Stock Market Updates Sensex falls 500 points, Nifty below 21,600 know the reason  Sakal
Share Market

Stock Market Fall: नवीन वर्षाच्या दुस-याच दिवशी शेअर बाजार 500 अंकांनी कोसळला; काय आहे कारण?

Stock Market Fall: गेल्या वर्षी 2023 मध्ये शेअर बाजाराने अनेक नवे विक्रम केले आणि डिसेंबर महिन्यात बाजारात मोठी वाढ दिसून आली. नवीन वर्षाची सुरुवात भारतीय शेअर बाजारासाठी चांगली झाली नाही, पहिल्या दिवशी 1 जानेवारीला बाजारात घसरण झाली

राहुल शेळके

Stock Market Fall: गेल्या वर्षी 2023 मध्ये शेअर बाजाराने अनेक नवे विक्रम केले आणि डिसेंबर महिन्यात बाजारात मोठी वाढ दिसून आली. नवीन वर्षाची सुरुवात भारतीय शेअर बाजारासाठी चांगली झाली नाही. पहिल्या दिवशी 1 जानेवारीला बाजारात घसरण झाली.

त्यानंतर मंगळवारी, 2 जानेवारीला शेअर बाजार पुन्हा घसरला. सेन्सेक्स 500 हून अधिक अंकांनी घसरला आहे, तर निफ्टी 155 अंकांच्या घसरणीसह व्यवहार करत आहे.

आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी मंगळवारी शेअर बाजाराने सपाट सुरुवात केली. BSE सेन्सेक्स 119.39 अंक किंवा 0.17 टक्क्यांच्या घसरणीसह 72,152.55 वर उघडला, तर NSE निफ्टी 21.90 अंक किंवा 0.10 टक्क्यांच्या घसरणीसह 21,720 वर उघडला. बाजार उघडल्यानंतर जवळपास 1661 शेअर्समध्ये वाढ दिसून आली, तर 583 शेअर्स घसरणीसह उघडले.

सेन्सेक्स 500 अंकांनी घसरला

शेअर बाजारातील उलाढाल वाढत असल्याने दोन्ही निर्देशांकातील घसरणही त्याच गतीने वाढत आहे. दुपारी 2.00 वाजता सेन्सेक्स 500 अंकांपेक्षा अधिक घसरत 71,700 च्या पातळीवर व्यवहार करत होता. दुसरीकडे निफ्टी निर्देशांकही 155 अंकांनी घसरला आणि 21,555.65 च्या पातळीवर पोहोचला.

डिसेंबर महिन्यात शेअर बाजाराने अनेक टप्पे गाठले. बीएसईच्या मार्केट कॅपने प्रथमच 4 ट्रिलियन डॉलर्सचा टप्पा ओलांडला, सेन्सेक्सने 72,000 ची पातळी ओलांडली, निफ्टीनेही नवीन उंची गाठली. नवीन वर्षातही बाजार वेगाने वाढेल, असे तज्ज्ञ गृहीत धरत होते, परंतु 2024 च्या पहिल्या दोन दिवसांत बाजारात सातत्याने घसरण होत आहे.

कोणते शेअर्स घसरले?

BSE वर, अल्ट्राटेक शेअर 2.93 टक्के, महिंद्रा अँड महिंद्राचा शेअर 2.50 टक्के, विप्रो शेअर 2.11 टक्के, एलअँडटी शेअर 2 टक्क्यांनी घसरला. बाजारातील घसरणीदरम्यान सनफार्मा, एसबीआय, बजाज फायनान्सच्या शेअर्समध्ये वाढ झाली.

आज शेअर मार्केट का घसरत आहे?

आज बाजारात प्रचंड अस्थिरता पाहायला मिळत आहे. मेहता इक्विटीजचे प्रशांत तपासे म्हणाले की, भारतात कोविड-19 सब-व्हेरियंट JN1 च्या प्रकरणांमध्ये वाढ, आठवड्याच्या शेवटी येणारा US NFP डेटा यासारख्या कारणांमुळे बाजारात अस्थिरता आहे आणि ती राहण्याची शक्यता आहे.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भारताने Asia Cup जिंकल्यानंतर पाकिस्तानमध्ये अफगाणी विद्यार्थ्याने दिल्या 'जय हिंद'च्या घोषणा! Video Viral

JNU Ravan Dahan controversy : उमर खालिद अन् शरजीलचे फोटो पुतळ्यावर लावून 'जेएनयू'मध्ये झाले रावणाचे दहन!

Uddhav Thackeray: राज ठाकरेंसोबत युती आहे की नाही? दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी थेट उत्तर देत विषयच संपवला, म्हणाले...

World Cup 2025: पाकिस्तानची पहिल्याच सामन्यात दयनीय अवस्था! आधी १२९ वर ऑलआऊट केलं अन् मग बांगालादेशनं गोलंदाजांनाही झोडलं

Talegaon Dhamdhere News : आठवीत शिकणाऱ्या शेतमजुराच्या अल्पवयीन मुलाने गळफास घेऊन संपविले जीवन

SCROLL FOR NEXT