Share Market Today Sakal
Share Market

Share Market Opening: शेअर बाजारावर जागतिक संकेतांचा परिणाम, सेन्सेक्स आणि निफ्टी सपाट उघडले, कोणते शेअर्स वधारले?

Share Market Today: मंगळवारी शेअर बाजार सपाट उघडला. बाजारातील प्रमुख निर्देशांकांची सुरुवात थोड्या घसरणीने झाली. सध्या सेन्सेक्स 72,700 आणि निफ्टी 22100 च्या पातळीवर व्यवहार करत आहे. बाजारात बँकिंग, एफएमसीजी आणि ऑटो क्षेत्रात थोडीशी घसरण झाली

राहुल शेळके

Share Market Opening Latest Update 27 February 2024: मंगळवारी शेअर बाजार सपाट उघडला. बाजारातील प्रमुख निर्देशांकांची सुरुवात थोड्या घसरणीने झाली. सध्या सेन्सेक्स 72,700 आणि निफ्टी 22100 च्या पातळीवर व्यवहार करत आहे.

बाजारात बँकिंग, एफएमसीजी आणि ऑटो क्षेत्रात थोडीशी घसरण झाली, तर आयटी क्षेत्रात खरेदी होत आहे. अल्ट्राटेक आणि टीसीएस हे निफ्टीमध्ये टॉप गेनर्स आहेत.

सेन्सेक्सच्या शेअर्सची स्थिती

सेन्सेक्समधील 30 शेअर्सपैकी 17 शेअर्समध्ये वाढ तर 13 शेअर्समध्ये घसरण दिसून येत आहे. आज सेन्सेक्सचा टॉप गेनर टीसीएस आहे आणि तो सुमारे दीड टक्क्यांनी वाढला आहे. टायटन 0.70 टक्क्यांनी वर आहे, तर विप्रो 0.67 टक्क्यांच्या वाढीसह तिसऱ्या स्थानावर आहे, अल्ट्राटेक सिमेंट 0.66 टक्क्यांनी आणि एचसीएल टेक 0.53 टक्क्यांनी वाढले आहे.

सेन्सेक्समध्ये घसरण

निफ्टीच्या शेअर्सची स्थिती

निफ्टीच्या 50 शेअर्सपैकी 33 शेअर्स वाढीसह व्यवहार करत आहेत आणि 17 शेअर्स घसरणीसह व्यवहार करत आहेत. निफ्टीचा टॉप गेनर टीसीएस आहे आणि तो 1.30 टक्क्यांनी वाढला आहे. ग्रासिम 1.10 टक्क्यांनी तर सिप्ला 1 टक्क्यांनी वर आहे. आयशर मोटर्स 0.88 टक्के आणि अल्ट्राटेक सिमेंट 0.80 टक्क्यांनी वधारले.

S&P BSE SENSEX

शेअर बाजारातील तज्ज्ञांचे मत

सोमवारी, परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी 285 कोटी रुपयांचे शेअर्स विकले, यासोबतच देशांतर्गत संस्थागत गुंतवणूकदारांनीही 5.33 कोटी रुपयांचे शेअर्स विकले.

शेअर बाजारातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे की जोपर्यंत निफ्टी 21900 ची पातळी तोडत नाही तोपर्यंत शेअर बाजारात घसरण असल्यास खरेदीचा सल्ला दिला जातो. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की शेअर्स निवडताना तुम्ही सावधगिरी बाळगा.

व्हर्लपूल इंडियाचा शेअर 52 आठवड्यांच्या नीचांकी पातळीवर

व्हर्लपूल इंडियाचा शेअर मंगळवारी 5% पेक्षा जास्त घसरून रु. 1,186.10 च्या इंट्राडे नीचांकी पातळीवर पोहोचला. हा स्टॉकचा 52 आठवड्यांचा नीचांकावर आहे. ब्रोकरेज फर्म जेफरीजने शेअर्सवर दिलेल्या मतानंतर कंपनीच्या शेअर्सवर हा दबाव आला आहे.

जेफरीजने स्टॉकचे रेटिंग UNDERPERFORM वर खाली केले आहे. यासह, शेअरची लक्ष्य किंमत देखील 1,265 रुपयांवरून 1,125 रुपये करण्यात आली आहे. गेल्या 12 महिन्यांत स्टॉक 6.2% ने घसरला आहे.

अपर सर्किटनंतर पेटीएमचा शेअर घसरला

Paytm ची मूळ कंपनी One 97 Communications चे शेअर्स 5% च्या वरच्या सर्किटला स्पर्श केल्यानंतर घसरणीसह व्यवहार करताना दिसत आहेत. इंट्राडे 1.19% खाली शेअर 423 रुपयांवर व्यवहार करत आहे. पेटीएम पेमेंट्स बँक बोर्डाच्या विजय शेखर शर्मा यांनी राजीनामा दिल्यानंतर कंपनीच्या शेअर्समध्ये ही घसरण दिसून आली आहे.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubman Gill: 'किंग' कोहलीकडून 'प्रिन्स'चं भरभरून कौतुक! म्हणाला, 'स्टार बॉय, तू इतिहास...'

Latest Maharashtra News Live Updates: पाण्यात अडकलेल्या तरुणाची रेस्क्यू टीमने केली सुटका

Weekly Horoscope: या आठवड्यात गुरु-आदित्य योगामुळे 'या' 5 राशींवर धनवर्षा, बँक खात्यात होईल मोठी भर, जाणून घ्या तुमचं करिअर राशीभविष्य

Maharashtra Rain News: राज्यात पुढचे ४ दिवस मुसळधार, पहा कुठे -कोणता अलर्ट? | Weather Alert

Video : “...अन् साक्षात पांडुरंगाचं दर्शन झालं”, पंढरपूरला निघालेल्या दिव्यांग आजोबांचा वारीतला व्हिडिओ पाहून शॉक व्हाल..

SCROLL FOR NEXT