा निफ्टी निर्देशांक प्रत्येकी 1 टक्क्यांहून अधिक वाढला आहे. मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समध्येही चांगली खरेदी सुरू आहे.

Share Market Opening

गुंतवणूकदारांवर पडला 3.3 लाख कोटींचा पाऊस

BSE वर कंपन्यांचे मार्केट कॅप 3.09 लाख कोटी रुपयांनी वाढले आहे, म्हणजेच बाजार उघडताच गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 3.09 लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे. एक ट्रेडिंग दिवस आधी म्हणजेच 18 सप्टेंबर 2024 रोजी, BSE वर सर्व शेअर्सचे एकूण मार्केट कॅप रुपये 4,67,72,947.32 कोटी होते.

आज म्हणजेच 19 सप्टेंबर 2024 रोजी बाजार उघडताच ते 4,70,82,827.84 कोटी रुपयांवर पोहोचले. याचा अर्थ गुंतवणूकदारांच्या भांडवलात 3,09,880.52 कोटी रुपयांची वाढ झाली आहे.

Share Market Opening

अमेरिकेत होणाऱ्या कोणत्याही आर्थिक हालचालींचा थेट परिणाम भारतीय बाजारांवर होतो आणि यावेळीही तेच झाले आहे. महागाई नियंत्रणात असल्याचे सांगून अमेरिकेच्या सेंट्रल बँकेने मोठा दिलासा दिला आहे.

पॉलिसी रेट 50 बेस पॉइंट्स म्हणजेच 0.50 टक्क्यांनी कमी केले आहेत. यानंतर अमेरिकेतील व्याजदर 5 टक्क्यांपर्यंत खाली आले आहेत. याआधी बराच काळ ते 5.25 ते 5.5 टक्क्यांच्या दरम्यान होते.

BSE SENSEX

सेन्सेक्सवर 30 शेअर्स लिस्ट आहेत, त्यापैकी 29 शेअर्स ग्रीन झोनमध्ये आहेत. एनटीपीसी, टेक महिंद्रा आणि टीसीएसमध्ये सर्वाधिक वाढ झाली आहे. दुसरीकडे, एअरटेल आज घसरत आहे. आज BSE वर 2524 शेअर्सचे व्यवहार होत आहेत. यामध्ये 1904 शेअर्स मजबूत दिसत आहेत, 498 शेअर्समध्ये घसरण दिसून येत आहे आणि 122 शेअर्समध्ये कोणताही बदल दिसून येत नाही.

याशिवाय 95 शेअर्स एका वर्षाच्या उच्चांकावर तर 13 शेअर्स एका वर्षाच्या नीचांकी पातळीवर आले. 84 शेअर्स अप्पर सर्किटवर पोहोचले, तर 23 शेअर्स लोअर सर्किटवर पोहोचले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hasan Mushrif Satej Patil Friendship: मंत्री मुश्रीफांचा फोन, सतेज पाटील यांची साथ; बाहूरन विरोध आतून मदत, गोकुळची राजकीय पेरणी

Stock Market Today: युद्धातही शेअर बाजारात तेजी कायम! सेन्सेक्स 450 अंकांनी वाढला; कोणते सेक्टर तेजीत?

Latest Marathi News Live Update : छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेत सत्ता समीकरणात मोठी उलथापालथ, भाजप अध्यक्षपदाच्या दिशेने

Mumbai News: मुंबईत मोठा अनर्थ टळला! मोटरमनच्या क्षणभराच्या चुकेने प्रवाशांचा थरकाप, भांडूप स्थानक आलं तरी लोकल थांबली नाही, काय घडलं?

Gudipadwa Holiday: गुढीपाडव्याला बँका आणि शेअर बाजार बंद की सुरू? जाणून घ्या RBI आणि NSE ची अधिकृत माहिती

SCROLL FOR NEXT