Share Market Latest Update Sakal
Share Market

Stock Market Record: शेअर बाजारात नवा विक्रम! निफ्टी 25,500च्या जवळ, सेन्सेक्स 83,300 पार

Stock Market Record: भारतीय शेअर बाजारात आज नवीन रेकॉर्ड झाला आहे. आज पुन्हा एकदा निफ्टीमध्ये सर्वकालीन उच्चांक आणि सेन्सेक्समध्येही विक्रमी उच्चांक गाठला आहे. सकाळी गुंतवणूकदारांना सामोरे जावे लागलेल्या निराशेचे रूपांतर आता उत्साहात झाले आहे.

राहुल शेळके

Stock Market Record: भारतीय शेअर बाजारात आज नवीन रेकॉर्ड झाला आहे. आज पुन्हा एकदा निफ्टीमध्ये सर्वकालीन उच्चांक आणि सेन्सेक्समध्येही विक्रमी उच्चांक गाठला आहे. सकाळी गुंतवणूकदारांना सामोरे जावे लागलेल्या निराशेचे रूपांतर आता उत्साहात झाले आहे. निफ्टी 25,500 च्या अगदी जवळ आला आहे आणि सेन्सेक्सने 83,300 ची पातळी ओलांडली आहे.

बँक निफ्टीमुळे शेअर बाजार तेजीत

बँक निफ्टीमध्ये 400 हून अधिक अंकांची उसळी पाहायला मिळत आहे आणि 52,630 च्या पातळीवर व्यापार करताना दिसत आहे. देशांतर्गत शेअर बाजारात त्याचा वाटा जास्त आहे, ज्याच्या पाठिंब्याने भारतीय शेअर बाजारात नवा रेकॉर्ड झाला आहे. आजच्या व्यवहारात मोठी रिकव्हरी दिसून आली आणि सेन्सेक्स-निफ्टी सकाळी लाल रंगात उघडले पण आता तेजी दिसून येत आहे.

Stock Market Record
BSE SENSEX

फेडचे अध्यक्ष जेरोम पॉवेल आज रात्री यूएस फेडरल रिझर्व्हच्या निर्णयांची घोषणा करतील. यूएस फेड आपले व्याजदर वाढवू शकते असा अंदाज वर्तवला जात असल्याने ही वाढ 0.25 टक्के की 0.50 टक्के होईल हे पाहणे बाकी आहे. त्यामुळे जागतिक बाजारपेठेत विदेशी गुंतवणूकदार सातत्याने सावध आहेत. भारतीय बाजारातील आयटी शेअर्समध्ये घसरण झाली आहे.

Stock Market Record

BSE चे बाजार भांडवल किती वाढले?

बीएसईचे बाजार भांडवल सध्या 469.54 लाख कोटी रुपयांवर आले आहे आणि बीएसईच्या 3916 शेअर्सच्या व्यापारात सध्या 1754 शेअर्स वाढताना दिसत आहेत. तर 2001 शेअर्स घसरत आहेत आणि 161 शेअर्स कोणताही बदल न करता व्यवहार करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Navi Mumbai: आदल्या दिवशी वाद; नंतर तलवार घेऊन तरुण हॉटेलमध्ये घुसला अन्... नवी मुंबईत मॅनेजरसोबत काय घडलं?

Pune Bangalore Highway Accident : देवदर्शनावरून परतताना काळाचा घाला! पुणे–बंगळूर महामार्गालगत पिकअप पलटी; 11 भाविक जखमी, तिघांची प्रकृती गंभीर

ग्लेन फिलिप्स फक्त मैदानातच उडत नाही, तर आकाशात विमानही उडवतो; स्वत:च शेअर केला Video

Mumbai Pune Expressway Accident : मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर रक्ताचा सडा! खोपोली बोगद्याजवळ 5 गाड्यांचा काळजाचा थरकाप उडवणारा अपघात; 3 जण जागीच ठार

प्रेक्षकांचा अंदाज चुकला! 'स्वामी समर्थ' नाही तर कलर्स मराठीची 'ही' गाजलेली मालिका होतेय बंद; शूट झाला शेवटचा भाग

SCROLL FOR NEXT